Bhaubeej 2021Gift : भाऊबीजेला बहिणीला खुश करायचंय असेल तर द्या ही खास भेट
अनेकांना चॉकलेट्स खायला आवडतात. त्यामुळे जर तुमच्या बहिणीला वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स खायला आवडत असतील तर तुम्ही डार्क चॉकलेट किंवा व्हाइट चॉकलेट तिला गिफ्ट देऊ शकता. सध्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या गिफ्ट बॉक्समध्ये चॉकलेट्स मिळतात. अनेक फ्लेवर्समध्ये देखील चॉकलेट्स मिळतात. ते तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ शकता. (संग्रहित छायाचित्र)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुमच्या बहिणीला ट्रेडिशनल कपडे आवडत असतील तर तुम्ही तिला साडी किंवा ट्रेडिशनल ड्रेस देऊ शकता किंवा जर बहिणीला मॉडर्न कपडे आवडत असतील तर तुम्ही तिला वन पिस देऊ शकता. (संग्रहित छायाचित्र)
अनेक महिला आणि मुलींना चांदी किंवा सोन्याची ज्वेलरी घालायला आवडतात. वेगवेगळे सेट, कानातले, गळ्यातले, नथ इत्यादी ज्वेलरी तुम्ही बहिणीला या भाऊबीजेला देऊ शकता. अंगठ्या, कानातले, हार, ब्रेसलेट या ज्वेलरी देखील तुम्ही देऊ शकता. (संग्रहित छायाचित्र)
आय लायनर, कन्सिलर, आयशॅडो, काजळ किंवा लिपस्टिक इत्यादी मेक-अपचे समाना तुम्ही बहिणीला भाऊबीजेला गिफ्ट करू शकता. (संग्रहित छायाचित्र)
तुमच्या बहिणीला मेक-अपची आवड असेल तर तुम्ही तिला मेक-अपचे संपूर्ण किट देऊ शकता. त्यामध्ये मेक-अपचे विविध सामान असते. (संग्रहित छायाचित्र)
पुस्तके जुन्या फोटोंचे कोलाज, फोटो फ्रेम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू या वस्तू देखील तुम्ही भाऊबीजेला बहिणीला देऊ शकता. (संग्रहित छायाचित्र)