Sangli News : सध्या महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या नेत्यांमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मात्र मी भाजपचा खासदार असल्यानं ईडी मागे लागणार नाही, असं वक्तव्य सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनी केलं आहे. तसंच आम्हाला लोकांसमोर दिखावा करावा लागतो. कर्ज काढून 40 लाखांच्या गाड्या वापराव्या लागतात, असंही संजयकाका पाटील म्हणाले आहेत. विटा शहरामध्ये एका कार्यक्रमात खासदारांनी केलेल्या या वक्तव्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मी भाजपचा खासदार असल्यानं ईडी मागे लागणार नाही. मात्र आमची कर्ज पाहून ईडीवाले पण चक्रावून जातील, असं भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. संजय काका पाटील यांच्या या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विटा शहरामध्ये एका कार्यक्रमात विटामधील स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्यावर बोलताना खासदार संजयकाका पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, विटामधील राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील, बाबासाहेब मुळीक, अशोकराव गायकवाडही उपस्थित होते.
सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईचं धाडसत्र सुरु आहे. यातच भाजपचे नेते मात्र आपल्याला ईडीच्या कारवाईची काहीच भीती वाटत नाही, असं उघड-उघडपणे म्हणतात. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात असल्यानं आपल्याला शांत झोप लागते, असं वक्तव्य केलं होतं. आता यात भर म्हणून सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी थेट मी भाजपचा खासदार असल्यानं ईडी मागे लागणार नाही. मात्र आमची कर्ज पाहून ईडी वाले पण चक्रावून जातील असं वक्तव्य केलं आहे.
लोकांना दिखाव्यासाठी आम्हाला कर्ज काढून महागड्या गाड्या घ्याव्या लागतात. आम्हाला लोकांसमोर देखावा करावा लागतो, त्यासाठी कर्ज काढून 40-40 लाखांच्या गाड्या वापराव्या लागतात. पण आमची कर्जे बघितली तर ईडी वाले म्हणतील, ही माणसं आहेत का कोण? असे खासदार संजय पाटील यांनी म्हणाले. नुकतेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात असल्याने शांत झोप लागते असे सांगितले होते. मात्र आपले कर्ज एवढे आहे की,ईडी जर आली तर कर्ज पाहून काय माणसं आहेत,अस म्हणत आश्चर्य व्यक्त करतील,असं मतही खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जागा आर्थर रोड जेलमध्ये; आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा
- ईडी, आयटी दोन नंबरचे व्यवहार करणाऱ्यांना मोकाट सोडून, राजकारण्यांच्या मागे लागलेत, जयंत पाटलांचा आरोप
- 'साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप', अजित पवारांनी वाचून दाखवली विकलेल्या कारखान्यांची यादी