Dhule Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी (Dhule Lok Sabha Constituency) काँग्रेसने माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे आता भाजपचे डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध करत आपली नाराजी उघड केली होती. त्यामुळे धुळ्यात काँग्रेसमधील गटातटातील नाराजी नाट्य समोर आले होते. त्यानंतर वरिष्ठांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. अशातच या बाबत प्रतिक्रिया देताना डॉ. सुभाष भामरे यांनी आपली प्रतिक्रिया देत काँग्रेस वर निशाणा साधला आहे. काँग्रेसमधील नाराजी नाट्य संपलं असले तरी जो पक्ष मुळातच संपला आहे, त्याबाबत काय बोलावं, असा खोचक टोला डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेसला लगावला आहे. 


आपला विजय निश्चित  


धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत आहे. डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचाराचा झंजावात सुरू झाला असून मतदारांचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून देशाला आर्थिक महासत्ता करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे भारतीय जनतेने ठरवले आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस मधील नाराजी नाट्य समोर आले होते. मात्र काँग्रेसमधील ही नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश आल्यानंतर आता महाविकास आघाडीतील सर्वच पदाधिकारी देखील शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून नेमकं कोण बाजी मारणार हे बघणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.  


धुळे मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार?


धुळे लोकसभा हा एकेकाळी काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला होता. मात्र गेल्या तीन लोकसभा निवडणुकांपासून हा मतदारसंघ भाजपने काबीज केला आहे. डॉ. सुभाष भामरे आता हॅटट्रिकच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसतर्फे आमदार कुणाल पाटील यांचे नाव चर्चेत होते. परंतु, त्यांनी नकार दिल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांची नावे चर्चेत आली होती. मात्र अचानक धुळ्याच्या प्रभारी असलेल्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावाची काँग्रेसने अधिकृतपणे घोषणा करण्यात आल्याने आनेकांना हा एक धक्का मनाला गेलाय. मात्र आता काँग्रेसमधील ही नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश आल्यानंतर आता महाविकास आघाडीतील सर्वच पदाधिकारी देखील शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे काँग्रेसला आपला बालेकिल्ला पुन्हा बळकावण्यात यश येतं, की महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे हे आपल्या विजयाची हॅटट्रिक करतात, याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या