रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी युवा सेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे यांना तडीपारची नोटीस देण्यात आली आहे. खेड पोलिस स्टेशनमध्ये अजिंक्य मोरे यांच्याविरोधात 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल केलेल्या विविध 7 गुन्ह्यांचा दाखला देत तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. अजिंक्य मोरे यांना तडीपारची नोटीस देण्यात आल्यानंतर या प्रकरणाची खेडच्या प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे.  अजिक्य मोरे यांना नोटीस देण्यात आल्यानंतर म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 


राजन साळवींविरोधातील कारवाईनंतर वक्तव्य


शिवसेना ठाकरे आमदार राजन साळवी एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. साळवी यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने अजिंक्य मोरे यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याने चर्चेत आले होते. बाळासाहेब असते, तर एसीबीच्या अधिकाऱ्यांचे काय केलं असतं? असे वक्तव्य अजिंक्य मोरे यांनी केले होते.  


भाजपवाले घाबरले आहेत, माजी आमदार रमेश कदमांची टीका


दरम्यान, आता भाजपवाले घाबरले आहेत मतं फोडण्यासाठी अपक्ष उमेदवाराला मतदान करण्यासाठी विनंती करत आहेत, पण येथील मुस्लिम बांधवांनी, समाजाने हे लक्षात घ्यावे. अपक्ष उमेदवार शकील सावंत यांना मत म्हणजेच भाजपला मत मिळणार आहे भाजपची ही विकृत राजकीय खेळी सुरू झाली असल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला.  मतदारांनी पूर्ण विचार करून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी गुरुवारी चिपळूण शहरात मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीलाउत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.  


नारायण राणे निश्चितच कोकणचा विकास साधतील 


नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नारायण राणे निश्चितच कोकणचा विकास साधतील, नारायण राणेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत त्यामुळे नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देत साथ द्या, आताची लोकसभेची निवडणूक भारताची सक्षम नेतृत्व निवडण्याची आहे, त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक रिंगणात आहे, तर विरोधी गटात राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांची खिचडी आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापुरात केले. राजापूर शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर फडणवीस यांची सभा झाली. 


इतर महत्वाच्या बातम्या