कुटुंबाच्या विरोधात त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असं जरी बोललं जात असलं तरीही सुजय हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते स्वत:चा निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या निर्णयाला सर्व कुटुंबाचा पाठिंबा असल्याचं धनश्री विखेंनी एबीपी माझाकडे स्पष्ट केलं.
घरामध्ये दोन विरोधी पक्षांचे नेते असल्याने तारांबळ होईल का या प्रश्नावर घरात कोणतीही राजकीय चर्चा होत नसल्याचं धनश्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. राजकारण ऑफिस किंवा घराबाहेर होत असल्याने राजकारणामुळे नातेसंबंधांमध्ये कोणताही कडवटपणा येणार नसल्याचं त्या म्हणाल्या.
लोकसभेसाठी सुजय विखेंचा प्रचार करतानाच सासरे राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रचार करायचा की नाही हे वेळ आल्यावरच ठरवू असंही त्यांनी एबीपी माझाला सांगितलं.