Dhananjay Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी पुण्याच्या दिशेने जातानाचा एक सीसीटीव्ही समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे . या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असा ठपका असणाऱ्या वाल्मीक कराडने (Walmik Karad) 31 डिसेंबर 2024 ला शरणागती पत्करण्यापूर्वी 3 आलिशान गाड्यांमधून बीड -मांजरसुंबा via पुण्यात जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे . याच गाड्यांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची पांढरी स्कॉर्पिओ (white Scorpio)असल्याचाही सांगण्यात येत आहे .या गाड्यांमधूनच आरोपींना फरार करण्यासाठी मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपींना अभय दिलं नसतं तर खून झाला नसता. आता मात्र यंत्रणेवर शंका येत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही असा सवाल केला आहे .याबाबत आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचंही धनंजय देशमुख म्हणालेत . (Santosh Deshmukh Case)
काय म्हणाले धनंजय देशमुख ?
मला यंत्रणेवर शंका येत आहे .याचे कारण सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही ?माझ्या भावाचे ज्या आरोपी आहेत त्यांना शिक्षा देताना हे महत्त्वाचे आहे .माध्यमांना व्हिडिओ मिळतात मग यंत्रणेने केलं काय ?आमचा विश्वासघात झाला तर याला जबाबदार कोण याचे उत्तर आम्हाला हवं आहे .यंत्रणेने आत्तापर्यंत काय काय हस्तगत केले याची माहिती देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे .यासाठी आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत .जी घटना घडली त्यानंतर आरोपी सर्व जिल्ह्यात होते .सरेंडर होण्यासाठी त्या जिल्ह्याच्या बाहेर गेले . याची जबाबदारी सीआयडी एसआयटीवर आहे .या सगळ्यांची उत्तर आम्हाला लेखी स्वरूपात हवी आहेत तोंडी घेणार नाही .असं धनंजय देशमुख म्हणाले .
आरोपींना अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता- धनंजय देशमुख
आता मला संशय येतोय आरोपींना फरार करण्यात आणि आसरा देण्यास मदत करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही ? या गोष्टीवर मला शंका आहे . याची माहिती मी घेणार आहे .जे समोर येत आहे त्यावर पोलीस यंत्रणा व्यक्त झाली नाही .कराड यांना कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये अधिक राहायचे आहे .आम्ही पीडित कुटुंब आहे .यंत्रणा काय कारवाई केली पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे .आरोपींना अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय .
हेही वाचा: