Walmik Karad Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेगाला असून आत्तापर्यंत 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे .या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे .वाल्मीक कराडसह (Walmik Karad) त्याच्या दोन्ही पत्नींच्या संपत्तीबाबतही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर CIDला शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराड बीड वरून पुण्याला गेला होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे . याबाबत पुष्टी देणाऱ्या तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत . पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराडचा मांजरसुंबा via पुण्यात आलिशान गाड्यांमधून पळ काढल्याचे CCTVसमोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे . (Santosh Deshmukh Case)
वाल्मीक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात 31 डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केल्याने मोठी खळबळ उडाली होती . पांढऱ्या स्कॉर्पिओ (White Scorpio) मधून वेगाने पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करण्यासाठी आलेल्या वाल्मीक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतले .त्यानंतर सीआयडीच्या चौकशीचे सत्र सुरू झाले .शरणागती पत्करण्याचा आधी गेले आठ दिवस तो कुठे होता याचे उत्तर देण्यास वाल्मीक कराडने नकार दिला होता . याबाबत आता मोठी बातमी समोर आली असून शरणागती पत्करण्यापूर्वी 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 3 आलिशान गाड्यांमधून आरोपीला पुण्याला नेल्याची चर्चा आहे . याला पुष्टी देणारे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे .
काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ?
खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेले होते का असा सवाल उपस्थित केला जात असताना याबाबतीत पुष्टी देणाऱ्या तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत .यात 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याचं सांगण्यात येत आहे .बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले .तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले .त्यानंतर या गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या .या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे .याच आलिशान गाड्यांमधून आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शंका उपस्थित होत आहे .विशेष म्हणजे पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या व्हाईट स्कॉर्पिओ मधून वाल्मीक कराडाला ती गाडी याच ताफ्यातील असल्याचं समोर आलं आहे . पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ MH 23 BG 2231 ही शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची असल्याची माहिती सूत्रांनी दिली .
संतोष देशमुख हत्या प्रकरणात शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मीक कराड आणि त्याचे साथीदार पुण्याला कसे पळाले याबाबत सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे .एकीकडे अटकेतील आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे .दरम्यान शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मीक कराड मांजरसुंबा तर त्याचा दुसऱ्या पत्नीकडे राहायला असल्याची ही माहिती उघड झाली होती .त्यानंतर नुकत्याच हाती लागलेल्या माहितीनुसार, बीड मधून मांजरसुंबातील हॉटेलमध्ये जेवण करून गाडीत डिझेल भरून तीन आलिशान गाड्यांमधून वाल्मीक कराड पुण्याला गेल्याचे सांगण्यात येत आहे .
हेही वाचा: