VIDEO : जेव्हा श्री आणि सौ मुख्यमंत्री अभिनय करतात!
एबीपी माझा वेब टीम | 26 Feb 2018 11:38 AM (IST)
जलसंवर्धनाचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्या पत्नी अमृता यांच्यासोबत थेट गायकीच्या क्षेत्रात उतरले आहेत.
मुंबई : जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, नद्यांचं संवर्धन यांसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारचं जलसंवर्धन आणि अन्य कामं आपण पाहिलं. पण सरकारचं हेच काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्या पत्नी अमृता यांच्यासोबत थेट गायकीच्या क्षेत्रात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनीही आपली हौस भागवून घेतली आहे. सोशल मीडियावर सध्या या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आतापर्यंत फडणवीस सरकारने आपली कामं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी अनेकदा मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्रीच गाण्याच्या माध्यमातून जनतेसमोर आले आहेत. दरम्यान, या व्हिडीओबाबत सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. VIDEO :