मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अटकेनंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा केली जातेय, त्याची साधी दखल सुद्धा नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. इतका द्वेष आणि इतका सत्तेचा माज? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 


देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधी एक ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, पण, जनता सारे काही पाहते आहे. निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले झाले, त्यातील आरोपी अटकेत नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला, त्यावर साधा गुन्हा दाखल नाही.  हनुमान चालिसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर थेट त्यांना अटक केली जातेय."


 






दरम्यान, राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


 


ABP Majha