धुळे : साक्रीमध्ये उपप्राचार्य त्यांच्या पत्नीसह भाजल्याची घटना घडली आहे. साक्रीमधील सी गो पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य रविंद्र आत्माराम देवरे या घटनेत 76 टक्के भाजले आहेत. त्यांची पत्नीही या घटनेत 96 टक्के भाजली आहे.
उपप्राचार्य रविंद्र देवरे यांच्या घरातून संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान धूर येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत भाजलेल्या या दाम्पत्याला साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण दोघेही गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या घटनेत दोघेही गंभीररित्या भाजले आहेत. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही.