Nagpur News नागपूर : नागपूर शहरातून एक बातमी समोर आली आहे.  शहरातील (Nagpur News) सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या सिव्हिल लाईन परिसरातील कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Kukreja Infrastructure) 28 मजली इमारतीला संरक्षण विभागाने (Defense Department) विरोध दर्शवला आहे. कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरच्या ही कंपनी भाजपचे नेते विरेंद्र कुकरेजा यांच्या मालकीची आहे. शहरातील सर्वात उंच इमारती विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. संरक्षण विभागाच्या कामठी स्टेशन कमांडरने नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल केली होती.


दरम्यान या प्रकल्पाचे बांधकाम अवैध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. तर हा प्रकल्प सिविल लाइन्समधील संरक्षण विभागाच्या परिसरापासून केवळ 76 मीटर जवळ आहे. त्यामुळे नियमानुसार सैन्य दलाच्या आस्थापणे पासून 100 मीटर वरील बांधकामाची परवानगी घ्यावी लागते. मात्र या प्रकल्पाचे बांधकाम करण्यापूर्वी सैन्य दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नाही. परिणामी, भविष्यात संरक्षण विभागाला होणारा धोका लक्षात घेता महानगरपालिकेने प्रकल्प विकासाची परवानगी देऊ नये, बांधकाम पूर्णत्वाचे आणि भोगवटा प्रमाणपत्र जारी करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. 


पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला 


हाती आलेल्या माहितीनुसार ही इमारत रिकामी करून बांधकाम पाडण्यात यावे, किंवा उंची आठ माळ्यापर्यंत सीमित करण्यात यावी, अशी याचीकेत  संरक्षण विभागाने मागणी केली आहे. दरम्यान आता यासंदर्भातील पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.त्यामुळे  शहरातील सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या सिव्हिल लाईन परिसरातील कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरच्या 28 मजली इमारतीचे भवितव्य येत्या काळात ठरणार आहे. 


तर भारतातील 60 ते 70 टक्के लोकांना डॉक्टर कडे जाण्याची गरजच भासणार नाही- नितीन गडकरी 


सामान्य माणसाचे जीवन सुसह्य बनवण्यामध्ये स्वच्छता मोहिमेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जर स्वच्छता मोहिमेत आपण जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणपासून मुक्तता तसेच कीटकनाशक विरहित भाजीपाला या गोष्टीही जोडल्या, तर भारतातील 60 ते 70 टक्के लोकांना डॉक्टरकडे जाण्याची गरजच भासणार नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते आज नागपूरात महानगरपालिकेद्वारे आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर स्वच्छता मोहीम राबवली... या मोहिमेमध्ये नितीन गडकरी ही प्रतिनिधी स्वरूपात सहभागी झाले होते.


हे ही वाचा