मुंबई : राज्यातील तीनही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगामध्ये समन्वय साधून वीजदर कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील उद्योग व व्यवसाय वाढीसाठी मोठा हातभार लागणार आहे. राज्यातील वीजदर सरासरी 7 टक्के कमी करण्यात आले आहेत. वाणिज्यिक व औद्योगिक दर येणाऱ्या पाच वर्षांमध्ये वापर आकारानुसार सुमारे 10 ते 15 टक्के कमी करण्यात आलेले आहेत. तर घरगुती विजेचे दर हे वापर आकारानुसार 5 टक्के एवढे कमी करण्यात आले आहेत.
औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना वाढीव वीज वापरांवर 75 पैसे प्रति युनिट सवलत राहणार आहे. औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांवर पुढील 3 महिने स्थिर आकार लागू होणार नाही. कृषी ग्राहकांना कोणतीही वीज दरवाढ करण्यात आलेली नाही. सोलर रूफ टॉप वापरणाऱ्या ग्राहकांना कोणताही अतिरिक्त भार नाही.
अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरण या चारही कंपन्यांचे दर कमी करण्यात आले आहेत. घरगुती वापराच्या बिलांचे मीटर रीडिंग घेण्यात येणार नाही. मागील महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज बिल तयार करण्यात येईल. मार्च महिन्याचे बिल 15 मे पर्यंत तर एप्रिल महिन्याचे बिल 31 मे पर्यंत भरण्याची सवलत देण्यात आलेली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
फ्रेंचाईझी कंपन्यांनी सुद्धा त्यांच्या भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी खबरदारी घ्यावी. भिवंडी, मुंब्रा-कळवा व मालेगाव येथील तीन खाजगी वीज वितरण फ्रेंचाईझी कंपन्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेऊन रमजान, उन्हाळा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, नियोजन आणि कृती आराखडा तयार करावा व त्यासाठी फ्रेंचाईझी कंपनीने तयार राहावे, असे निर्देश त्यांना देण्यात आल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली.
मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना गावी पाठवण्याचा निर्णय चार दिवसात : भास्कर जाधव
लॉकडाऊन काळात 24 तास विद्युत पुरवठा करण्याचे आव्हान होते. या काळात वीज पुरवठा अखंडीतपणे सुरु ठेवण्यासाठी ज्यांनी मोलाचे योगदान केले अशा अतिउत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांस योग्य बक्षिस देऊन गौरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकाशी थेट संपर्क होऊ नये याकरिता मीटर रीडिंग, वीजबिल वितरीत करणे, वीज बिल भरणा केंद्र, वीज चोरी मोहिम, वीज पुरवठा खंडित करणे इत्यादी प्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत, असेही नितीन राऊत यांनी सांगतलं.
इतिहासात पहिल्यांदाच... कोरोनामुळे सांगलीत हळदीचे लिलाव प्रथमच ऑनलाईन