Intranasal Booster Dose Trials :  कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी देशभरात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून  (DCGI) भारत बायोटेकच्या (BharatBiotech)  इंट्रानेझल कोविड बूस्टर डोस (Intranasal Booster Dose) च्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे.  ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या विशेष समितिने (SEC) भारत बायोटेकच्या इंट्रानेजल कोविड वॅक्सिनच्या तीसऱ्या टप्प्यातील चाचाणीला मंजुरी दिली आहे. 


हैदराबाद स्थित भारत बायोटक (BharatBiotech) ने बुस्टरविषयी प्रस्ताव दिला आहे. ज्या नागरिकांनी  कोव्हिशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सीन (Covaxin) घेतलेल्यांना डोस देण्यात येणार आहे. माहितीनुसार भारत बायोटेकचे 5000 क्लिनिकल ट्रायल  (Clinical Trials) चे लक्ष्य आहे. यामध्ये 2500 जण कोवॅक्सीन  आणि  2500 जण कोव्हिशील्ड लस घेतलेल्यांवर चाचणी करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसरा डोस घ आणि  इंट्रानेजल बूस्टर डोस यामध्ये सहा महिन्याचे अंतर पाहिजे. 25 डिसेंबरला देशाला संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लवकरच कोरोना नेजल वॅक्सिनचा वापरात येणार आहे. 


 नेजल व्हॅक्सीन हे नाकातून दिले जाणारे औषध आहे. ही लस इंजेक्शनऐवजी नाकातून दिली जाईल. भारतात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोस देण्याची गरज असल्याचे काही तज्ञांचे मत आहे. बुस्टर डोसमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कोरोनाची लागण झाली तरी त्याची लक्षणे सौम्य असतील असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सीनची तिसऱ्या टप्यातील चाचणी यशस्वी झाली तर दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना बुस्टर डोस म्हणून ही लस देण्यात येईल. 


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha