मुंबई : पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप मागे घेतला असला तरी नाशिकमधील शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीची आज बैठक होणार आहे.


शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी नव्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या आज होणाऱ्या बैठकीमध्ये काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

नाशिकच्या शेतकऱ्यांचा संप सुरुच
पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा काल (बुधवार) शेवटचा दिवस असला तरी नाशिकमधील संप सुरुच असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू आदींसह सुकाणू समिती सदस्यांच्या बैठकीनंतरच पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

संपामुळे गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुमारे 100 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे संप अजून जितके दिवस चालेल, तेवढं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे.

"आता संप करण्याची आमची मानसिकता नाही. संप काळात आमचं खूप नुकसान झालं. आधीच मेटाकुटीला आलोय, त्यात नुकसान झालं. आता काहीही झालं तरी भाजीपाला बाजारात आणणारच," अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने एबीपी माझाला दिली.

कुठे किती आवक?
पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज भाज्यांची 100 टक्के आवक झाली आहे. बाजार समितीत 1 हजार 83 भाजीपाला गाड्या दाखल झाल्या आहेत.

तर नाशिकमधील बाजार समितीही पुन्हा गजबजली. बाजार समितीत भाज्यांची आवक पूर्वपदावर आली असून शेकडो वाहनं भरुन भाजीपाला दाखल झाला आहे.

दुसरीकडे नवी मुंबईतीव वाशी एपीएमसीमध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत 530 भाजीपाला गाड्यांची आवक झाली आहे.

संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.

  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.

  • शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.

  • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी.


21 जणांची नवी सुकाणू समिती




  • राजू शेट्टी

  • अजित नवले

  • रघुनाथदादा पाटील

  • संतोष वाडेकर

  • संजय पाटील

  • बच्चू कडू, प्रहार

  • विजय जवंधिया

  • राजू देसले

  • गणेश काका जगताप

  • चंद्रकांत बनकर

  • एकनाथ बनकर

  • शिवाजी नाना नानखिले

  • डॉ.बुधाजीराव मुळीक

  • डॉ. गिरीधर पाटील

  • गणेश कदम

  • करण गायकर

  • हंसराज वडघुले

  • अनिल धनवट


संबंधित बातम्या

शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती


शेतकरी संपावर : किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांची सडेतोड मुलाखत