मुंबई : मुंबई प्रेस क्लबचे रेडइंक पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी आणि एबीपी न्यूजचे अभिसार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


राहुल कुलकर्णी यांना महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीवर केलेल्या वार्तांकनासाठी पुरस्कार देण्यात आला. त्यांचा पुरस्कार राहुल यांच्या वतीने अभिजित ब्रम्हनाथकर यांनी स्विकारला.

मानवी हक्कांसाठी उत्कृष्ट टेलिव्हिजन वार्तांकन केल्याबद्दल अभिसार शर्मा यांचा गौरव करण्यात आला.

राज्यातील पाणीबाणी आणि दुष्काळाचं उत्कृष्ट वार्तांकन केल्याबद्दल राहुल कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला.