सांगली : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील भक्तांचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या श्री दत्त जयंती उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. दत्तदर्शनासाठी नरसोबाच्या वाडीत भक्तांचा महापूर आला आहे.


मंदिराच्या गाभाऱ्याचे दार पहाटे तीन वाजता उघडल्यानंतर चार वाजता श्री दत्त महाराजांची पहाटेची काकडआरती झाली. यावेळी पहाटेपासूनच भक्तांनी दत्त मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

दत्त जयंतीमुळे होणारी संभाव्य गर्दी पाहता श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील देवस्थान समितीने दर्शन रांगासह दत्त महाराजांच्या दर्शनाची खास सोय केली होती.



या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने चोख व्यवस्था केल्यामुळे नृसिंहवाडीचा दत्त जयंती सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरु झाला. दिवसभर दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमही संपन्न होणार आहेत.