Pritam Munde : पंकजा ताईंच्या पराक्रमाची ज्योत आणि तुमची शक्ती एकत्र येईल त्यावेळी इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य खासदार प्रीतम मुंडे यांनी केलं. ताईंमध्ये दिलेले शब्द पाळण्याची ताकद आहे. त्या निस्वार्थी वृत्तीनं काम करत असल्याचे प्रीतम मुंडे म्हणाल्या. तसेच समोर बसलेल्या जनतेला तुम्ही स्वाभिमानाचे प्रतिक आहात असे प्रीतम मुंडे म्हणाल्या. 


पंकजा ताईंच्या संघर्षात तुम्ही सर्वांनी आमच्या खांद्याला खांदा लानून साथ दिली. तुम्ही आम्हाला त्रास होईल असे काम कधीही केलं नाही. त्यामुळं तुम्ही स्वाभिमानाचे प्रतिक असल्याचे प्रीतम मुंडे समोर उपस्थित जनतेला म्हणाल्या. कारखाना अडचणीत असताना न मागताही दोन दिवसात कोट्यवधींचा निधी तुम्ही दिला त्याबद्दल तुमचे आभार मानते असे प्रीतम मुंडे म्हणाले. ज्यावेळी ताईंच्या पराक्रमाची ज्योत आणि तुमची शक्ती एकत्र येईल त्यावेळी इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही असे प्रीतम मुंडे म्हणाल्या. यावेळी प्रीतम मुंड यांनी या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या सर्व जनतेचे आभार मांडले. 


पंकजा मुंडे काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष


भाजपच्या राजकीय पटलावरावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आज दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. याआधीच्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) पंकजा यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर आज होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात कोणत्या मुद्यावर भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यात दसऱ्यानिमित्ताने होणाऱ्या काही दसरा मेळाव्यांना महत्त्व आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा, शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा याचा समावेश होतो. 2019 विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर पंकजा मुंडे या महाराष्ट्र भाजपमध्ये सक्रिय नसल्याचे चित्र दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपमधील एक गट कार्यरत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पंकजा यांना भाजपकडून संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. मात्र, पंकजा या मध्य प्रदेशमध्ये फार सक्रीय नसल्याचेही म्हटले जात आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Pankaja Munde Dasara Melava : शिवशक्ती परिक्रमानंतर आता पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार? 'या' मुद्यांवर भाष्य करण्याची शक्यता