मुंबई : शिवाजी पार्कवरून आज सोनिया गांधी यांचे विचार ऐकायला मिळणार अशी टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिवसेनेच्या उपनेत्या  सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला. "तुमच्या दोन मुलांविषयी न बोललेलं बरं, परंतु, तुम्ही तरी शहाणे आहात तुम्ही असे बोलायला नको आहे. शिवसेनेला तुम्ही सोनियांचे विचार म्हणत आहात. परंतु, तुम्ही दहा वर्षे सोनिया गांधी यांच्या पायावर डोकं टेकवून, लोटांगण घालून सगळी मंत्रीपदं भोगली हे विसरलात काय? असा टोला यावेळी अधारे यांनी नारायण राणे यांना लगावला. शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून बोलताना अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल  केला. 


दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे.  परंतु, शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होत आहे. राज्यभरातून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. बंडखोरीनंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळीपासून त्यांनी शिंदे गटावर सतत घणाघाती टीका केली आहे. आज देखील त्यांनी शिंदे गटाचा आणि बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतलाय. 


सुषमा अंधारे यांनी यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिसेनेवर टीका करणाऱ्या नारायण राणे, रामदास कदम यांच्यासह किरण पावसकर यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना सोडताना यांनी 12 कारणं सांगितली.पण यातील एक कारण देखील खरं नसल्याचं अंधारे यावेळी म्हणाल्या. हिंदुत्वासाठी शिंदे गटात गेल्याचे सांगणाऱ्या रामदास कदामांनी गेल्या पाच वर्षात शिवसेनेला ब्लॅकमेल केलं. शिवसेनेला ब्लॅकमेल करून राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली त्यावेळी तुचं हिंदूत्व कुठं गहाण ठेवलं होतं? अशा प्रश्न यावेळी अंधारे यांनी उपस्थित केला.   


सुषमा अंधारे म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडलं नाही तर त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा हिंदूत्वाचा विचार जपला आणि प्रत्यक्षात तसे वागले. तुमचे हिंदूत्व इतर जातींचा द्वेष करायला शिकवतं काय असा प्रश्न उपस्थित करत हिंदूत्वाला तुम्ही कलंक लावला. कारण हिंदू माणूस कुटुंब संकटात असताना घर सोडून जात नाही. परंतु, गद्दारी करून तुन्ही शिवसेना सोडून गेला, अशी घणाघाती टीका यावेळी सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर केली.  


 


महत्वाच्या बातम्या


Dasara Melava 2022 Live Updates : शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानं कार्यकर्त्यांनी फुल्ल; दोन्ही मैदानावर तुफान गर्दी 


Shivsena : दसरा मेळाव्यावर छाप कुणाच्या भाषणाची? दोन्ही गटांकडून प्रत्येकी 11 फर्डे वक्ते सभा गाजवणार