Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्गापाठोपाठ रत्नागिरीलाही बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तर अनेक ठिकाणी घरांच्या भिंती, झाडं कोसळली. तोक्ते चक्रीवादळामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काही लोक या वादळात जखमी झाले आहेत. 


रत्नागिरी तालुक्यात 3 व्यक्ती जखमी झाल्या असून दोन प्राण्यांचा मृत झाला आहे. तर खेड तालुक्यात 2 व्यक्ती आणि एका प्राण्याचा मृत झाला आहे. संमेश्वर तालुक्यातही तोक्ते चक्रीवादळामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


मंडणगड तालुक्यात 3 घरांचे पूर्णत: 5 लाख 18 हजार 960 रुपयांचे नुकसान तर अंशत्: 227 घरांचे 6 लाख 80 हजार 950 रुपये तर 10 गोठ्यांचे 28 हजार 365 रुपये नुकसान झाले आहे. तसेच दुकाने, टपऱ्यांचे 32 हजार रुपये 3 शासकीय इमारत व सार्वजनिक मालमत्तेचे 42 हजार 500 रुपये नुकसान झाले आहे.


दापोली तालुक्यात 509 घरांचे अंशत: 32 लाख 253 रुपये, 27 गोठ्यांचे 82 हजार 95 रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच दोन टपऱ्यांचे 5 हजार 550 रुपयांचे नुकसान झाले आहे. 


खेड तालुक्यात 2 व्यक्ती आणि एका प्राण्याचा मृत झाला आहे. एका घराचे पुर्णत: 1 लाख 33 हजार 800 रुपये,  तर 117 घरांचे अंशत: 7 लाख 48 हजार 880 आणि 07 गोठ्यांचे 56 हजार 200 रुपये नुकसान झाले आहे. एका टपरीचे 16 हजार 200 रुपयांचे नुकसान झाले आहे.


गुहागर तालुक्यात एक व्यक्ती जखमी झाला असून 04 पशुधनांचे नुकसान झाले आहे.  227 घरांचे अंशत: 6 लाख 13 हजार 280 रुपये, 17 गोठ्यांचे 76 हजार 740 रुपये नुकसान झाले आहे. 


चिपळूण तालुक्यात 133 घरांचे अंशत: 7 लाख 13 हजार तर 4 गोठ्यांचे 36 हजार रुपये एका शाळेचे 5 हजार रुपये, 23 शासकीय इमारत आणि सार्वजनिक मालमत्तेचे 2 लाख 92 हजारांचे नुकसान झाले आहे.


संगमेश्वर तालुक्यात एक व्यक्ती जखमी झाला असून एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे. 157 घरांचे अंशत: 20 लाख 75 हजार 560 रुपये तर 15 गोठ्यांचे 1 लाख 50 हजार रुपये, दोन दुकाने/टपऱ्यांचे 40 हजार रुपये, 11 शासकीय इमारत/सार्वजनिक मालमत्तेचे 1 लाख 10 हजार 510 रुपये नुकसान झाले आहे.


रत्नागिरी तालुक्यात 3 व्यक्ती जखमी झाल्या असून दोन प्राण्यांचा मृत झाला आहे. दोन घरांचे पूर्णत: 12 लाख 50 हजार रुपये, 679 घरांचे अंशत: 1 कोटी 15 लाख 6 हजार 934 रुपये, 26 गोठ्यांचे 3 लाख 42 हजार 400 रुपये, 250 झाडांची पडझड, 11 दुकाने/टपऱ्यांचे 4 लाख 4 हजार 750 रुपये, 6 शासकीय इमारत आणि सार्वजनिक मालमत्तचे 2 लाख 70 हजार रुपये नुकसान झाले आहे.


लांजा तालुक्यात तीन घरांचे पूर्णत: 3 लाख 45 हजार रुपये, 187 घरांचे अंशत: 22 लाख 44 हजार, 16 गोठ्यांचे 1 लाख 12 हजार रुपये आणि तीन शासकीय/सार्वजनिक मालमत्तेचे 64 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.


राजापूर तालुक्यात तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. चार घरांचे पूर्णत: 10 लाख 5 हजार रुपये, 676 घरांचे अंशत: 62 लाख रुपये, 5 हजार 941 रुपये, 46 गोठ्यांचे 5 लाख 57 हजार 680 रुपयांचे नुकसान झाले आहे. 200 झाडांची पडझड झाली असून 08 दुकाने/टपऱ्यांचे 1 लाख 15 हजार 250, 35 शाळांचे 05 लाख 82 हजार 200 रुपये, 27 शासकीय इमारत/मालमत्तेचे 18 लाख 51 हजार पाचशे रुपये नुकसान झाले आहे. 


कृषी क्षेत्राचे अंदाजित 2500 हे. आर. क्षेत्राचे नुकसान झाले असून अद्याप पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच 20 बोटींचे अंशत: नुकसान झाले असून पंचनामे सुरु आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील बागायतीला फटका; 3 हजार 375 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्रशासनाकडून प्राथमिक माहिती