बीड : अवैध धंद्यांना राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असतो असे म्हटले जाते. परंतु, बीडमध्ये (Beed) मात्र चक्क अवैध धंद्यांवर टाकलेल्या धाडीत राजकीय व्यक्तींचाच सहभाग असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सत्तेत असलेला शिवसेना आणि विरोधात असलेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांवरच गुन्हे दाखल झाले आहेत. कुंडलीक खांडे (Shiv Sena) आणि राजेंद्र मस्के (BJP) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधित माहिती अशी, गेल्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये चालत असलेल्या गुटख्याच्या अवैद्य व्यापारामध्ये कुंडलिक खांडे यांचा हात असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्यानंतर कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिवसेनेने बीड जिल्हा प्रमुख पद काढून घेत खांडे यांचे काम थांबविले.
काल रात्री बीड जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी बीडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालवण परिसरातील राजेंद्र मस्के यांच्या जागेत चालणाऱ्या पत्त्याच्या क्लबवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी दीड लाख रुपयांच्या रोकडसह 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र ही जागा मदन मस्के म्हणजे राजेंद्र मस्के यांच्या भावाच्या नावाने असल्याचे राजेंद्र मस्के यांचे म्हणणे आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालणाऱ्या अवैध धंद्यांना या राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असतो हे कोणी वेगळ सांगायची गरज नाही. पण जेव्हा पक्षाचे प्रमुखच असे खुलेआमपणे अवैध धंदे करतात त्यावेळी त्यांच्या बगलबच्च्यांची असले धंदे करण्याची हिंमत मात्र आणखी वाढते.
शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि राजेंद्र मस्के यांचाही दावा आहे की ही जागा त्यांची नाही. आता खरतर राजकीय पक्ष चालवणाऱ्या धुरंधर राजकारन्यांनी आपले नेते खाली काय दिवा लावतेत हे बघायला पुढे आले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या