Mumbai Corona Update : मुंबईत आज आढळलेली नव्या कोरोनारुग्णांची(Mumbai Corona Update) संख्या आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या समसमान असल्याचा योगायोग आढळला आहे. याआधी देखील 7 एप्रिल, 2022 रोजी असाच योगायोग आढळला होता. दरम्यान आज मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 35 कोरोनाबाधित आढळले असून 35 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.  



नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 305 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 35 रुग्णांपैकी तीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 151 बेड्सपैकी केवळ 20 बेड सध्या वापरात आहेत. 


राज्यात 90 नवे कोरोनाबाधित


राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आता जवळपास नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात आज कोरोनाच्या 90 रुग्णांची नोंद झाली असून आज राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 115 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.  राज्यात आज एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे राज्यातील कोरोना मृत्यूदर हा 1.87 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26,576 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 98.11 टक्क्यांवर पोहोचले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha