Maharashtra Corona Update : कोरोनाचे (Corona)रुग्ण अजूनही सापडत असून कोरोना संपूर्णपणे संपला नसल्याचं आरोग्य विभागाकडून सांगितलं जात आहे. दरम्यान मागील असून 24 तासांत राज्यभरात 231 नवी रुग्ण आढळले आहेत. तसंच एका कोरोनाबाधिताचा मृत्यू देखील झाला आहे. सर्वाधिक 111 रुग्ण मुंबईत आढळले असून याशिवाय 164 जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. 164 कोरोनामुक्त झाल्यानंतर आजवर एकूण 79,72,168 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.14% एवढे झाले आहे.
आज राज्यात आढळलेल्या 231 नवीन कोरोनारुग्णांमुळे राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 2432 इतकी झाली आहे. तसंच आज एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82% इतका झाला आहे. मागील 24 तासांत तपासण्यात आलेल्या 8,49,61,336 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,24,925 (9.56 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
देशांत आढळले 2424 नवे कोरोनाबाधित
देशांतर्गत आढळलेल्या कोरोनाबाधितांचा विचार करता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 2 हजार 424 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात काल अर्थात रविवारी 2 हजार 756 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनाबाधित आणि मृत्यू या दोन्हींच्य संख्येत तुलनेनं घट झाल्याचं दिसून येतंय. कोरोना रुग्णांच्या संख्येत 332 रुग्णांची घट झाली आहे. तसंच देशव्यापी लसीकरणामुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे. देशात आतापर्यंत 218 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशात 91 हजार 458 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 89.71 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहे.
हिवाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन
सध्या राज्यातील कोविड आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत असले तरीही हिवाळ्यामध्ये हे प्रमाण वाढू शकते असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. यानुसार गर्दीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी तसंच केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे लसीकरण करु घ्यावं. तसेच सर्दी खोकला अशी लक्षणे आहेत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळवं.
हे ही वाचा :
वेल डन इंडिया! कोरोना काळात गरीब देशांना मदतीचा हात, जागतिक बँकेकडून कौतुक