LIVE UPDATES | खदाणीत बुडालेल्या आई व बहिणीला वाचवण्यास गेलेली 16 वर्षीय मुलगी बुडाली, डोंबिवलीतील घटना

INDvsAUS : कर्णधार अजिंक्य रहाणेचे शानदार शतक, टीम इंडिया सुस्थितीत लातूरमध्ये बनला पहिला रेल्वे कोच, उद्दिष्ट वेळेत पूर्ण, मराठवाड्यासाठी आशादायी चित्र भारत भालके यांच्या निधनाने रिक्त जागेवर पार्थ पवारांच्या नावाची जोरदार चर्चा Mann Ki Baat : '2020 वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं तसंच शिकवलं' - पंतप्रधान मोदी देशभरासह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, आर्थिकसह खेळ आणि मनोरंजनाबाबत महत्वाचे अपडेट्स सोबतच दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jan 2021 11:45 AM

'ईडीच्या नोटीसीबाबत मला कोणीच सांगत नाही. हे सारं भाजपचेच नेते म्हणत आहेत. त्यामुळं माझा माणूस भारतीय जनता पाक्षाच्या कार्यालयात माणूस पाठवला आहे. तिथं नोटीस अडकली असावी. हे सर्व राजकारण सुरु आहे'. वर्षा राऊत यांना ईडी नोटीस मिळाल्या प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया. विस्तृत स्वरुपात शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेतच बोलेन, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.
बेल्जियममध्ये सांताक्लॉजचं गिफ्ट प़डलं महागात. सांताक्लॉज झालेल्या व्यक्तीकडून कोरोनाचा प्रसार झाल्यानं एकच खळबळ.
मुंबईच्या वडाळा येथील प्रतिक्षा नगरमध्ये क्रमांक टी -4 इमारतीला आग. आगीत सुदैवानं जीवीत हानी नाही. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लागली आग.
शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला साईदरबारी काकड आरतीसाठी उपस्थित राहण्याची इच्छा असते. पण, इथं काकड आरतीसाठी तब्बल 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी केल्याचा आरोप काही महिला भााविकांनी केला आहे. परराज्यातून आलेल्या महिला भाविकांच्या या आरोपामुळं एकच खळबळ माजली आहे. महिला भाविकांच्या या आरोपासंदर्भात एबीपी माझानं मंदिर प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यांच्याकडून अद्यापही कोणतंच उत्तर देण्यात आलेलं नाही.
डोंबिवली कोळेगावातील हृदयद्रावक घटना
,
खदाणीत बुडालेल्या आई व बहिणीला वाचवण्यास गेलेली 16 वर्षीय मुलगी बुडाली
,
लावण्या अस मुलीच नाव
,
अग्निशमन विभागाकडून खदाणीत शोध कार्य सुरू
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस, 29 तारखेला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी नोटीस
युके वरून आलेला 29 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव .आत्तापर्यंत युके वरून आलेले दोन जण पॉझिटिव्ह. औरंगाबाद शहरामध्ये आत्तापर्यंत 47 व्यक्ती युके वरून आले आहेत. यातील सहा जण परत गेले आहेत. 23 जणांचा टेस्ट करण्यात आली त्यातील 21 जण निगेटिव तर दोन जण पॉझिटिव्ह.. अद्यापही 5 व्यक्तींचा मनपा शोध घेत आहे...
औरंगाबाद महंत गणेशपुरी महाराज मारहाण प्रकरण. गणेश पुरी महाराजांच्या फिर्यादीवरून 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. गणेशपुरी महाराजांवर गावकऱ्यांनी केली होती दगडफेक...
19 लाखांच्या रकमेसह एटीएम चोरीला. चोरट्यांनी एटीएमला दोर बांधून मशीन पळवलं. पुण्यातील शिक्रापूरमधील गटना. महिला वेशात येत चोरट्यांनी पळवलं एटीएम मशीन.
गॅस दरवाढीच्या विरोधात परभणीत आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृहापासून निकामी सिलेंडर घेऊन मोर्चा काढत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर रस्त्यावर चूल मांडून या महिला कार्यकर्त्यांनी स्वयंपाक केलाय आणि केंद्र सरकारचा निषेध केला आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
सावत्र आईने 9 वर्षीय मुलाला गरम तव्यावर उभे करून दिले होते चटके. या प्रकरणात, मुलाच्या मामाच्या तक्रारीवरुन सावत्र आई शारदा शिंगोटे हिच्यावर बोराखेड़ी पोलिसात गुन्हा दाखल, 19 डिसेंबरला घटना उघडकीस आली होती, नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथील घटना, पीड़ित 9 वर्षीय मुलगा आधी अकोला व आता 20 तारखेपासून बुलढाणा सामान्य रुग्णालयात भरती, कलम 326 सह कलम 75 बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत गुन्हा दाखल
भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सांगोला तालुक्यातील लोटेवाडी- अचकदाणी रोडवरील सातारकर वस्ती जवळ घडला. विक्रम उर्फ विकी उत्तम खांडेकर या 20 वर्षाच्या तरुणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
शेतकरी संघटनांनी सरकारसोबत चर्चेची तयारी दाखवली आहे पण त्यासाठी खालील अटी घातल्या आहेत.

29 डिसेंबरला चर्चा करू, सरकारने या बैठकीचा अजेंडा ठरवावा असं पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे

चर्चेचा चेंडू आता पुन्हा सरकारच्या कोर्टात, सरकार या अटी मान्य करणार?
लंडन वरून आलेल्या ८७ प्रवाशांचे मनपा कडून ट्रेसिंग सुरू. उपचारासाठी वेगळ्या कोरोना सेंटरची स्थापना.. नवी मुंबईत लंडन वरून आलेले ८७ प्रवाशी दाखल झाल्याने महानगर पालिका आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. लंडन वरून आलेल्या प्रवाशांचे ट्रेसिंग सध्या महानगर पालिका करीत आहे. यासाठी संबंधीत प्रवाशांच्या पत्त्यावर आरोग्य विभागाचे डॉक्टर जावून लंडन वरून आलेला प्रवाशी आणि त्याच्या घरातील सदस्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास उपचारासाठी वेगळ्या कोरोना सेंटरची उभारणी सानपाड़ा येथे करण्यात आली आहे. सुदैवाने गेल्या दोन दिवसात लंडन वरून आलेला व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह आढळून आलेला नाही. मात्र यानंतरही चोख खबरदारी घेण्याचे आदेश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
लंडन वरून आलेल्या ८७ प्रवाशांचे मनपा कडून ट्रेसिंग सुरू. उपचारासाठी वेगळ्या कोरोना सेंटरची स्थापना.. नवी मुंबईत लंडन वरून आलेले ८७ प्रवाशी दाखल झाल्याने महानगर पालिका आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. लंडन वरून आलेल्या प्रवाशांचे ट्रेसिंग सध्या महानगर पालिका करीत आहे. यासाठी संबंधीत प्रवाशांच्या पत्त्यावर आरोग्य विभागाचे डॉक्टर जावून लंडन वरून आलेला प्रवाशी आणि त्याच्या घरातील सदस्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास उपचारासाठी वेगळ्या कोरोना सेंटरची उभारणी सानपाड़ा येथे करण्यात आली आहे. सुदैवाने गेल्या दोन दिवसात लंडन वरून आलेला व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह आढळून आलेला नाही. मात्र यानंतरही चोख खबरदारी घेण्याचे आदेश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
एमआयडीसी भूखंड प्रकरणी ईडीची नोटीस आल्याची एकनाथ खडसेंची माहिती, 30 डिसेंबरला चौकशीसाठी येण्याचं समन्स.. भोसरी भूखंड प्रकरणाची यापूर्वीही अनेकदा चौकशी झाली आहे. सर्व तपास यंत्रणांना आणि चौकशी आयोगांना वेळोवेळी सहकार्य केलं आहे. यापूर्वी चार वेळा चौकशी झालीय, आता ईडी पाचव्यांदा चौकशी करणार आहे.
भिवंडी शहरातील कचेरीपाडा परिसरात मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या भिंतीला लागून असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीच्या ट्रांसफार्मरला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रांसफार्मरला लागलेली आग काही वेळातच नियंत्रणात आणली. त्यामुळे ट्रांसफार्मरचा स्पोर्ट न होता मोठी हानी टळली आहे
जालना : EWS आरक्षणाच्या जीआरमध्ये अनेक त्रुटी असल्याचा विनायक मेटे यांचा आरोप.. EWS आरक्षणाचा निर्णय मागच्या सरकार सारखाच या सरकारने चुकीचा निर्णय घेतला असून 23 डिसेंबरच्या जीआरमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांचा कुठलाच उल्लेख नाही शिवाय शैक्षणिक प्रवेशाचा देखील यात उल्लेख नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केलाय. दरम्यान SEBC च्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असून काही लोकांना याचा परिणाम सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर होईल, असं वाटतं.. याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे असंही विनायक मेटे म्हणाले.
यवतमाळ : सहाय्यक प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न.. आत्महत्या करीत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, यवतमाळच्या जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक मोहम्मद वसीम यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.. अभियंत्रिकी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात ते कार्यरत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सचिव हे मानसिक त्रास देतात आणि पगार पूर्ण देत नाहीत म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय. प्राध्यापक गळफास लावून आत्महतत्येचा व्हिडिओ शूट करीत असतानाच महाविद्यालयाचे अन्य दोन प्राध्यापक धावत आले, त्यांच्या प्रसंगावधानामुळेच सहायक प्राध्यापक मोहम्मद वसीम यांचा जीव वाचला. या प्रकरणाचा यवतमाळ ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत 
पुणे : सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सिंहगडावर जाण्यासाठी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झालीय. सिंहगडावर गेलेली वाहन जोपर्यंत खाली परत येत नाहीत तोपर्यंत खालच्या वाहनांना वर न पाठवण्याचा निर्णय पोलीस आणि वन विभागाने घेतला आहे. सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध कोंढणपूर फाट्याजवळ वाहनांना थांबवण्यात आलंय. त्यामुळे सिंहगडावर जाण्यासाठी निघालले पर्यटक कित्येक तास या वाहतूक कोंडीत अडकून पडलेत. सिंहगडावर जाणारा रस्ता अरूंद असल्यानं अनेक ठिकाणी वाहनं समोरसमोर आल्याने वाहतूक कोंडी झालीय.
पुणे : सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सिंहगडावर जाण्यासाठी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झालीय. सिंहगडावर गेलेली वाहन जोपर्यंत खाली परत येत नाहीत तोपर्यंत खालच्या वाहनांना वर न पाठवण्याचा निर्णय पोलीस आणि वन विभागाने घेतला आहे. सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध कोंढणपूर फाट्याजवळ वाहनांना थांबवण्यात आलंय. त्यामुळे सिंहगडावर जाण्यासाठी निघालले पर्यटक कित्येक तास या वाहतूक कोंडीत अडकून पडलेत. सिंहगडावर जाणारा रस्ता अरूंद असल्यानं अनेक ठिकाणी वाहनं समोरसमोर आल्याने वाहतूक कोंडी झालीय.
ब्रिटनहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 69 जणांची यादी कल्याण डोंबिवली महापालिकेला दिली आहे. या मधील 20 जणांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. या 20 जणांमधील एकाची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. हा नागरिक डोंबिवली पूर्व येथील आहे. तर उर्वरित प्राप्त अहवाल हे निगेटिव्ह आले असून काही जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने सदर नागरिकाची प्रकृती स्थिर असून त्यास इतर कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. सदर नागरिकास विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून या नागरिकाचा चाचणी अहवाल जनुकिय रचनेच्या तपासणीसाठी मुंबई येथून NIV पुणे येथे पाठविण्यात आल्याचे सांगितले आहे.
लोणी काळभोर (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात एका धावत्या खाजगी प्रवासी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणली. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. टायरचे घर्षण झाल्याने ही आग लागल्याचे बसचालकाने सांगितले. नांदेड जिल्ह्यातील मुखेडहून ही बस प्रवाशी घेऊन चाकणकडे निघाली होती. मात्र, लोणी परिसरात आली असता अचानक या बसला आग लागली. टायर जॅम होऊन झालेल्या घर्षणामुळे ही आग लागली असल्याचे चालकाकडून सांगण्यात आले. आग लागल्याचे दिसताच चालकाने प्रवाशांना प्रसंगावधान राखत खाली उतरवले. त्यानंतर याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. जवानांनी आग आटोक्यात आणली.
रायगड : अलिबागजवळ वाहनांची मोठी रांग.. अलिबाग आणि मुरूडकडे जाणाऱ्या वाहनांची रांग... अलिबाग शहर ते कार्लेखिंड दरम्यान वाहनांच्या सुमारे ४ किलोमीटर पर्यंत रांगा...
महाविकास आघाडीने वैध मराठा आरक्षणाचा खून केला आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे नेते श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. पुण्यातील पत्रकारपरिषदते ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला विकास पासलकर, श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, राजेंद्र कुंजीर उपस्थित होते. राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेला येणार असल्याचं आधी सांगितलं होतं. पण ऐनवेळी ते आले नाहीत. या वेळी बोलताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ज्या ईडब्लूएस आरक्षणाची मागणी केलेलीच नव्हती ते आरक्षण देऊन महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. पाठीत खंजीर खुपसला आहे. ईडब्लूएसमध्ये बहुतांश मराठा समाज येत नाही." तसंच यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. "मुख्यमंत्री तसंच मदत व पुनर्वसन मंत्री हे सर्व समाजाचे असतात. मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये होऊ देणार नाही, असं विजय वडेट्टीवार नेहमी बोलतात. पण वडेट्टीवार हे न्यायालय आहेत का? वडेट्टीवार हे मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावत आहेत."
अहमदनगर : मराठा समाजाच्या SEBC आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना EWS मधून नियुक्ती दिली जाणार आहे. मात्र, ज्यांचे उत्पन्न आठ लाखांहून अधिक आहे, त्यांचा खुल्या प्रवर्गात समावेश करून त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने मेरीट यादी लावली जाणार आहे. याबाबत बोलताना मराठा समाजातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असून तो ऐच्छिक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. मात्र 'ईडब्ल्यूएस' च्या निकषाबाहेर जाऊन काही होत असेल तर त्याबाबत चर्चा करणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले
अंबरनाथ (ठाणे) मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड लाख रुपये किमतीचं मेफोड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे तर त्याचा साथीदार मात्र निसटण्यात यशस्वी झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बबलू उर्फ विवेक मोरे असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा साथीदार संजय गायकवाड हा फरार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर खालापूरनजीक वाहनांच्या रांगा.. खालापूर टोल नाक्याजवळ आणि पुढे बोरघाटातही वाहतूक कोंडी.. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी.. खालापूर टोलजवळ सुमारे ५०० मीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत तर, बोरघाटात अमृतांजन ब्रिजवर मुंबईच्या दिशेला वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे
मराठा समाजासाठीच्या SEBC आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने नियुक्तीच्या प्रतीक्षेतील दोन हजार 125 उमेदवारांना EWS मधून नियुक्ती दिली जाणार आहे. मात्र, ज्यांचे उत्पन्न आठ लाखांहून अधिक आहे, त्यांचा खुल्या प्रवर्गात समावेश करून त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने मेरीट यादी लावली जाणार आहे. त्यात 'एमपीएससी'च्या 420 उमेदवारांचा समावेश आहे. हा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीपुढे येणार आहे. त्यात तलाठी किंवा मेट्रो आणि राज्य लोकसेवा आयोग ह्याच्या जागा आहेत.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे फायदे सांगत होते. त्याचवेळी पंतप्रधान पीक विमा योजनेतला महाराष्ट्रातला गोंधळ बाहेर येत होता. गेल्या दोन दिवसापासून एबीपी माझा पिक विमा भरपाई देणाऱ्या खासगी कंपन्यांची पिक विमा न देण्यासंदर्भातील वृत्त प्रसारित करत आहे. काल मात्र मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 1 हजार 100 रुपयांचा विमा हप्ता भरल्यानंतर सहा महिन्यांनी 1 हजार 800 रुपयांचे धनादेश प्राप्त झाले. त्यामुळे संतप्त दोन शेतकऱ्यांनी ते धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परत पाठवले आहेत. शनिवारी उर्वरित 18 शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही धनादेश पाठवणार आहेत
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे फायदे सांगत होते. त्याचवेळी पंतप्रधान पीक विमा योजनेतला महाराष्ट्रातला गोंधळ बाहेर येत होता. गेल्या दोन दिवसापासून एबीपी माझा पिक विमा भरपाई देणाऱ्या खासगी कंपन्यांची पिक विमा न देण्यासंदर्भातील वृत्त प्रसारित करत आहे. काल मात्र मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 1 हजार 100 रुपयांचा विमा हप्ता भरल्यानंतर सहा महिन्यांनी 1 हजार 800 रुपयांचे धनादेश प्राप्त झाले. त्यामुळे संतप्त दोन शेतकऱ्यांनी ते धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परत पाठवले आहेत. शनिवारी उर्वरित 18 शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही धनादेश पाठवणार आहेत
पवईच्या एल अँड टी जवळ आज सकाळी सिमेंट मिक्सर उलटल्याने अपघात झाला असून सिप्झ कडून गांधीनगर कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. चालकाचा स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली असून या घटनेत चालक बचावला आहे. एल अँड टी उड्डाणपु लावर हा मिक्सर उलटल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले असून हा मिक्सर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
शॉर्ट सर्किटमुळे गवताने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आग,

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कोते इथली घटना,

ट्रॉली मधील गवत जळून खाक, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
पुणे शहरात दोन वेळा गवा घुसल्यानंतर कोल्हापूर शहराच्या उपनगरामध्ये देखील चार गव्यांचे दर्शन नागरिकांना झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा या परिसरात नागरिकांना गव्याच्या कळपाचे दर्शन झालं. काल रात्री गवे पाहिल्यानंतर आज पहाटे देखील फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना उसाच्या शेतात गवे आढळून आले. या घटनेनंतर वनविभाग, पोलीस दल आणि अग्निशमन दल यांच्याकडून गव्याच्या कळपाचा शोध सुरू झाला आहे. लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा या परिसरात उसाची शेती आहे.त्याचबरोबर जंगलाचा भाग देखील येतो.त्यामुळे गावे जंगलातून खाली उतरून उसाच्या शेतीपर्यंत पोहोचले आहेत. आता अग्निशामन दलाने बॅरिकेट लावून या परिसरातील वाहतूक बंद ठेवली आहे. गवे कोल्हापूर शहरात घुसू नये याच्यासाठी वन विभाग आपली टीम घेऊन त्या ठिकाणी सज्ज झाले आहेत
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावमधील जवान सुनील काळे अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले होते. त्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. गुरुवारी उपसचिव यांच्या हस्ताक्षर शहीद जवानांच्या वारसांना सरकारकडून एक कोटी रुपयांच्या मदतीचे परिपत्रक जारी झालं आहे.
एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस, सूत्रांची माहिती. पण, आपल्याला अशी कोणतीही नोटीस आलेली नाही असं खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र ही संचारबंदी तसेच कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कल्याण पश्चिमेकडील गांधारी या उच्चभ्रू वस्तीमधील चस्का कॅफेमध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरु होते .याबाबत कल्याण क्राईम ब्रांचला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचने शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास कॅफेच्या नावाखाली सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला. या छाप्या दरम्यान 100 हून अधिक तरुण तरुणी या ठिकाणी हुक्क्याच्या नशेत झिंगत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ ग्राहकांसह कॅफे मालक आणि कर्मचाऱ्यांना नोटीस देत तब्बल 80 हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल केला. हुक्क्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना धमकी. अज्ञात व्यक्तीकडून आला फोन. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
'देवेंद्रजी... मी कोल्हापूरला परत जाणार', राजकीय वर्तुळात चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुणे- कोल्हापूर आणि चंद्रकांत पाटील हे नातं काही नवं नाही. त्यामुळंच यासंदर्भातील अनेक चर्चांना वाव मिळत आहे.
धारावीत आज कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही. धारावीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे. एक आकडी रुग्णसंख्येवरुन आता शून्य रुग्णापर्यंतची वाटचाल सकारात्मक. आता आव्हान असेल ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्याचं.
कोणत्याही सरकारनं शेतकऱ्यांविरोधी भूमिका घेतलेली नाही. फक्त मोदींच्याच नेतृत्त्वात शेतकऱ्यांना फायदा झाला असं नाही. भारत कृषीप्रधान देश आहे याचं श्रेय कुणाला द्यायचं? -संजय राऊत
कोणत्याही सरकारनं शेतकऱ्यांविरोधी भूमिका घेतलेली नाही. फक्त मोदींच्याच नेतृत्त्वात शेतकऱ्यांना फायदा झाला असं नाही. भारत कृषीप्रधान देश आहे याचं श्रेय कुणाला द्यायचं? -संजय राऊत
बार्शी (सोलापूर) : राज्यभरात बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आमदारांनी लाखो रुपयांच्या बक्षिसाचं आमिष दिलेलं आहे. यातच बार्शीतील भगवंत ब्लड बँकेने अनोखी घोषणा केली आहे. बार्शी तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती एकमताने बिनविरोध निवडणूक करतील त्या गावातील सर्व ग्रामस्थांना पाच वर्षे मोफत रक्त पुरवठा करण्याचे आश्वासन ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी दिले आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी ही संकल्पना मांडली होती. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होणारा अनावश्यक खर्च वाचवून त्यामधून गावाचा विकास करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा ब्ल़ड बँकेचा दावा आहे.
कांदिवलीतील अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रस्तावित पुतळ्याचं भूमिपूजन रद्द. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना मुंबईत येऊनही कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, काल वाशी टोलनाक्या जवळ मुंबईच्या दिशेने जाताना झाला अपघात, एकनाथ शिंदे यांच्या हाताच्या अंगठ्याला लागला मार, अपघातातून थोडक्यात बचावले, अपघातात गाडीचे मोठे नुकसान
राज्य सरकारनं राज्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून 3721 कोटी रुपये मदत द्यावी असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रसरकारडे पाठवला आहे.. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 5998 कोटीच्या भरपाईचा प्रस्तावानुसार, पहिल्या टप्प्यात 2297 कोटीची मदत मिळाली आता दुसऱ्या टप्प्यात 2211 कोटीची मदत दिली जाणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांची 33 टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून मदत मिळवण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे
विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिरात आज सकाळ पासूनच ई-पासधारक भक्तांची गर्दी झाली आहे. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी आहे. पुढील तीन दिवसांचं ऑनलाईन दर्शन फुल झाल्याचं मंदिर समितीकडून कळवण्यात आलंय. दररोज फक्त नऊ हजार ऑनलाईन पास धारक भाविकानाच दर्शन घेण्याची परवानगी आहे.
नाताळच्या सुट्टीत साईदर्शन घेण्यासाठी अनेकांनी शिर्डीला पसंती दिली आहे.. मात्र या वर्षीची गर्दी थोडी कमी आहे. गेल्या वर्षी लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेले होते, यावेळी मात्र कोरोनाच्या संकटामुळे साईदर्शनाला कमी गर्दी असल्याचं चित्र आहे.. साईबाबा संस्थानने गर्दीच्या पार्श्वभूमीवर दर्शनाची मर्यादाही वाढवली आहे. बारा ते पंधरा हजार भाविकांना दररोज दर्शन घेता येतं
कोल्हापूर : सलगच्या सुट्ट्यांमुळे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये वाढ झाली आहे... आज ख्रिसमसच्या निमित्ताने सुट्टी आहे...तर उद्या शनिवार आणि परवा रविवार आहे...त्यामुळे सलग तीन दिवस सुट्टीचे मिळत असल्याने भाविकांनी आणि पर्यटकांनी अंबाबाई मंदिराचा परिसर गर्दीने फुलून गेला आहे... पूर्व दरवाजासमोर देवस्थान समितीने दर्शन रांग तयार केली आहे... ती रांग भवानीमंडप पर्यंत पोहोचली आहे...
सोलापूर : करमाळा परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याने मोठी दहशत पसरली आहे. आज पहाटे बिबट्याने वांगी नंबर एक मधील मयूर जाधव यांच्या चार पाळीव कुत्र्यांची शिकार केल्याने पुन्हा दहशत वाढली आहे. दरम्यान हे ठसे तरसाचे असल्याचा दावा काही वन अधिकारी करीत असले तरी ही शिकार बिबट्यानेच केली असल्याचा दावा ग्रामस्थ करीत आहेत.

बिटरगाव परिसरात दहशत माजवलेल्या सोनबा या नरभक्षक बिबट्याची शिकार केल्यावर या परिसरातील दहशत कमी होईल असे वाटत असतानाच पुन्हा दुसरा बिबट्या दिसल्याने परिसरात दहशत पसरली आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरे लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थ करू लागले आहेत
पुण्यात मनसे अमेझॉन विरोधात आक्रमक.. पुण्यात कोंढव्यातील अमेझॉनचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं
मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांची मोठी रांग... खालापूर टोल ते माडप दरम्यान वाहनांची मोठी रांग ... पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे चार किलोमीटर वाहनांची रांग ...
मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांची मोठी रांग... खालापूर टोल ते माडप दरम्यान वाहनांची मोठी रांग ... पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे चार किलोमीटर वाहनांची रांग ...
सलग सुट्या असल्यानं मोठ्या संख्येने लोक पुण्यातुन बाहेर निघालेत. बाहेर जाणाऱ्या वाहनांमुळे कात्रज घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. कात्रजच्या नवीन बोगद्यापासुन ते खेड शिवापूर टोल नाक्यापर्यंत ही वाहतूककोंडी पाहायला मिळतेय.
सलग सुट्या असल्यानं मोठ्या संख्येने लोक पुण्यातुन बाहेर निघालेत. बाहेर जाणाऱ्या वाहनांमुळे कात्रज घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. कात्रजच्या नवीन बोगद्यापासुन ते खेड शिवापूर टोल नाक्यापर्यंत ही वाहतूककोंडी पाहायला मिळतेय.
भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर अडलेल्या पडघा टोलनाका येथे आज सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याने वाहनचालक कमालीचे हैराण झाले आहेत. मात्र टोल वसुली करणाऱ्या टोल कंपनीने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणतेही नियोजन केले नसल्याने प्रवाशांमध्ये टोल कंपनी विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आज नाताळच्या सुट्टी बरोबरच पुढील दोन दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मुंबईहून शिर्डी व नाशिकच्या दिशेने निघाले आहेत मात्र पडघा येथील टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांच्या आनंदात विरजण पडले आहे. काही महिन्यांपूर्वी याच टोल नाक्यावर वाहतूक कोंडीत अडकल्याने एका नागरिकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र त्याचा कोणताही परिणाम टोल कंपनीवर झालेला दिसत नाही. त्याच बरोबर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यास पिवळ्या पट्यातील वाहनांना टोल न आकारता सोडण्यात यावे असे निर्देश राज्य शासनाने दिले असतानाही शासनाच्या या नियमांकडे टोल कंपनीने पुरता दुर्लक्ष केले असून टोल वसुलीचा लालसेपोटी नागरिकांना वेठीस धरले जात असल्याने नागरिकांसह प्रवाशांकडून टोल कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भिवंडी : मुंबई नाशिक महामार्गावरील नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक टोलनाक्यामुळे खोळंबली ,

पडघा टोलनाक्यापासून 2 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा ,

आज ख्रिसमस डे असल्याने अनेक प्रवासी गावाकडे निघाल्याने वाहनांची गर्दी,
94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य समेलन नाशिकला घ्यावं नाशिककरांची मागणी, लोकहितवादी मंडळाने केली मागणी, मागील संमेलन उस्मानाबादला झाल्यानं नाशिककरांची संधी हुकली होती, साहित्यिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये  याआधी 78 वे साहित्य संमेलन झालंय, आयोजनाचा अनुभव असल्याने पुन्हा साहित्य संमेलन भरविण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडे अर्ज
दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, लडाखचे खासदार जम्यांग नामग्याल, भाजपचे सचिव विनोद तावडे यांनी बोरीवलीतील अटल उद्यानाला भेट दिली.

यावेळी उद्यानातील अटलजींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले
लोणावळ्यात आज रात्रीपासून 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. लोणावळा शहर, भुशी धरण, अॅम्बी व्हॅली, लवासासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा यात समावेश आहे. त्यामुळे नाताळ आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटनस्थळी गेलात तर तुम्हाला रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत बाहेर वावरता येणार नाही.
यूकेहून आलेला नागपूरचा 'तो' रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. पण त्याला भारतात परतून एक महिना झाला. त्याची अँटिजेन पोझिटिव्ह आली होती. तो आल्यानंतर घरचे सर्व आणि गोंदियाला गेला होता तिथले लोक पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे त्यालाही कोरोनाची लागण होऊन गेल्याची शक्यता आहे. पण आता तो निगेटिव्ह आल्यामुळे हा स्ट्रेन नक्की कोणता, याचे जिनोम टेस्टिंग करायचे असेल, तर एनआयव्ही आणि आयसीएमआरला पॉलिसी निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी सांगितले की, त्याचे जे नातेवाईक अजूनही पॉझिटिव्ह आहेत त्यांचे सॅम्पल आज जिनोम टेस्टिंगसाठी एनआयव्हीला पाठवले जाणार आहेत.
कळंबा कारागृह सापडलेल्या गांजा साठा आणि मोबाईल प्रकरणी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांना तातडीने पुणे येथील येरवडा कारागृह मध्ये हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कळंबा कारागृहातील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक कारागृह सुनील रामानंद आज सकाळी कोल्हापूर येथे दाखल झाले आहे. कारागृहातील गांजा आणि मोबाईल प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षारक्षकांना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेळके यांना पुण्याला येरवडा कारागृह हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक रामानंद यांनी दिली.
राज्य सरकारपाठोपाठ नाशिक महापालिकेत ड्रेसकोड, अधिकारी कर्मचाऱ्यांना जीन्स पॅन्ट, टी शर्ट, स्लीपर घालण्यालाही बंदी, आठवड्यातून एक दिवस खादीचे कपडे घालण्याची सक्ती, महिलांना साडी, सलवार कुर्ता आदी पेहराव, चित्र विचित्र, नक्षीदार कपडे घालू नयेत
कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द, गेल्या दोन महिन्यांपासून व्यवहारावर आणले होते निर्बंध, ठेवीदारांचे पैसे परत देता येईल इतकी मालमत्ता असल्याचा आरबीआयच्या पत्रात उल्लेख, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बँकेच्या एकूण 13 शाखा आहेत, 100 कोटीपर्यंत ठेवी पोहचल्या होत्या, मात्र गेल्या दोन वर्षात अनेकांनी ठेवी काढून घेतल्या, सध्या बँकेत एकूण 40 ते 50 कर्मचारीच काम करत आहेत, 2003 च्या सुमारास उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी या बँकेची स्थापना केली होती
पुणे महापालिकेच्या हद्दीतील नववी ते बारावीच्या शाळा चार जानेवारीपासुन सुरू करण्यास परवानगी. शाळा सुरु करताना करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जे नियम आणि अटी घालून देण्यात आलेल्या आहेत त्यांचं पालन करावं लागणार.
पुण्यातील जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये आज चांगलाच राडा झाला. हॉस्पिटल मधील नर्सेस आणि बाऊंसरमध्ये हाणामारी झाली. इथे काम करणाऱ्या नर्सेस आणि वॉर्ड बॉईजचे पगार रखडलेले आहेत. ते आज दिले जात होते. त्याच दरम्यान तिथल्या बाऊंसर्स आणि हाऊस कीपिंग कर्मचाऱ्यांना सोबत त्यांची वादावादी झाली. यातून दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना भिडले. घटनेनंतर दोन्हीकडील कर्मचारी तक्रार देण्यासाठी शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये गेले आहेत.
सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) लाभ घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्याकरिता शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रमनिहाय अर्ज करण्याच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. अभ्यासक्रमनिहाय माहितीसाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. प्रत्येक अभ्यासक्रमची मुदतवाढ वेगवेगळी असणार आहे साधारणपणे 1 आठवडा मुदत वाढवून दिली जाणार आहे. सीईटीच्या वेबसाइटवर सुधारित वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे.
एबीपी माझावर पिक विम्याच्या गोंधळ संदर्भात बातमी दुपारी प्रसारीत झाली. दुपारी बातमी प्रसारित झाल्यानंतर पिक विमा कंपनीच्या तातडीच्या हालचाली ज्यांना पिक विमा मंजूर झाला आहे, त्यांना संध्याकाळी पाचच्या सुमाराला खात्यावर किती पैसे वर्ग केले. परंतु, ज्यांना पीक विमा मंजूर झाला नाही ज्यांचे पिक विमा नाकारले त्यांचा प्रश्न कायम.
सत्ता सुंदरी हातातून निसटल्याने आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था देवदास सारखी झालीय. पिंजऱ्यातील मास्तर म्हटलेल्या शेलार यांना राजू शेट्टी यांचं प्रत्युत्तर. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पद मिळवताना पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं? आशिष शेलार यांना राजू शेट्टी यांचा सवाल.
सरळ सेवेतील भरती प्रक्रिया करण्यासाठी काळ्या यादीतील कंपनीची निवड झाल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत सरकारने भरती प्रक्रिया महा ऑनलाइन पोर्टल नुसार न घेता एमपीएससी मार्फत करावी अशी मागणी केलीय. पुन्हा काळ्या यादीतील कंपनीची निवड झाली तर भ्रष्टाचार होऊ शकतो अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलीय.महाआयटी कडून दोन काळ्या यादीतील कंपन्यांची निवड करण्यात आलीय. १५ दिवसांत हा निर्णय बदलला नाहीतर राज्यातील विविध ठिकाणी मोर्चे काढू असा इशारा या विद्यार्थ्यांनी सरकारला दिलाय.
मनसे विरुद्ध अॅमेझॉन वाद आणखी पेटला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस. दिंडोशी सत्र न्यायालयाची नोटीस. 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश.
पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांना कोरोनाची लागण, 24 जण सायकलने गेले होते पंढरपूरला, परतल्यावर सर्वांना झाली कोरोनाची लागण, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जानोरीची घटना, पंढरपूरहुन भाविक आल्यानंतर इतरांनाही झाली लागण, आतापर्यंत 38 व्यक्ती पॉझिटिव्ह, ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याच्या जानोरी ग्राम पंचायतच्या सूचना, आज आणि उद्या कडक नियम पाळले जाणार
युकेतील लॉकडाऊनमुळं प्रियांका चोप्रा, रिंकू राजगुरु, संतोष जुवेकर परदेशातच अडकले. इतरही सेलिब्रिटी अडकल्याचा अंदाज. दुसऱ्या नव्या प्रकारच्या कोरोनाची दहशत.
कोल्हापूरच्या दाजीपूर अभयारण्यात पर्यटकांना प्रवेशबंदी. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर निर्णय. 30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत पर्यटकांना प्रवेश नाही.
नागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला नागपूरमधील 28 वर्षीय तरुण कोरोनाबधित आढळला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची अनेकांना लागण झाली आहे. त्यामुळे इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा तरुण कोरोनाच्या नवीन प्रकाराने बाधित असल्याचा संशय आहे. या कोरोना संशयितामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. बाधित तरुणावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा तरुण इंग्लंडमधून आल्यानंतर नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आला होता. या तरुणाच्या संपर्कात आलेले कुटुंबातील सदस्यांसह इतर काही जणही कोरोनाबाधित झाले आहेत.
मार्ग बदललेल्या गाड्या - 1. वास्को द गामा -निझामोद्दीन विशेष एक्सप्रेस पुणे, लोणावळा, पनवेल, इगतपुरी, मनमाड खंडवामार्गे धावेल, 2. कोल्हापूर-गोंदिया विशेष एक्स्प्रेस दौंड, पुणे, लोणवळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाडमार्गे धावेल. 3. गोंदिया-कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस मनमाड, इगतपुरी, पनवेल, लोणावळा, पुणे मार्गे धावेल, 4. दानापूर-पुणे विशेष एक्स्प्रेस मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणेमार्गे धावेल, 5. सांगोला-नरखेड विशेष एक्स्प्रेस पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाडमार्गे धावेल, 6. निझामुद्दीन-यशवंतपूर विशेष एक्स्प्रेस मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, मिरजमार्गे धावेल, 7. अहमदाबाद-यशवंतपूर विशेष एक्स्प्रेस मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणेमार्गे धावेल, 8. जम्मू तावी-पुणे विशेष एक्स्प्रेस मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणेमार्गे धावेल, 9. निझामुद्दीन-वास्को द गामा विशेष एक्स्प्रेस मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, मिरजमार्गे धावेल, 10. अंजनी-पुणे विशेष एक्सप्रेस मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणेमार्गे धावेल, 11. बंगळुरु-न्यू दिल्ली विशेष एक्स्प्रेस वाडी, सिकंदराबाद, बल्हारशाह, नागपूर, इटारसी मार्गे धावेल, 12. यशवंतपूर-निझामुद्दिन विशेष एक्सप्रेस पुणे, लोणावळा, पनवेल, इगतपुरी, मनमाड, खंडवा मार्गे धावेल, 13. पुणे-दरभंगा विशेष एक्स्प्रेस पुणे,दौंड, कुर्डुवाडी, लातुररोड, पिंपल खुटी, नागपूर, इटारसी मार्गे धावेल, 14. पुणे-जम्मू तावी विशेष एक्स्प्रेस पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, वसईरोड, रतलाम, मथुरामार्गे धावेल, 15. न्यू दिल्ली-बंगळुरु विशेष एक्स्प्रेस मनमाड, अकोला, पूर्णा, लातूररोड, कुर्डुवाडी, वाडी मार्गे धावेल, 16. कोल्हापूर-गोंदिया विशेष एक्स्प्रेस दौंड, पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे धावेल.
रेल्वेने प्रवाशांच्या सुविधासाठी गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सोलापूर विभागात 23 डिसेंबर रोजी दौंड-मनमाड सेक्शनमधील श्रीगोंदा-बेलवंडी स्थानकादरम्यान मालगाडीचे 12 वॅगन रुळावरून घसरल्यामुळे या सेक्शन दरम्यान धावणाऱ्या विशेष एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. त्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत. रद्द झालेल्या गाड्या 1. पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस, 2. कोल्हापूर-गोंदिया विशेष एक्स्प्रेस, 3. पुणे-मुंबई विशेष एक्स्प्रेस, 4. गोंदिया-कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस.
एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली. कोरोना आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी परवानगी नाकारली. निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी 31 डिसेंबरला पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी एल्गार परिषद घेण्यासाठी पोलिसांकडे अर्ज करून परवानगी मागितली होती.
परळी मधील इंडस्ट्रियल एरियामध्ये मोठी आग. कुलरची एजन्सी आणि कुलर नीट करण्याचे ठिकाण आहे, त्या ठिकाणी लागलेल्या आगीचे लोट पाहायला मिळतायेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात. अग्निशामक दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू.
कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात पुन्हा सापडले मोबाईल आणि गांजा. 10 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह, 5 चार्जर केबल आणि 775 ग्रॅम गांजा सापडला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. चारचाकी गाडीतून आलेल्या दोघांनी कपड्याच्या मदतीने साहित्य पुरवल्याची माहिती.
'शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या' अजित पवारांचे कार्यकर्त्यांना निर्देश. आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. आजच्या बैठकीत अजित‌ पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे. पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. लवकरच महामंडळ वाटप करु, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
अहमदनगर अर्बन बँकमध्ये 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिलीप गांधी हे अर्बन बँकेचे माजी चेअरमन आहेत. दिलीप गांधी यांच्यासह अर्बन बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम बल्लाळ, कर्जदार आशुतोष लांडगे यांच्यासह बँकेच्या इतर संचालक मंडळ सदस्यावर नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आलाय. अर्बन बँकेचे शाखाधिकारी रंगनाथ औटी यांनी फिर्याद दाखल केलीये. त्यानुसार हा गुन्हा दाखल झालाय. 7 ऑक्टोबर 2017 ते 10 डिसेंबर 2020 या दरम्यान दिलीप गांधी व इतर बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमताने, कट रचून बोगस कागदपत्रे बँकेत जमा केले आणि 3 कोटी रुपये काढून बँकेची फसवणूक केली असल्याचा आरोप फिर्यादीने केलाय. यपूर्वी देखील अर्बन बँकेने रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन न केल्याने 40 लाखांचा दंड करण्यात आला होता. त्यातच आता भाजपचे माजी खासदार आणि बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या नव्या विषाणू पार्श्वभूमीवर जनहितासाठी रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घेतला. नाईट कर्फ्यू जनेतच्या हितासाठी घेतला आहे. सबकुछ चलत है ही मानिसकता अजिबात चालणार नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच लोकलसंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असंही ते म्हणाले.
कोरोना लस चाचणीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण. मागील चार दिवसांतील मोठी घसरण.
वैद्यनाथ साखर कारखान्यात मोठी चोरी. 37 लाखांचं साहित्य चोरीला. परळी पोलीस स्थानकांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी उमेदवारांची मुंबईच बैठक. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उमेदवारांना करणार मार्गदर्शन. महत्त्वाच्या नेतेमंडळी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती.
फायझर, मॉडर्नाकडून नव्या कोरोनावर संशोधन सुरु. सध्याच्या लसीची नव्या कोरोनासाठीही चाचणी.
राज्यभरातील महाबीज कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी 9 डिसेंबरपासून कर्मचारी संपावर गेले होते. सरकारनं सातव्या वेतन आयोगाचे प्रत्येकी 35 हजार अग्रीम देण्याचे आश्वासन दिले आहे.
विधानसभा आणि लोकसभ निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईतील वाय बी चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक होत आहे. या बैठकीला अजित पवार, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, राजेश टोपे, नवाब मलिक उपस्थित आहेत. निवडणुकीतील पराभवाची कारणं आणि त्यावर उपाय यावर बैठकीत चर्चा होणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीची पक्ष बांधणीला सुरुवात झाली आहे.
आजपासून राज्यात ग्रामपंचायतींचा धुरळा उडणार आहे. 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ही मुदत 30 डिसेंबरपर्यंत लागू असेल. मुख्य म्हणजे सर्व राजकीय पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढवत असल्यामुळं रंगत आणखी वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर गाव पातळीवर पक्षवाढीसाठी महाविकास आघाडीतही लढाई पाहायला मिळत आहे.
येत्या 31 डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषद भरवण्याची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी त्यासाठी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच याठिकाणी एल्गार परिषद भरवण्याचा बी जी कोळसे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विचार आहे. स्वारगेट पोलिसांनी त्यांना प्राप्त झालेला अर्ज वरिष्ठांकडे पाठवला आहे. या परिषदेला परवानगी द्यायची की नाही याबाबत अजून निर्णय होणे बाकी आहे.
हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात आणि मुंबईतही तापमानात लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आलेली (Cold Wave) शीतलहर आता राज्यातही परिणाम दाखवू लागली आहे. महाराष्ट्रात मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान 9 अंश सेल्शिअसवर पोहोचलं आहे. परिणामी मुंबईच्या तापमानातही लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.
कल्याण : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूमूळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंगळवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कल्याणात पोलिसांकडून स्टेशन परिसरासह शहरातील चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली होती. पोलिसांकडून कल्याण स्टेशन परिसरात मास्क न घालणाऱ्या, विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर बैलबाजार परिसरात करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान मास्क न घालता गाडी चालवणाऱ्या चालकांवरही यावेळी कायदेशीर कारवाई करण्यात आली. पुढील 5 जानेवारीपर्यंत संचारबंदी आदेश असून अत्यावश्यक काम असल्याशिवाय रात्री 11 ते सकाळी 6 च्या दरम्यान लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन एसीपी अनिल पोवार यांनी केले. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
भिवंडी : राज्य सरकारने मंगळवारपासून सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील पोलीस विभागांकडून चौकांमध्ये आणि मुख्य रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. वंजार पट्टि नाका, साईबाबा, कल्याण नाका,धामणकर नाका ,अंजुरफाटा बाजारपेठ परिसरात पोलिसांनी बॅरीगेटिंग करून नाकेबंदी लावली होती येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वाहनांची चौकशी करून त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिले जात होते. तसेच परिसरात पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात आली होती. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांना अडवणूक करून त्यांची विचारपूस केली जात होती. मात्र या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या भाजीपाला, दूध ,मेडिकल, औषध विक्री यांसारख्या वाहनांना मुभा होती. मात्र विनाकारण फिरनाऱ्यांवर पोलीस कारवाई देखील करणार असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व सूचनांचे पालन याठिकाणी केले जात असून नागरिकांनी या नाईट कर्फ्यूमध्ये सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त केजी गावित यांनी यावेळी केलं आहे

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


TRP SCAM | BARC चे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांना अटक
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुरुवारी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काऊंसिल (BARC) चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक केली आहे. दासगुप्ता यांना पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाणे क्षेत्रातून अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्यातील ही 15 वी अटक आहे.  एका अधिकाऱ्याने सांगितलं की, दासगुप्ता यांना राजगड परिसरातून अटक केलं आहे आज, शुक्रवारी त्यांना स्थानिक कोर्टात आणलं जाईल. मुंबई पोलिसांनी याआधी BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया (Romil Ramgarhia) यांना अटक केली आहे.  बार्क या प्रेक्षक संख्येची पाहणी करणाऱ्या संस्थेशी संबंधित  रोमिल रामगढिया यांच्यानंतर पार्थ यांची दुसरी अटक आहे


मेडिकल प्रवेशासाठी पैसे उकळण्याचे दोन गुन्हे पोलिसांकडून उघड, टोळीसह सायन रुग्णालयाचा सहाय्यक अधिष्ठाता अटकेत
एमडी आणि एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो असे सांगून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात सायन रुग्णालयाच्या सहाय्यक अधिष्ठात्यालाही अटक करण्यात आली आहे. तर अशाच आणखी एका प्रकरणात ज्यामध्ये एक टोळी मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळवून देते असं सांगून लोकांकडून लाखो रुपये लुटायची त्या टोळीलाही पोलिसांनी गजाआड केलं आहे.


मुंबई पोलिसांच्या 'मिशन ऑल आऊट'ला यश, 24 तासातच मोठ्या कारवाया
मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्या 'मिशन ऑल आऊट' संकल्पनेला चांगलं यश मिळालं आहे. 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आपापल्या कार्यक्षेत्रात असतील. गुन्ह्याचा तपास, आरोपीचा शोध, नवीन गुन्हे घडू नये याची खबरदारी ही सर्व कामे 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून 'मिशन ऑल आऊट' राबवण्यात येत असून ज्या अंतर्गत मुंबईमधील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल. 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत मुंबई पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात दक्ष मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्या 'मिशन ऑल आऊट' संकल्पनेला चांगलं यश राहिले आणि जास्तीत जास्त कारवाई केली.


महामारी आली नसतील तर यंदा आलियासोबत लग्न झालं असतं : रणबीर कपूर
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यंदा त्यांच्या रिलेशनशिपवरुन फारच चर्चेत राहिले. दोघे लवकरच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाबाबतही सातत्याने चर्चा सुरु असते. जर कोरोव्हायरसची महामारी आली नसती तर दोघांचं आता लग्न झालं असतं. हे स्वत: रणबीर कपूर म्हणाला आहे. त्यामुळे 2021 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकतील अशी शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.