LIVE UPDATES | राज्यात तिन्ही वीज कंपन्यांचे कर्मचारी, अभियंते ऐन लक्षमीपूजनाच्या दिवशी संपावर

- नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारचा विकास करु : पंतप्रधान नरेंद्र मोदी - India Tour Of Australia : टीम इंडिया यूएईहून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना - जहाल नक्षलवादी रमेश मडावीला 10 वर्षानंतर अटक, गोंदिया पोलिसांची कारवाई - ठाण्यातील घोडबंदर रोड लवकरच होणार ट्राफिक मुक्त दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Nov 2020 08:54 PM
राज्यात तिन्ही वीज कंपन्यांचे कर्मचारी, अभियंते ऐन लक्षमीपूजनाच्या दिवशी संपावर
राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिवाळीच्या तोंडावर खुश खबर. अंगणवाडी सेविकांना 2 हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचा महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय. राज्यात एकूण 93 हजार सेविका, 88 हजार अंगणवाडी मदतनीस आणि 11 हजार मिनी अंगणवाडी सेविका यांना मिळणार भाऊबीज भेट. राज्य सरकारवर 38 कोटी 61 लाख रुपयांचा भार. कोरोना काळात अंगणवाडी सेविकांना घरोघरी काम केले होते. त्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाने बोनस जाहीर केला आहे.
देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील उद्योगधंदे बंद आहेत. अशातच अनेक आर्थिक अडचणींना समोरं जावं लागत असून भविष्यातही आर्थिक मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी हा 8.6 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सलग दुसऱ्या तिमाहीवर मंदीचं सावट असल्याचा रिझर्व बँकेने इशारा दिला आहे.
देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील उद्योगधंदे बंद आहेत. अशातच अनेक आर्थिक अडचणींना समोरं जावं लागत असून भविष्यातही आर्थिक मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी हा 8.6 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सलग दुसऱ्या तिमाहीवर मंदीचं सावट असल्याचा रिझर्व बँकेने इशारा दिला आहे.
देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील उद्योगधंदे बंद आहेत. अशातच अनेक आर्थिक अडचणींना समोरं जावं लागत असून भविष्यातही आर्थिक मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी हा 8.6 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सलग दुसऱ्या तिमाहीवर मंदीचं सावट असल्याचा रिझर्व बँकेने इशारा दिला आहे.
कोट्यवधी शेतकऱ्यांना 'किसान क्रेडिट'चा लाभ, किसान क्रेडिट कार्डसाठी 1 कोटी 83 लाख अर्ज, रब्बीच्या हंगामासाठी 25 हजार कोटी वितरीत : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
कोट्यवधी शेतकऱ्यांना 'किसान क्रेडिट'चा लाभ, किसान क्रेडिट कार्डसाठी 1 कोटी 83 लाख अर्ज, रब्बीच्या हंगामासाठी 25 हजार कोटी वितरीत : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
'आत्मनिर्भर 1.0' मधल्या घोषणेचे सकारात्मक परिणाम, 26 कोटी फेरिवाल्यांचा कर्जासाठी अर्ज, तर 68 कोटी जनतेला स्वस्त दरात अन्यधान्य : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
यवतमाळ : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्याची मागणी घेउन शेतकऱ्याने स्वतःला आपल्या शेत मातीत पुरुन घेऊन अभिनव आंदोलन पुकारले आहे. मोरेश्वर वातीले असं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचं नाव आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील जरुर येथे हे अभिनव आंदोलन करण्यात आले. सततचा पाऊस आणि बोगस बियाण्यामुळे खरिप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्या नसल्यामुळे उभ्या पीकात रोटावेटर आणि आग लावण्याच्या घटना समोर आल्यात असे असतांना स्थानिक प्रशासनाकडून चुकीची आणेवारी काढल्या गेल्याने घाटंजी तालुका शासकीय मदतीपासून वगळला गेला. याच्या निषेधार्थ जरुर येथील शेतकरी मोरेश्वर वातीले यांनी आपल्या शेतातील मातीत स्वतःला पुरुन घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात सावरतेय, परदेशी गुंतवणुकीतही वाढ झाली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
आज पासून दीपावलीचा उत्सव सुरू होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सह सर्व बाजार समिती मधील कांदा लिलाव दहा दिवस बंद राहणार आहे. तर भुसार मालाचे लिलाव आठवडाभर बंद राहणार आहे.
चंद्रपूर : अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने युवकाला चिरडले, राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील घटना, बकरी चरण्यासाठी निघालेल्या युवकाच्या मृत्यूने तणाव, गावातून वाळू तस्करी गाड्याबाबत ग्रामस्थांनी केल्या होत्या तक्रारी, गावात पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाची हजेरी

चंद्रपूर : अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने युवकाला चिरडले, राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील घटना, बकरी चरण्यासाठी निघालेल्या युवकाच्या मृत्यूने तणाव, गावातून वाळू तस्करी गाड्याबाबत ग्रामस्थांनी केल्या होत्या तक्रारी, गावात पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाची हजेरी

नाशिक : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे रस्त्यावर उतरले असून त्यांनी स्वतः मुख्य बाजारपेठेत पायी पेट्रोलिंग सुरू केले आहे. मागील आठवड्यात नाशिकच्या सराफ बाजरातून सराफा व्यवसायिकांची 20 लाख रुपयांची रोकड लंपास झाली होती. त्यामुळे व्यासायिकामध्ये भितेचे वातावरण तर आहेच शिवाय मुख्य बाजार पेठेत प्रचंड गर्दी असल्यानं त्यावर नियंत्रण मिळणेही पोलिसांना कठीण जात आहे, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पोलीस आयुक्तांनी हाती दंडुका घेवून कर्मचाऱ्यां सोबत घेत व्यावसायिकांमध्ये विश्वास निर्माण करम्याच प्रयत्न केलाच शिवाय अनावश्यक गर्दी टाळण्याच नागरिकांना आवाहन केले.
औरंगाबाद - चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमात राहत असलेल्या प्रियाशरण महाराज यांना 7 ते 8 अज्ञात लोकांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी फुलंब्री पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चौकापासून तीन किमी अंतरावर लाडसावंगी रस्त्यावर सताळा गावाच्या हद्दीत उंच डोंगरावर प्रियाशरण महाराज यांचे आश्रम आहे. हे आश्रम भव्य इमारतीत आहे. मंगळवारी मध्यरात्री 7 ते 8 अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी इमारतीचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. महाराज वरच्या मजल्यावर असल्याची माहिती दिली असता त्या लोकांनी वरच्या मजल्यावर जाऊन महाराज यांना मारहाण केली. यावेळी महाराज आणि अज्ञातांमध्ये झटापट झाली. प्रियाशरन महाराज यांच्या डाव्या हाताला चाकूने वार करण्यात आला. ते जखमी झाले त्यांना औरंगाबादमधील एका खाजगी उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
औरंगाबाद - चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमात राहत असलेल्या प्रियाशरण महाराज यांना 7 ते 8 अज्ञात लोकांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी फुलंब्री पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चौकापासून तीन किमी अंतरावर लाडसावंगी रस्त्यावर सताळा गावाच्या हद्दीत उंच डोंगरावर प्रियाशरण महाराज यांचे आश्रम आहे. हे आश्रम भव्य इमारतीत आहे. मंगळवारी मध्यरात्री 7 ते 8 अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी इमारतीचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. महाराज वरच्या मजल्यावर असल्याची माहिती दिली असता त्या लोकांनी वरच्या मजल्यावर जाऊन महाराज यांना मारहाण केली. यावेळी महाराज आणि अज्ञातांमध्ये झटापट झाली. प्रियाशरन महाराज यांच्या डाव्या हाताला चाकूने वार करण्यात आला. ते जखमी झाले त्यांना औरंगाबादमधील एका खाजगी उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केले आहेत. पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात सतीश चव्हाण तर पुणे विभागातून अरुण लाड यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज पत्रकार परिषद घेणार आहेत. दिवाळीच्या तोंडावर अर्थव्यवस्थेसाठी काही महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मीरा रोड पोलिसांनी शांती नगर परिसरातून दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून जवळपास 25 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. शांती नगर परिसरातील एका जागृत नागरिकाने पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोन आरोपींना अटक केली आहे. सध्या पोलिसांनी ड्रग्स पेडलर आणि माफियाविरोधात शहरात जनजागृती अभियान सुरु केलं आहे. त्याचा फायदा होऊन एका नागरिकाने संशयित व्यक्तीबद्दल माहिती पोलिसांना दिली. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन, त्यांची तपासणी केल्यावर, त्यांच्याजवळ गांजा आढळला. आरोपी प्रदीप दुबे आणि संतोष पांडे या दोघांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
रायगड - रोहा येथील सुदर्शन कंपनीमध्ये लागलेली आग सुमारे दोन तासांनी आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांच्या मदतीने जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. रोहा एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीतील डीसीएस प्लांटमध्ये रात्रीच्या सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आग लागली होती. त्यानंतर जवळपास दोन तासांनी आग आटोक्यात आली.
अवैध वाळू तस्करीच्या प्रकरणी कायदेशीर कारवाई न करत आरोपीना मदत होईल असे कृत्य केल्या प्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनच्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई....
राज्यातील शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 50 टक्के उपस्थिती बंधनकारक केली असताना,

त्यासाठी रेल्वे प्रवाशाची सुविधा तात्काळ सुरू करण्यासंबंधीचे पत्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, निवारण व पुनर्वसन विभागाने रेल्वे खात्याला दिलेले आहे,

रेल्वे विभागाला दिलेल्या पत्रानुसार शिक्षण विभागतील कर्मचाऱ्यांना रेल्वे सुविधा लवकरच उपलब्द होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवड यांनी दिली आहे
गोंदिया जिल्ह्यातील जहाल नक्षलवादी रमेश मडावी याला पोलिसांनी अटक केली आहे. रमेश हा 1998-99 मध्ये नक्षलमध्ये सामील झाला होता. मागील अनेक वर्षांपासून फरार होता. छत्तीसगढ राज्यातील सुकमा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली होती, गोंदिया पोलीस व छत्तीसगढ पोलिसांच्या सहायाने या नक्षलवाद्यांला अटक केली.
10 वर्षांपासून फरार असलेल्या जहाल नक्षलवाद्याला गोंदिया पोलिसांनी मोठ्या शिताफीतीने छत्तीसगढ राज्यातून अटक केली आहे. या जहाल नक्षालवाद्याचे नाव रमेश मडावी, असे आहे. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारतर्फे 12 लक्ष रुपयाचे पुरस्कार देखील होते.
युरोपियन युनियनने कोविड -19 लशीचे 30 कोटी डोस पुरवठा करण्यासाठी Pfizer बायोटेकशी डील करण्यास ग्रीन सिग्नल
अभाविपचा राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ (वय -30) याचा नंदुरबारमध्ये नदीत पोहायला गेला असताना नदीच्या प्रवहात अडकून आज सकळी मृत्यू झाला.

अभाविप च्या कामानिमित्त नंदुरबारला गेला असताना सकळी नदीत पोहायला गेला असताना नदीत प्रवाहाच्या अडकून पोहता न आल्याने अनिकेत ओव्हल याचा मृत्यू झाला आहे.
अभाविपचा राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ (वय -30) याचा नंदुरबारमध्ये नदीत पोहायला गेला असताना नदीच्या प्रवहात अडकून आज सकळी मृत्यू झाला.

अभाविप च्या कामानिमित्त नंदुरबारला गेला असताना सकळी नदीत पोहायला गेला असताना नदीत प्रवाहाच्या अडकून पोहता न आल्याने अनिकेत ओव्हल याचा मृत्यू झाला आहे.
कोरोना काळात भरघोस आलेल्या वीज बिलबाबत नागरिकांना दिवाळी आधी दिलासा नाही,

ऊर्जामंत्री 2 नोव्हेंबर रोजी केलं होतं स्पष्ट की दिवाळीपूर्वी वीज बिलाच्या सवलती बाबत निर्णय होण्याची शक्यता,

वीज बिलात मधील सवलती बाबत प्रस्ताव कॅबिनेट मध्ये येणार होता,

या आठवड्यात कॅबिनेट होत नसल्यामुळे प्रस्ताव नाही,
आणि त्यामुळे दिवाळी आधी वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत ही मिळणार नाही,

उर्जामंत्र्यांनी स्वतः याबाबी सूतोवाच करून ही याबाबत काहीच हालचाल नाही
शेतकऱ्यांची दिवाळी केंद्रीय मंत्र्यांच्या दारी असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केंद्रीय मंत्री रावासाहेब दानवे यांच्या घरासमोर आंदोलन केलंय. राज्यानं शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली मात्र केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देतंय.. त्यामुळं आज केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना किमान हेक्टरी 25 हजार नुकसान भरपाई द्यावी, यासाठीचं भरीव पॅकेज केंद्रानं जाहीर करावं.. त्याचबरोबर हमीभवानं कापूस खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात सीसीआय केंद्र सुरु करावेत, सोयाबीनला 6 हजार रुपये स्थिर भाव द्याव अशा विविध मागण्या यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आल्यात.. दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एकही खासदार रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारला देण्यात आलाय..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन खरेदी केली होती. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांची अटक आणि जमीन खरेदीचा संबंध आहे का, असा प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. सोमय्या यांनी जमीन खरेदीची कागदपत्र ट्विटरवर पोस्ट केला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बसचा अपघात. वाहतूक ठप्प. पावणे तीनच्या सुमारासची घटना. मुंबईहून पुण्याला येताना अंडा पॉईंट जवळ चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटली. प्रवाश्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणेचे बचावकार्य सुरू.
अर्णब गोस्वामींना अखेर सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, अर्णबसह इतर दोन्ही आरोपींना अंतरिम जामीन मंजूर. 50 हजारांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश. अर्णब गोस्वामींना दिलासा नाकारताना मुंबई उच्च न्यायालयाकडून चूक झाली : सर्वोच्च न्यायालय
कारागृहातील मित्राला गांजा द्यायला आले अन् पोलिसांनी बेड्या ठोकल्या,

कळंबा कारागृहात असलेल्या कैद्याला चेंडूमधून गांजा देण्याचा प्रयत्न,

जुना राजवाडा पोलिसांकडून तिघांना अटक

गांजा देण्यासाठी आलेले तिघेजण पुणे जिल्ह्यातील,

गांजाने भरलेले आणखी चेंडू आतमध्ये फेकले आहेत का याचा शोध सुरू,
माण खटाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयकुमार गोरे पक्ष सोडून गेल्यानंतर या मतदारसंघात आता रणजितसिंह यांना काँग्रेस ताकद देणार आहे. रणजितसिंह आधी काँग्रेसमध्येच होते. पण 2014 मध्ये ते शिवसेनेत गेले होते, आता पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीस ठाणे जिल्ह्यातील नेते दयानंद चोरगे यांनीही आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ठाणे जिल्हापरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा प्रवेश झाला आहे.
कार्तिकी यात्रेसाठी वारकरी संप्रदायातील महाराजांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली , सविस्तर चर्चेनंतर आज सायंकाळी पर्यंत भूमिका जाहीर करणार असल्याचे आश्वासन
सांगली : माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना लढवणार पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, भाजप मध्ये घटक पक्ष असलेली रयत क्रांती संघटना या निवडणुकीत मांडणार वेगळी चूल, भाजपमध्ये आता निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जात नसल्याने आणि पक्षाकडून गृहीत धरले जात असल्याने सदाभाऊ खोत यांचे विरोधात बंड
परभणी : यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीलाच परभणीत थंडीने चांगलाच जोर धरलाय.मागच्या चार दिवसांपासून परभणीचे तापमान हे घसरले आहे. आज जिल्ह्याचे तापमान हे 8 अंश सेल्सिअसवर आले आहे. त्यामुळे सर्वत्र मागच्या चार दिवसांपासून थंडीचा कडाका पडलाय. ग्रामीण भागासह शहरी भागांतही सकाळी आणि संध्याकाळी शेकोट्या पेटत असून नागरिक घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे काही प्रमाणात या थंडीचा परिणाम जनजीवनावर ही झालेला दिसून येतोय.
पुणे शिक्षक जागा काँग्रेस लढवणार,
जयंत अजगांवकर यांना उमेदवारी जाहिर,

पुणे शिक्षक जागी दत्तात्रेय सावंत हे अपक्ष म्हणून लढतील त्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा अशी चर्चा होती ,
पण ही जागा लढवण्याबाबत काँग्रेस आग्रही होती ,
आज काँग्रेसने उमेदवार जाहीर केला
मंत्री दिलीप वळसे पाटील कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अनिल देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. कालच राज्यपालांनी देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जमा केलेल्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोनाने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 रुपये इतकी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सुपूर्द केली.
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जमा केलेल्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोनाने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 रुपये इतकी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सुपूर्द केली.
येत्या दिवाळीत पुणे महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडायला बंदी घालण्यात आलीय. उद्याने, शाळा , मैदाने अशा ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. त्याचबरोबर खाजगी जागेतही कमीतकमी प्रमाणात, कमी आवाजाचे आणि कमी धुर निर्माण करणारे फटाके उडावावेत अशा सुचना करण्यात आल्यात. फटाके उडवताना सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे , सॅनिटायझर हे ज्वलनशील असल्याने दिवाळीच्या काळात हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा असही पुणे महापालिकेच्या सुचनापत्रकात नमुद करण्यात आलंय. पुण्यात दिवाळीत फटाके उडवण्यास बंदी नसली तरी फटाके उडवताना नागरिकांना महापालिकेच्या या सुचनांचे पालन करावे लागणार आहे.
पदवीधर निवडणुकीत भाजपाचे रमेश पोकळे बंडखोरी करणार ?

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी असलेले रमेश पोकळे हे पदवीधर निवडणुकीत बंडखोरी करणार का ? असा प्रश्न सध्या विचारला जातोय कारण रमेश पोकळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर बुधवारी उमेदवारी अर्ज भरायचे जाहीर केले जिथे भाजपकडून शिरीष बोराळकर हे उमेदवार असतील हे जाहीर झाल्यानंतरही रमेश पोकळे यांनी मात्र पदवीधर निवडणूक लढण्यात संदर्भात आपली भूमिका ठाम ठेवली आहे..
पुण्याजवळील शिरूर येथील न्हावरे गावात एका महिलेवर जीवघेणा हल्ला करून तिचे दोन्ही डोळे फोडण्यात आले होते..मंगळवारी हा प्रकार घडला होता..यातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे..यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज सायंकाळी 7 वाजता शिक्रापूर याठिकाणी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख पत्रकार परिषद घेणार आहेत...
'6 नोव्हेंबर 2020 रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो', एकनाथ खडसे यांची दिलगिरी
पिंपरी पोलीस स्टेशनच्या आवारातील वाहनांना भीषण आग लागल्याचं समोर आलंय. यात दहा ते बारा वाहनं जळून खाक झालीत. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. पोलिसांनी जप्त केलेली ही वाहनं असून अनेक महिन्यांपासून ती इथंच पडून आहेत. आज नेमकी कशामुळे ही आग लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अर्णब गोस्वामींचा जामिन अर्ज हायकोर्टानं फेटाळला, अर्णब यांच्याकडून अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज, सत्र न्यायालयाला चार दिवसात निर्णय देण्याचे हायकोर्टाचे निर्देश, चार दिवसात सुनावणी नाही झाली तर अर्णब यांची दिवाळी तळोजा कारागृहातच जाण्याची शक्यता
अर्णब गोस्वामींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, नियमाप्रमाणे सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका करावी, हायकोर्टाचे निर्देश
पाण्याच्या मोठ्या बाटल्यांमधून विकलं जाणारं पाणी यापुढे आय एस आय शिक्क्यासहच विकलं जावं असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिलाय. त्याचबरोबर कोल्ड जारमधून विकल्या जाणाऱ्या पाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय . राज्यात बाटलीबंद पाणी अनधिकृतपणे विकलं जात असल्याचं आणि त्यामुळं लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचं समोर आल्यानंतर हरित लवादाने हे आदेश दिलेत . त्याचबरोबर राज्यात अनधिकृतपणे सुरु असलेले अशुद्ध पाण्याचे प्लांट तातडीने कारवाई करून बंद करण्याचे आदेशही प्रदूषण नियंत्रण मंडळ, एफ डी ए आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेत . महाराष्ट्रात अशुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या अनधिकृत प्लांटची संख्या दहा हजारांच्या घरात आहे. मात्र अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या प्लांटवर कारवाई नक्की कोणी करायची यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळ , एफ डी ए आणि स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करतायत . त्यामुळं सामान्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय .

नागपूर विभाग पदवीधर निवडणूकीसाठी भाजपने उमेदवार बदलला, विद्यमान आमदार अनिल सोले यांच्याऐवजी संदीप जोशी यांना संधी, संदीप जोशी नागपूरचे महापौर असून देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय, नागपूर पदवीधर मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व, गंगाधरराव फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी प्रतिनिधित्व केलेले हे मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचे
मुंबई-गोवा महामार्गावर जाणवली रतांबे व्हाल येथे दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील एका ट्रक मधून जाणारे चालकासह 9 जण कामगार जखमी झाले आहेत. या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वारंवार जाणवली भागात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोघेजण गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर इतरांवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपने दिली सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी,

देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून विधानसभा निवडणुकीत ते पलूस-कडेगाव मतदार संघातून होते इच्छुक ,

जागा शिवसेनेला गेल्यामुळे त्यांना घ्यावी लागली होती माघार,

मराठा कार्ड काढत भाजपने दिला महाविकास आघाडीला पहिला धक्का,

राष्ट्रवादीच्या वतीने अरुण लाड यांची उमेदवारी शक्‍य,

यामुळे पदवीधरची लढत सांगली जिल्ह्यातील दोन उमेदवारात होण्याची चिन्हे,
मुंबईत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी, लक्ष्मीपूजनाला केवळ खासगी क्षेत्रात सौम्य आवाजाच्या फटाक्यांना परवानगी, मुंबई महापालिकेकडून नवी नियमावली जाहीर
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीचं धाडसत्र सुरुच, बॉलिवूडमधल्या एका मोठ्या अभिनेत्याच्या घरात एनसीबीचा छापा, अभिनेत्याचा कार चालक ताब्यात
नंदुरबार : धडगाव शहरातील बसस्थानकजवळ असलेल्या महा लॅबला आग लागली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लागली आग लागली. धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोळा करण्यात आलेलं रक्ताचे नमुने तपासणी या लॅबमध्ये होत होती. लॅबमध्ये असलेली मशनिरी जळून खाक झाली आहे. धडगाव नगर पंचायतीच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आहे.
बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एलआयसी ऑफिसला आज पहाटे आग लागली. या आगीत ऑफिसमधील सगळे साहित्य जाळून खाक झाले. यात कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या साहित्याबरोबरच मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे कागदपत्रेही होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठले होते. पहाटेची वेळ असल्याने आग पूर्ण ऑफिसमध्ये पसरली. आग एवढी भीषण होती की ऑफिसमधील साहित्याच्या अक्षरशः कोळसा झाल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र ऑफिसचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात गोळीबाराची घटना घडली. एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचं अपहरण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. रविवारी व्यापारी अखिलेश गुप्ता घरी जात असताना त्यांची कार अडवून तीन अपहरणकर्त्यांनी मिर्ची पूड टाकत तीन गोळ्या झाडल्या. सोबत असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने अखिलेश गुप्ता यांचे प्राण वाचले. अखिलेश गुप्ता यांचं सिल्लोडला कापड आणि कृषीसेवा केंद्र आहे. दरम्यान या गोळीबार प्रकरणी अजिंठा पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्या दर्शन घडवणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक संघटनेस बोट वाहतूक सुरु करण्यास अटी, शर्ती घालत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता किल्ला दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. कोरोनामुळे तब्बल आठ महिन्यांनी सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतुकीला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर किल्ला होडी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याने शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार पर्यटकही आता जिल्ह्यात दाखल होऊ लागले. परंतु सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी बंद असल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत होती. त्याचप्रमाणे गेले आठ महिने होडी वाहतूक बंद असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांची देखील उपासमार होत होती. त्यामुळे शासनाने किल्ल्यावरील होडी वाहतूक सुरु करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील होडी वाहतूक अटीशर्तींसह सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सुमारे 38 लाखांचा ऐवज लंपास केला. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे ही घटना घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेन शहरात खळबळ उडाली आहे. हरीश गोविंद हुरकट हे कुटुंबियांसह नागपूरला गेले होते. या दरम्यान दोन चोरट्यांनी बंद असलेल्या घराचे समोरच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी रोख रकमेसह 38 लाखांचा ऐवज पळवला. एका महिलेने खांद्यावर बॅग नेत असलेल्या या चोरट्यांना हटकलं असता त्यांना मारण्यासाठी हात उगारला. डॉग स्क्वॉड, ठसे तज्ज्ञांना यावेळी बोलावण्यात आलं होतं.. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वर्धा : घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सुमारे 38 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट इथं ही घटना घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेन शहरात खळबळ निर्माण झाली आहे. हरीश गोविंद हुरकट हे कुटुंबियांसह नागपूरला गेले होते. दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या घराचे समोरच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी रोख रकमेसह 38 लाखांचा ऐवज पळवला. एका महिलेनं खांद्यावर बॅग नेत असल्याबद्दल दोन युवकांना हटकल असता त्यांना मारण्यासाठी हात उगारला. डॉग स्कॉड, ठसे तज्ज्ञांना यावेळी बोलावण्यात आलं होतं. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपला नाहीये, त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडू नका, रस्त्यांवर गर्दी करू नका, बाहेर आला तर मास्क वापरा असे कळकळीचे आवाहन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आज दिवाळीच्या खरेदीसाठी ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती. त्यात अनधिकृत फेरीवाले यामुळे ही गर्दी आणखीन वाढली. ठाण्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र असे नागरिकांनी वागल्यास ही रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना आवाहन केले. ठाण्याच्या ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या माहेर या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारचा विकास करु : पंतप्रधान नरेंद्र मोदी
बिहारला लोकशाहीचं जमीन का म्हटलं जात हे तेथील जनतेने सिद्ध करुन दाखवलं आहे. बिहारमधील जनता जागरुक आहे. आम्ही सर्व नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएनच्या कार्यकर्ता आणि बिहारमधील जनतेसोबत विकासाचा संकल्प सिद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असं म्हणत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं आहे.


India Tour Of Australia : टीम इंडिया यूएईहून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी युएईवरून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. कोरोना साथीच्या काळात हा भारतीय संघाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. यावेळी सर्व भारतीय खेळाडू खास पीपीई किटमध्ये दिसत होते. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी - 20 मालिका आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेचा पहिला सामना डे-नाईट खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया गाठल्यानंतर भारतीय खेळाडू 14 दिवस क्वारंटाईन होणार आहे. या दौर्‍याची चांगली गोष्ट म्हणजे क्वारंटाईन असतानाही खेळाडू सराव करू शकतील. आयपीएल 2020 वेळी असं नव्हते.


जहाल नक्षलवादी रमेश मडावीला 10 वर्षानंतर अटक, गोंदिया पोलिसांची कारवाई
10 वर्षापासून फरार असलेल्या जहाल नक्षलवाद्याला गोंदिया पोलिसांनी मोठ्या शिताफीतीने छत्तीसगढ राज्यातून अटक केली आहे. या जहाल नक्षलवाद्याचे नाव रमेश मडावी असे आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाचे 12 लाख रुपयाचे पुरस्कार देखील होते. रमेश मडावी याने 1997-98 मध्ये नक्षल दलममध्ये सहभाग घेत गोंदिया जिल्यात अनेक मोठ्या नक्षल घटना घडवून आणल्या होत्या. देवरी नक्षल दलम मध्ये त्याची वर्णी एसी एम एल ओ एस कमांडर म्हणून देखील लागली होती . तर देवरी दलममध्ये असताना रमेशने पोलिस स्टेशन चिचगड अंतर्गत येणाऱ्या मगरडोह हद्दीमध्ये पोलिस पथकावर प्राण घातक हल्ला देखील केला होता. तसेच या परिसरात हत्या ,गावकऱ्यांवर हल्ले चढविणे ,सार्वजनिक मालमतेची नासधूस करणे अशा विविध घटनांमध्ये रमेश मडावी याचा सहभाग होता. त्याच्यावर या आधी देखील 13 गुन्हे दाखल आहेत. तर रमेश मडावी हा छत्तीसगढ राज्यातील सुकमा जिल्यात वावरत असल्याची गुप्त माहिती गोंदिया पोलिसांना मिळताच. पोलिसांनी छतीसगढ राज्यातील पोलिसांच्या सहकाऱ्याने सुकमा जिल्ह्यात जाऊन रमेश मडावीला अटक केल्यामुळे पोलिसांना मोठे यश आले आहे.


ठाण्यातील घोडबंदर रोड लवकरच होणार ट्राफिक मुक्त
सध्या संपूर्ण पूर्व द्रुतगती मार्गापासून ते घोडबंदर रस्त्यापर्यंत मेट्रोचे काम सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होते आहे. यावर उपाय म्हणून बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचा वापर करता येऊ शकतो. मात्र या मार्गावर 4 ठिकाणी संजय गांधी उद्यानाच्या हद्दीतील जागा असल्याने हे सर्विस रोड पूर्ण करण्यास अडथळा येत होता. आता मात्र वनविभाग ही जागा ठाणे महानगरपालिकेत देण्यास तयार झाला असून लवकरच या चार ठिकाणी देखील सर्विस रोड बांधून वाहतूक कोंडी सुटेल असं शिवसेना खासदार राजन विचारे यांनी सांगितले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.