बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रकरणात कथीत संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन संचालक पदावर नियुक्ती केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार केज न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ.विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश केज न्यायालयाने दिले आहेत.
सूतगिरणीचे संचालक गणपती कांबळे यांनी त्या संबंधित तक्रार केज न्यायालयात दाखल करुन सूतगिरणीचे चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे आणि केजच्या आमदार संगिता ठोंबरे यांच्या विरोधात 420, 467, 468, 471 गुन्हे दाखल करण्याचे मा. न्यायालयाने 156/3 अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी करुन चार्जशीट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर गैरव्यवहारात आपल्या खोट्या सह्या चेअरमन आणि केजच्या आमदार यांनी करुन शासनाची आणि जनतेची फसवणूक करुन आपणास नाहक गोवण्यात आले आहे. सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्या दाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा श्रीमती आश्विनी पवार फॉरेन्सिक तज्ञाचा अहवाल आणि शपथ पत्र जोडून सूतगिरणीचे चेअरमन आणि आमदार यांच्या वरती 153/3 नुसार गुन्हा दाखल करुन चौकशी करावी आणि चार्जशीट दाखल करण्याचे आदेश केज प्रथम वर्ग न्यायालयाने दिले.
न्यायालयाच्या आदेशानुसार आ. संगीता ठोंबरे आणि चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर 420, 467, 468, 471 कलमानुसार बनावट दस्तऐवज तयार करुन ते माहिती असतानाही खरे दाखवून फसवणूक केली असल्याचा गुन्हे दाखल केला. यावर चौकशी करुन न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अँड संतोष मुंडे यांनी दिली आहे.
सहकारी सूतगिरणी प्रकरणी भाजपच्या आमदार संगीता ठोंबरेंवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2019 05:55 PM (IST)
न्यायालयाच्या आदेशानुसार आ. संगीता ठोंबरे आणि चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर 420, 467, 468, 471 कलमानुसार बनावट दस्तऐवज तयार करुन ते माहिती असतानाही खरे दाखवून फसवणूक केली असल्याचा गुन्हे दाखल केला. यावर चौकशी करुन न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अँड संतोष मुंडे यांनी दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -