LIVE UPDATES | दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पंजाब आणि हरियाणा मधील खेळाडूंचा पाठिंबा

सीरम इन्स्टिट्युटचे अदार पूनावाला 'एशियन ऑफ द ईयर', कोरोना महामारीचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पालघरमधील तारापूर येथे लोकसहभागातून साकारला 39 एकरांचा 'श्रीकृष्ण तलाव' IND Vs AUS 2nd T20 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात आज दुसरा टी20 सामना; टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Dec 2020 04:23 PM
शरद पवार, सीताराम येचुरी आणि डी.राजा हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपतींना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पंजाब आणि हरियाणा मधील खेळाडूंचा प्रतिसाद सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. पंजाब आणि हरियाणामधील खेळाडू आपल्याला मिळालेले पुरस्कार सरकारला परत देत आहेत. या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर भारताच्या प्रसिद्ध खेळाडूंनी ही आपली पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले. यामध्ये छत्रपती पुरस्कार विजेते, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा समावेश आहे. भारताचा नावाजलेला बॉक्सर विजेंद्र सिंग यांनी सुद्धा त्याला मिळालेला राजीव गांधी पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले आहे. सरकारच्या विरोधात या सगळ्या शेतकऱ्यांचा रोज वाढताना दिसतोय.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्यात कोरणा काळात पेट्रोल डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये डिझेलचे दर 80 पार गेलेत तर शनिवारी परभणी जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा दर 92 रुपये 18 पैसे एवढा झाला सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल पेट्रोलच्या किमती वाढविल्या चे जाहीर केले आहे डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांची वाढ झाली पेट्रोलच्या दरात 15 ते 17 पैशांची वाढ झाली त्यात पुन्हा गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे कोरणा काळात पेट्रोल डिझेलच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसते महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किमती 90 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे मुंबई या उंबरठ्यावर आहे मुंबई शहरामध्ये डिझेलची किंमत 24 रुपयांनी वाढून 79 रुपये 66 पैसे झाली त्याचप्रमाणे पेट्रोलच्या किमती 19 पैशांनी वाढले आहेत नागपूर परभणी नांदेड सोलापूर अमरावती औरंगाबाद आणि बुलढाणा या जिल्ह्यात डिझेलची किंमत एक लिटर ला 80 रुपयांच्या वर आहे परभणी पेट्रोलचा दर सर्वाधिक 29 रुपये 18 पैसे तर डिझेल 81 रुपये पाच पैसे एवढा आहे मागील काही दिवसात राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत 25 नोव्हेंबरला 77 रुपये 9 पैसे प्रति लिटर दर असणारे डिझेल आज 1900 रुपये 66 पैसे इतके आहे मागील नऊ दिवसांमध्ये डिझेलमध्ये एक रुपया 76 पैसे एवढी वाढ झाली आहे मुंबईत काही दिवसापासून डिझेलच्या किमतीत होणारी दरवाढ 80 रुपये पर्यंत येऊन पोहोचली आहे तर दुसरीकडे रोल च्या किमती मध्ये देखील सातत्याने वाढ सुरू आहे आज पेट्रोलचा भाव 90 रुपये पर्यंत पोहोचला वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती मुळे आता सर्वसामान्यांची मतं काय आहेत ते पहावे लागेल
मुंबई : लालबाग परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, स्फोटात 6 ते 7 जण जखमी, जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु
१४ एप्रिल २०२३ला बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण करणार, धनंजय मुंडेंनी व्यक्त केला विश्वास
राज्यमंत्री बच्चू कडू यांच दुसऱ्याच दिवशी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न...

मंगल कार्यालय बुकिंग केलं होतं पण मध्यप्रदेश पोलीसांनी दमदाटी केल्याने आम्हाला एकही मंगल कार्यालय मिळालं नसल्याचं आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं...

सध्या हा ताफा मध्यप्रदेशच्या बैतुल येथील एका गोदामात आज मुक्काम करणार असून सकाळी दिल्लीसाठी होतील रवाना...
अर्णब गोस्वामींचा मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं अर्ज सादर

,अन्वय नाईक प्रकरणात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान

,पुढील आठवड्यात हायकोर्टात तातडीची सुनावणी अपेक्षित
बॉयलरचा स्फोट होऊन एका कामगाराचा भाजून मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी , साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी कारखान्यातील घटना,
रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडली घटना ,

घटनेची नोंद मात्र अद्याप पोलिस ठाण्यात नसल्याची माहिती,

संभाजी घोरपडे असे मृत व्यक्तीचे नाव
औरंगाबाद मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग पहाणी दौरा, कार्यक्रमस्थळाशेजारी शेकऱ्यांची निदर्शनं, समृद्धी महामार्गाच्या कडेला भिंत उभारण्यात शेतकऱ्यांचा विरोध, समृद्धी मुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे जमिनीचे दोन तुकडे झाले आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांना या भिंतीमुळे शेतात जाता येणार नाही, त्याबरोबरच घायगाव, जांबरगावात उभारल्या जाणाऱ्या नवनगर सिटी उभारण्यास ही विरोध.
पुण्यातील देवाच्या आळंदीत 6 डिसेंबर पासून संचारबंदी लागू होणार आहे. 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे. या प्रसंगी राज्यातून चार ते पाच लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माथा टेकवायला येत असतात. पण यंदा कोरोनाची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे प्रशासनाने 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे यंदाचा संजीवन समाधी सोहळ्याचा हा सप्ताह कमीतकमी 20 ते जास्तीतजास्त 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतच पार पडेल.
टॉवेल आणि चादरींच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या दरात वाढ होत असल्याने टॉवेल आणि चादरींच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सुताच्या दरात सतत वाढ होत असल्याने यंत्रमागधारकांनी टॉवेल आणि चादरीच्या किमतीत प्रति किलो दहा रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंत्रमागधारकांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली. सोलापूरची चादर ही जगप्रसिद्ध आहे. सोलापुरातील टॉवेल्सला देखील देशभरातून मागणी असते. सध्या चादरींच्या किमती या साधार 160 ते 350 रुपये प्रतिकिलो पर्यंत आहेत. तर टॉवेलचे दर प्रतिकिलो 250 ते 400 रुपये इतके आहे. आता या दरात प्रतिकिलो दहा रुपयांप्रमाणे वाढ करण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात यंत्रमाग धारकांना मोठा फटका बसला. लॉकडाऊनच्या काळा टेक्स्टाईल उद्योजकांना भरमसाठ विज बिले आली आहेत. विजेच्या दरात देखील आता वाढ झाली आहे. तर जो माल विकला गेला त्याचे अद्याप पैसे न मिळाल्याने अनेक उद्योजकांना थकबाकी आहे. त्यामुळे उद्योजकांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहेत. त्यातच सुताच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सर्व प्रकारच्या सुताच्या दरांत 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. सूत खरेदी शिवाय कारखाने सुरु करता येत नाही. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दरात वाढ करण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया यंत्रमाग धारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली.
एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे.

चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये अॅड. आशिष गायकवाड, अॅड. राजेश टेकाळे, अॅड. रमेश दुबे पाटील, अॅड. अनिल गोळेगावकर व अॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल.
आज दुपारी शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीआधी भाजपचे महत्त्वाचे नेते पंतप्रधानांच्या भेटीला,

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र तोमर, पियुष गोयल पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल,

शेतकऱ्यांनी आज आर-पार चा इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची खलबतं.
बुलढाण्याच्या चिखली रोड स्थित शासकीय मुलांचे निरीक्षणगृहात आज सकाळी दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह दोरीच्या सहय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. बाल सुधारगृहाच्या या खोलीत एकूण तीन मुलं होती, त्यातील दोघांचे मृतदेह आढळले असून तिसरा मुलगा सुरक्षित आहे. घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, तहसीलदार खंडारे पोहोचले असून या मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे यांची सध्या चौकशी सुरु आहे.

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची आणि दर्जाची पाहणी करायला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अमरावती जिल्ह्यात येत आहेत. शिवणी रसूलापूर गावाजवळ ते महामार्गाची पाहणी करणार आहे.सकाळी सव्वा अकरा वाजता ते नागपूरातून हेलिकॉप्टर ने शिवणी रसुलापूरला पोहोचणार आहेत... त्यानंतर ते महामार्गाची पाहणी करणार आहेत... 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे एकूण 16 सेक्शन / पॅकेज आहेत.. मुख्यमंत्री क्रमांक 3 च्या सेक्शन ची पाहणी करणार आहे.. 73 किमी लांबीच्या या सेक्शन मध्ये पुलांचे काम वगळून महामार्गाचे बहुतांशी बांधकाम पूर्ण झाले आहे.. तर पुलांचे बांधकाम सुरू आहे...
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणी फरार संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या नावाने पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली आहे. देश सोडून जाऊ नये यासाठी जिल्हा पोलीस दलाने ही लूकआऊट नोटीस काढली. बोठे यांचा पोलिसांकडून शोध सुरुच आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. आघाडी धर्म पाळावा, असं ट्वीट राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. "महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना आवाहन करते की महाराष्ट्रात स्थिर सरकार हवं असल्याच काँग्रेसच्या नेतृत्त्वावर भाष्य करणं टाळा. प्रत्येकाने आघाडी धर्म पाळायला हवा, असं यशोमती ठाकूर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारने कांद्यावर लावलेली निर्यात बंदी त्वरित उठवावी अन्यथा मुंबईसह राज्यभरातील बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी दिला आहे. लाल कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव सातत्याने कमी होत आहेत. 70 ते 80 रुपये प्रति किलो विक्री होणारा कांदा 20
ते 30 रुपयांवर आला आहे. कांद्याला भाव मिळत असताना सरकारने निर्यात बंदी तातडीने लागू केली. मात्र आता शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, कांद्याला भाव मिळत नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खुली करुन द्यावी, निर्यात बंदी उठवावी अशी मागणी होत आहे. यावर लवकर निर्णय झाला नाहीतर कांद्याचा प्रश्न पुन्हा सरकारसमोर डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
काटोल नगर परिषदेतील नगराध्यक्षा आणि 18 नगरसेवकांना अपात्र जाहीर करण्यात आले आहे..

राज्याच्या नगरविकास विभागाने त्या संदर्भातले आदेश आज काढले आहे..

विशेष म्हणजे काटोल हे राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांचे मतदारसंघ असून तिथे नगरपरिषदेत विदर्भ माझा पक्ष आणि भाजप ची सत्ता होती..
देवाच्या आळंदीत 6 डिसेंबर पासून संचारबंदी लागू होणार आहे. 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे. या प्रसंगी राज्यातून चार ते पाच लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येत असतात. पण यंदा कोरोनाची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे प्रशासनाने 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे यंदाचा संजीवन समाधी सोहळ्याचा हा सप्ताह कमीतकमी 20 ते जास्तीतजास्त 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतच पार पडेल.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात कन्हाळगाव अभयारण्य घोषित... वाघांचे भ्रमणमार्ग भक्कम करण्यासाठी महत्वाचा निर्णय, 2013 पासून पर्यावरणवाद्यांची होती मागणी, राज्य वन्यजीव मंडळाच्या आजच्या बैठकीत झाला निर्णय, 269 चौ. किमी जंगल क्षेत्राला मिळाला अभयारण्याचा दर्जा, हे संपूर्ण क्षेत्र आजवर वनविकास महामंडळाच्या होते अधीन, महामंडळ करत होते व्यावसायिक वृक्षतोड आणि विक्री, कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने छत्तीसगडच्या इंद्रावती, तेलंगणाच्या कावल आणि यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात जाणारा वाघांचा भ्रमणमार्ग झाला सुरक्षित, अभयारण्य घोषित झाल्याने वन्यजीव संरक्षण-संवर्धन यासाठीचा सर्वंकष आराखडा मोठ्या निधीसह राबवता येणार, भविष्यात पर्यटनाला चालना-रोजगार वाढीची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील बंद असलेल्या शाळा अखेर उघडणार आहे. शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील 248 शाळा सुरू करण्याचा जिल्हाप्रशासनाने निर्णय घेतला आहे. मात्र 10 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असलेल्या गावातील शाळा बंद असणार आहे.




अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाला धक्का देत वाशीम येथील रहिवासी अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी बाजी मारली आहे. सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला. त्यामुळे अमरावती विभागात बलाढ्य पक्षाला धक्का देत एक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला.
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना सदस्य एकमेकांना भिडल्याचं बघायला मिळत आहे... स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ऑडिओ क्लिपवरुन राडा झाला... स्थायी समितीत या विषयाचा हरकतीचा मुद्दा घेऊ न दिल्यानं भाजप सदस्यांनी घोषणाबाजी केली... यावेळी यशवंत जाधव यांच्या दालनासमोर भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले असता शिवसेना नगरसेवकही तिथं आल्यानं बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद दौ-यावर, समृद्धी महामार्गाची करणार पाहणी
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक, अपक्ष उमेदवार अॅड. किरण सरनाईक विजयी, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा केला पराभव
राज्यातील 2016 पासून बंद असलेली 1500 दारुची दुकानं सुरू होणार
- विविध निर्बंधांमुळे बंद होती दारुची दुकानं
- सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर निर्बंधामुळे राज्यातील 2200 दारुची दुकानं बंद होती
- न्यायालयाने यात काही शिथिलता दिली
- त्यानंतर राज्य सरकारनेही काही नियमावली तयार केली
- या नियमावलीचा फायदा राज्यातील 2200 पैकी 1500 दारुच्या दुकानांना होणार आहे

- कोणत्या भागातील दारूची दुकानं सुरू होणार -
- या नियमावलीनुसार पर्यटन स्थळे, एमएमआरडी, पीएमआरडीएसारखी क्षेत्रातील बंद
- असलेली दारू दुकानं सुरू करण्यास परवानगी
- महापालिका हद्दीपासून 5 किलोमीटरच्या आत असलेली दुकानं
- तर नगरपालिका हद्दीपासून 3 किलोमीटरच्या आत असलेली दुकानं
- दीड हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावं
विजय माल्ल्याची फ्रान्समधील 1.8 मिलियन युरोची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
#indvsausT20 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टीृ20 सामना, भारताची ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी मात, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी
शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्ष पदावर भाजपचा झेंडा...
भाजपचे शिवाजी गोंदकर नगराध्यक्षपदी विराजमान..
राधाकृष्ण विखे पाटील यांच आहे वर्चस्व...
एकूण 17 पैकी भाजपचे अवघे 3 नगरसेवक असताना मिळाले नगराध्यक्षपद...
राधाकृष्ण विखेंच्या गटातील नगरसेवकांनी दिला पाठिंबा...
विखे काँग्रेस सोडून भाजप मध्ये आल्यावर काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले विखे समर्थक नगरसेवक भाजपच्या पाठीशी..
धुळे जिल्ह्यात 23 दिवसांनंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणात दिवसभर गारठा राहत आहे. शुक्रवारी 9.5 तापमानाची नोंद झाली आहे. 23 दिवसांपूर्वी म्हणजेच 12 नोव्हेंबर या दिवशी धुळ्याचं तापमान 8.6 अंश सेल्सिअस होतं. थंडीच्या कडाका वाढल्याने याचा जनजीवनावर परिणाम होत असला तरी ही कडाक्याची पडणारी थंडी गहू लागवडीसाठी लाभदायी असल्याने गहू लागवड करण्याच्या कामाला हरकत नसल्याचं कृषी तज्ञ सांगत आहेत. तर कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी नागरिक शेकोटी पेटवत आहेत. ग्रामीण भागात सकाळच्या वेळी दाट धुके राहत असल्याने यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने सकाळच्या प्रहरी व्यायाम करण्यासाठी, फिरण्यासाठी अबाल वृद्धांची चौपाटी, स्टेडियम याठिकाणी गर्दी होत आहे.
किल्ले रायगडावर येणारे शिवभक्त आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. रायगडावर जाण्यासाठीची रोप वे सेवा आजपासून (शुक्रवार) सुरु होत आहे. आधी कोरोना आणि त्यानंतर जागेचा वाद यामुळे रायगडची रोप वे सेवा मागील 8 महिन्यापासून बंद होती. ही सेवा सुरु करण्यात अडथळा येऊ नये यासाठी रोप वे तर्फे न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. त्यावरील निकाल आल्यानंतर आता देखभाल दुरुस्ती आणि ट्रायल पूर्ण झाली. आता ही सेवा सुरु होईल. त्यामुळे मोठी गैरसोय टळणार आहे. दरवर्षी लाखो पर्यटक, शिवभक्त रायगडावर येत असतात. यंदा कोरोनानंतर पर्यटन सुरु झाले तरी रोप वे सुरु झाला नव्हता त्यामुळे पर्यटक फारसे फिरकत नव्हते. आता रोप वे सुरु होणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जागर गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहे. सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश आंदोलनाला कोल्हापुरात सुरुवात
,
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणात रात्रभर आत्मक्लेश जागर
,
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी केंद्र सरकार विरोधात संताप
,
राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आंदोलन

रेखा जरे हत्या प्रकरणी खळबळजनक खुलासा : अहमदनगर मधील संपादक बाळासाहेब बोठे, सकाळ वृत्तपत्राचे संपादक, यांच्या विरोधात पुरावे मिळाले आहेत. बाळासाहेब बोठे यांचं नाव आल्याने अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना सात डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. हत्येमागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.
साताऱ्यातील धोम-बलकवडी धरणाची उजव्या कालव्याची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी शेतांमध्ये गेले असून अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यासह कर्नाटक राज्यामध्ये मंदिरातील चोरी करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. 29 किलो 987 ग्रॅम वजनाची चांदीची आणि 27 ग्रॅम सोन्याचे दागिने असे 13 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी रामा कोरवी, संदीप जामदार, दीपक दमाने, अनिल चौगुले, राहुल कांबळे, शामराव काळुंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हेरवाड, खिद्रापूर, बस्तवाड, निमशिरगाव, दानोळी, भेंडवडे, किनी, रांगोळी, बस्तवाड, मिनचे, कबनूर तसेच कर्नाटकातील एकसंबा येथे चोरी केल्याचे उघडकीस आलं आहे.
नैसर्गिक आपत्तीसाठी केंद्र सरकारकडून मदत मिळावी म्हणून राज्य सरकारचं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणाच्या हालचाली, केंद्र सरकारकडून मदतीबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने राज्य सरकारचा निर्णय, राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर केंद्र सरकारने तीन वेळा पत्र लिहून पाहणीसाठी केंद्राचे पथक पाठवण्याची केली होती विनंती , मात्र केंद्र सरकारचे पाहणी पथक न आल्याने केंद्र सरकारकडून मदतीबाबत अद्याप ठोस निर्णय नाही , त्यामुळे राज्याला केंद्र सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत मिळावी म्हणून पीक नुकसानीबाबत राज्य सरकारच्या प्रस्ताव पाठवण्याबाबत हालचाली , राज्यात निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर पाहणीसाठी केंद्रीय पथक आले होते, मात्र पूर्व विदर्भातील पूर आणि अतिवृष्टीनंतर मराठवाड्यात मात्र केंद्रीय पथक आलेले नाही, याबाबत विदर्भ, मराठवाड्यात पाहणी पथक पाठवण्याबाबत राज्य सरकारने केंद्राला तीन वेळा पत्र लिहिलं आहे मात्र केंद्र सरकारकडून प्रतिसाद नाही
जळगाव मधील बहुचर्चित बीएचआर घोटाळा प्रकरणाचे नाशिक कनेक्शन आहे का? याची चौकशी होण्याची शक्यता, पुण्याची आर्थिक गुन्हे शाखा नाशिक महापालिकेच्या व्यवहाराची चौकशी करण्याची शक्यता , मनपा अधिकारी पदाधिकारी आणि ठेकेदारचे धाबे दणाणले, सुनील झंवर भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय,  गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होते. त्यामुळे मागील सत्ता काळात नाशिक महापालिका, स्मार्ट सिटीच्या काही कामात सुनील झंवरचा थेट किंवा अप्रत्यक्ष सबंध आहे का याच तपास केला जाणार असल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे.
सिंधुदुर्ग : देवगड पडवणेमध्ये शेत मांगरांसह 400 आंबा कलमं आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील पडवणे येथील रान माळवरील सुमारे 50 एकर क्षेत्राला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून वणवा लागला. यामध्ये शेत मांगर जळाला असून 400 हापूस आंबा कलमे जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. पडवणे गावामध्ये रात्री लागलेल्या आगीने रुद्र रूप धारण केल्याने 200 ग्रामस्थांनी आग विझवली आहे.
पालघर -
केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर संदर्भात हालचालींना वेग, स्थानिक नागरिक आक्रमक, जैव विविधता सर्वेक्षणासाठी आलेल्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या अधिकाऱ्यांना पुन्हा नागरिकांनी माघारी परतविले
शिर्डी संस्थानने तोकड्या कपड्यातील व्यक्तींबाबतचा बोर्ड काढला नाही तर मी दहा डिसेंबरला शिर्डीत जाऊन तो बोर्ड काढणार, तृप्ती देसाईंचा इशारा
पालघर : जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध वाढत चालला असून ,या भागात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे,,सरकारने वाढवण बंदराला हिरवा कंदील दाखवीला असून बंदर उभारणीच्या कामाला वेग येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. त्यामुळे या भागातील स्थानिक या बंदरा विरोधात आक्रमक झाले आहेत. आत्ता या जागेच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून सर्वेक्षणासाठी येणाऱ्यांना काम न करू देण्याचा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून पुन्हा या भागात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. वाढवनला पुन्हा पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर ,नागरीकांनी ही मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
भिवंडी : भिवंडीत आगीच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. भिवंडी तालुक्यातील कोनगाव हद्दीत असलेल्या रायडर बॉईज मोटर बाईक सर्विस सेंटरला मध्यरात्री नंतर भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण सर्विस सेंटर जळून खाक झालंय. आगीचं नेमकं कारण शॉर्टसर्किट असल्याचं सांगितलं जात आहे. आग लागल्याचं समजताच स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आग मोठी असल्याकारणाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं सूचना मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली व अग्निशमन दलाच्या जवानांनी एका तासाच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवल, मात्र या आगीत संपूर्ण सर्विस सेंटर जळून खाक झाला आहे . मोहम्मद अस्लम असे सर्विस सेंटर मालकाचे नाव असून या आगीमुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा या मागणीसाठी पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरु आहे. त्याला पाठिंबा म्हणून राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात आंदोलन करत आहे. त्याचाच भाग म्हणून वाशिमच्या मालेगाव तालुक्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जागर आंदोलन सुरु केलं आहे. रात्र जागून, डफ वाजवून केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करत आंदोलन केलं.
हिवाळी अधिवेशनाची तारीख 7 डिसेंबर होती. तीन दिवस अधिवेशन घेण्याबाबत चर्चा होती, पण दोनच दिवसांचे अधिवेशन घेण्याचा मंत्र्यांचा आग्रह आहे. 14 व 15 डिसेंबर रोजी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा होणार

पंढरपूरमध्ये भाजप खासदारांवर आचार संहिता भंग केल्याचं गुन्हा दाखल होताच. भाजपने आता राष्ट्रवादीचे सरचिटणीस दीपक साळुंख्ये यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. काल मतदान सुरू असताना मंगळवेढा येथे साळुंखे हेही मतदान केंद्रात गेल्याचे फोटो भाजपकडून देण्यात आले आहेत.
मंत्री गुलाबराव पाटील

-मुंबई ही स्वप्नाची नगरी आहे -देशाची आर्थिक राजधानी आहे. -कलाकार उत्तर प्रदेशात जाऊन काय डाकू बनणार आहेत का?
-नुसत्या इथल्या बँका कुणी लुटल्या हे पाहिलं तरी कळेल लगेच
- तिथे सुरक्षितता आहे का? -मुंबई सुरक्षित आहे. -उत्तरप्रदेशात दिवसा ढवळ्या बँकेत दरोडे पडतात.
-तिथे गुंतवणूक करणे किती उचित आहे
मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबतची खासदार संभाजीराजे यांची बैठक संपली. खासदार संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीसाठी वर्षा बंगल्याकडे रवाना. बैठकीत शैक्षणिक प्रवेशासाठी एसइबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुपर न्यूमररी सीट्स पद्दत लागू करण्याबाबत समनव्यकांची मागणी. मराठा क्रांती मोर्चाच्या समनव्यकांची बाजू खासदार संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संभाजीराजे यांची थोड्याच वेळात बैठक. बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित राहणार.
खासदार संभाजीराजे यांची मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक सुरू. बैठकीसाठी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक उपस्थित. शैक्षणिक प्रवेशासाठी एसइबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुपर न्यूमररी सीट्स पद्धतीचा वापर करण्याची सर्व समन्वयकांची मागणी. मराठा क्रांती मोर्चाची गिरगाव येथील शारदा मंदिर स्कुल येथे बैठक सुरू आहे. बैठकीत अपेक्षित निर्णय न झाल्यास समनव्ययक पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे. बैठकीला राजेंद्र कोंढरे, वीरेंद्र पवार, राजन घाग, विनोद साबळे उपस्थित.
दाऊदच्या लोटेतील जागेचा मालक भूमीपुत्र रविंद्र काते, 1 कोटी 10 लाखांची लिलावात सर्वाधिक बोली..मालमत्तेचा झाला लिलाव
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी होणार, आजच मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल होणार
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, उद्या राज्यात काँग्रेसतर्फे होणार आंदोलन, काँग्रेस पक्ष दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यांत करणार उद्या आंदोलन , शेतकऱ्यांना समर्थन तसंच केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा विरोधक यासाठी आंदोलन केले जाणार , काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यांना दिले आदेश ,

जिल्ह्यातील प्रत्येक ब्लाॅक मुख्यालय येथे होणार आंदोलन
नाशिक : मालेगावला विक्रीसाठी आणलेल्या 40 तलवारींसह तिघाना अटक करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक पथकाने ही कारवाई केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेलजवळ सापळा लावून ही कारवाई करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशन 7 ते 9 डिसेंबरदरम्यान मुंबईतच होण्याची शक्यता. कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा होता विचार. उद्या संसदीय कामकाज बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरण, स्थानिक गुन्हे शाखेने केली तिघांना अटक, पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील घाटात हल्लेखोरांनी केला होता हल्ला, धारदार शस्त्राने वार करून रेखा जरे यांची केली होती हत्या
रत्नागिरी चिपळूण - एकाच कुटुंबातील तिघांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू, सावर्डे असुर्डे धरणातील घटना, पोलिस घटनास्थळी दाखल, पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे, पंचनामा सुरु
रत्नागिरी चिपळूण - एकाच कुटुंबातील तिघांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू, सावर्डे असुर्डे धरणातील घटना, पोलिस घटनास्थळी दाखल, पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे, पंचनामा सुरु
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यमहामार्गावरील बीबी गावाजवळ रात्री अकराच्या सुमारास भरधाव ट्रेलरने दुचाकीस्वार पती-पत्नीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मेहकर-सिंदखेडराजा राज्यमहामार्गावर बीबीवरुन पती-पत्नी रात्री जात असताना पाठीमागून भरघाव येणाऱ्या ट्रेलरने जबर धडक दिली. पती आणि पत्नी ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलर चालकाने तिथून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच बीबी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बीबी सामान्य रुग्णालयात दाखल केले.
पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु नंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं ठराविक वेळेत महिला प्रवाशांनाही प्रवास करण्यास मुभा दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनानं रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे नवे वेळापत्रक 3 डिसेंबरपासून लागू होणार आहे. दरम्यान, 3 डिसेंबरपासून अमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द केल्याने पालघर आणि सफाळे येथील प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको केले.
पालघर रेल्वे स्टेशन मास्तर यांनी प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन ते मुंबई सेंट्रल ला पाठविण्याचे व तेथे जाऊन पाठपुरावा करण्याचे सांगितल्यानंतर अडविण्यात आलेली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. काही प्रवासी मुंबई सेंट्रल कार्यालयात जाऊन या विरोधात निवेदन देणार असल्याचे प्रवाशांनी सांगितले
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात एकत्रित अंदाजे 64.49 टक्के इतकं मतदान झालंय. निवडणूक विभागानं ही आकडेवारी जाहीर केलीय. 2014 मध्ये केवळ 37 टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या मतदानात परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 67.44 टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 66. 97 टक्के मतदान झालं. एकूण मतदारांपैकी 2 लाख 40 हजार 649 मतदारांनी आज दिवसभरात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या अधिक होती. औरंगाबाद जिल्ह्यात 63.5 टक्के, जालना जिल्ह्यात 66.54 टक्के,परभणी जिल्ह्यात 67.44 टक्के, हिंगोली जिल्ह्यात 66.58 टक्के, नांदेड जिल्ह्यात 64.07 टक्के, लातूर जिल्ह्यात 66.11 टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यात 66. 97 तर बीड जिल्ह्यात 62.8 मतदान झालं.
आज झालेल्या पदवीधर मतदान प्रक्रियेत सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी पंढरपूर शहरातील द. ह. कवठेकर प्रशालेत एक मतदान केंद्रात गेल्याने राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे . आज या मतदान केंद्रावर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे मतदान सुरू असताना खासदार सिद्धेश्वर स्वामी थेट एक मतदान केंद्रात घुसल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी घेतला आहे. वास्तविक आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार मतदान प्रक्रियेतील कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधी , निवडणूक निरीक्षक व मतदार याशिवाय कोणालाही निवडणूक केंद्रात जाण्याची परवानगी नसताना भाजप खासदार थेट मतदान केंद्रात गेले होते . यावर आक्षेप घेताच आपणास मतदान केंद्रास भेट देऊन योग्य पद्धतीने मतदान सुरू आहे का हा पाहण्याचा अधिकार असल्याचा दावा खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केला आहे. उद्या राष्ट्रवादीच्या वतीने सोलापूर येथे लेखी तक्रार दिली जाणार आहे.


आज झालेल्या पदवीधर मतदान प्रक्रियेत सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी पंढरपूर शहरातील द. ह. कवठेकर प्रशालेत एक मतदान केंद्रात गेल्याने राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे . आज या मतदान केंद्रावर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे मतदान सुरू असताना खासदार सिद्धेश्वर स्वामी थेट एक मतदान केंद्रात घुसल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी घेतला आहे. वास्तविक आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार मतदान प्रक्रियेतील कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधी , निवडणूक निरीक्षक व मतदार याशिवाय कोणालाही निवडणूक केंद्रात जाण्याची परवानगी नसताना भाजप खासदार थेट मतदान केंद्रात गेले होते . यावर आक्षेप घेताच आपणास मतदान केंद्रास भेट देऊन योग्य पद्धतीने मतदान सुरू आहे का हा पाहण्याचा अधिकार असल्याचा दावा खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केला आहे. उद्या राष्ट्रवादीच्या वतीने सोलापूर येथे लेखी तक्रार दिली जाणार आहे.


पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीत एटीएम मशीन फोडताना एकास रंगेहाथ पकडण्यात आलंय. खंडोबा माळ चौकातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे हे एटीएम मशीन होते. गणेश सोनवणे असं त्या तरुणाचं नाव आहे. बँक बंद होतानाच लगतच्या एटीएममध्ये गणेश आला आणि एका दगडाने मशीन फोडू लागला. याचा आवाज ऐकून बँक कर्मचारी एटीएमकडे धावले असता हा प्रकार समोर आला. कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवलं आणि निगडी पोलिसांना कळविण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतलं. तो बेघर आणि व्यसनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच एटीएम मशीन मधील एकही रुपया चोरीला गेलेला नाही.
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये विज्ञान भवनातली बैठक संपली, परवा पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. कायद्यावर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा केंद्राचा प्रस्ताव, रोज चर्चा करण्याची तयारी आहे. चर्चेची आमचीही तयारी, पण ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे नाही, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंदच राहणार आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या यामागचं कारण आहे. ही संख्या पाहून अवघ्या 7 ते 8 टक्के पालकांनीच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची संमती दिली आहे. त्यामुळे 1 डिसेंबरला शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची नामुष्की महापालिकेवर आली. दुसरीकडे खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीची प्रक्रिया ही अद्याप पूर्ण झालेली नाही.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची धग महाराष्ट्रात, कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, आंदोनादरम्यान कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरेंनी बांधलं उर्मिला मातोंडकरांना शिवबंधन
उर्मिला मातोंडकर दुपारी एक वाजता शिवसेनेत प्रवेश करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला हातावर शिवबंधन बांधणार, शिवसेनेत उर्मिला यांना कोणती जबाबदारी याची उत्सुकता
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ नागपूर-मुंबई महामार्गावर एका बसला आग झाली. चालकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचे प्राण वाचले. ट्रॅव्हल्समध्ये बिघाड झाल्याने मेहकरजवळ चालक इकबाल खान पठाणने बस रस्त्याच्या कडेला लावून तपासणी केली असता मात्र गाडीच्या इंजिनाने पेट घेतला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घडली. या ट्रॅव्हल्समध्ये 35 प्रवासी प्रवास होते. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाढ झोपलेल्या सर्व प्रवाशांना उठवून त्यांना सामानासह बाहेर काढले. ट्रॅव्हल्सच्या चालकाचा सर्व प्रवाशांकडून कौतुक होत आहे. मेहकर अग्निशमन दलाने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यात बस पूर्णतः जळून खाक झाली.

बीड - पोखरी शिवारात 55 वर्षीय महिलेचा मृतदेह सोयाबीनच्या ढिगार्‍याजवळ जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोबतच बाजूचा सोयाबीनचा ढिगाराही जाळून खाक झाला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात किंवा अपघात याचा तपास पोलीस करत आहेत. काशीबाई विष्णू निकम (वय अंदाजे 55) असे त्या मृत महिलेचे माहेरचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. काशीबाईचे सासर परळी तालुक्यातील नागपिंपरी आहे. लग्नानंतर काही दिवसातच काशीबाई माहेरी निघून आली आणि स्थायिक झाली. पोखरी गावात मागील चार दिवसांपासून सप्ताह सुरु होता. रविवारी रात्री काशीबाईने सप्ताहाची पंगत दिली. सर्व वारकरी भोजन करुन गेल्यानंतर ही महिला घरात दिसून आली नाही. पंगत दिल्यानंतर ती बेपत्ता झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


सीरम इन्स्टिट्युटचे अदार पूनावाला 'एशियन ऑफ द ईयर', कोरोना महामारीचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका


जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांची 'एशियन ऑफ दी इयर' म्हणून निवड करण्यात आली आहे. द स्ट्रेट्स टाईम्स ऑफ सिंगापूरने अदार पूनावालासह सहा जणांना एशियन ऑफ द इयर सन्मानासाठी निवडले आहे. यावर्षी कोविड 19 साथीच्या विरूद्ध लढा देण्यास योगदान देणाऱ्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.


पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, कोविड 19 लस 'कोविशिल्ट' विकसित करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडन कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांच्याबरोबर काम करत आहे. त्यासाठी कोरोना लसीची चाचणी भारतात घेण्यात येत आहे.


पालघरमधील तारापूर येथे लोकसहभागातून साकारला 39 एकरांचा 'श्रीकृष्ण तलाव'


देशात अनेक भागाला मार्चनंतर दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून याला आता कोकणही अपवाद राहिलं नाही. शासनाकडून अनेक उपाययोजना सुरु केल्या जातात त्या बंदही पडतात. मात्र पालघरमधील तारापूर जवळील कुडण येथे लोकसहभागातून तब्बल 39 एकरवर दीड किलोमीटर लांबीचा तलाव तयार करण्यात आला आहे. या तलावामुळे या परिसरातील नागरिकांसह, प्राण्यांची,पक्ष्यांचीही तहान भागवण्यास मोठी मदत होत आहे.


पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुशक्ती केंद्राच्या बाजूलाच असलेल कुडण गाव याच गावाच्या बाजूला खारटण जमीन. एरवी या जमिनीत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरत असल्याने खारटण असल्याने काहीही उपयोग होत नव्हता. तर आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे दुर्भिक्ष जाणवत होतं, मात्र हेच पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी या भागातील सामाजिक काम करणारी लोक धावून आली. यामध्ये लायन्स क्लब तारापूर आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून 39 एकरवर गोड्या पाण्याच्या तलावाची निर्मिती करण्याचा विचार झाला आणि 2017 साली सुरु झालेल काम सध्या पूर्णत्वास आलं आहे.


IND Vs AUS 2nd T20 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात आज दुसरा टी20 सामना; टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी


एकदिवसीय सामन्यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-2 असा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला. रविवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघांमध्ये दुसरा टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासमोर दुसरा सामना जिंकत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. परंतु, ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या टी20 सामन्यात वापसी करणं अवघड असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात दुखापतींचं सत्र सुरुच असून अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.


डेव्हिड वॉर्नर आधीपासून सीरिजमधून बाहेर आहे. कर्णधार एरॉन फिंचलाही पहिल्या टी20 सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात फिंच खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. जर दुसऱ्या टी20 सामन्यांत फिंच खेळला नाही तर हा यजमान संघासाठी मोठा धक्का असणार आहे. जर फिंच आजच्या सामन्यात गैरहजर राहिला तर संघासाठी धावांचा डोंगर रचण्याची जबाबदारी स्टीव्ह स्मिथवर असणार आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.