मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करुनही हा संसर्ग कमी होताना दिसत नाही. अशातच राज्यात आज दिवसभरात 35 हजार 952 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 111 कोरोना रुग्णांचा राज्यात आज मृत्यू झाला आहे. राज्याच्या मृत्यूदर 2.07 टक्क्यांवर पोहोचला आहे. 


राज्यात आज दिवसभरात 20 हजार 444 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यातील एकूण 22 लाख 83 हजार 037 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 2 लाख 62 हजार 685 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% इतके झाले आहे.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात 5 हजार 504 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 2 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 33 हजार 603 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट सध्या 88 टक्के इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 75 दिवसांवर पोहोचला आहे. 


भारत आता कोरोना लसीची निर्यात थांबवणार, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यावर भर


गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये जलदता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता येत्या एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी फक्त 60 वर्षावरील नागरिक आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत होती. आता त्या नियमात बदल झाला आहे. आतापर्यंत पाच कोटी नागरिकाना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर भारताने शेजारील देश, आशियायी देश, आफ्रिकन देश आणि युरोपच्या काही देशांना कोरोनाची लस निर्यात करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा देशांतर्गत मागणी वाढल्याने ही निर्यात काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :