नवी दिल्ली : देशात अचानक कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर वाढ होत असल्याने सरकारच्या काळजीत भर पडली आहे. त्यामुळे देशांतर्गत कोरोना लसीची मागणी पूर्ण करण्यासाठी भारताने आता आपली इतर देशांना करण्यात येणाऱ्या कोरोनाच्या लसीच्या निर्यातीवर काही काळासाठी निर्बंध आणले आहेत. आतापर्यंत पाच कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये जलदता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता येत्या एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी फक्त 60 वर्षावरील नागरिक आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत होती. आता त्या नियमात बदल झाला आहे. आतापर्यंत पाच कोटी नागरिकाना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर भारताने शेजारील देश, आशियायी देश, आफ्रिकन देश आणि युरोपच्या काही देशांना कोरोनाची लस निर्यात करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा देशांतर्गत मागणी वाढल्याने ही निर्यात काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


देशात आतापर्यंत पाच कोटी आठ लाख 41 हजार 286 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. सध्या देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांवर गेली आहे तर तीन लाख 68 हजार लोकांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात एक कोटी 17 लाख 87 हजार पेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. 


महाराष्ट्रात बुधवारी विक्रमी 31 हजार 855 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा सर्वांच्याच चिंता वाढवणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करुनही हा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, आज नवीन 15 हजार 098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 247299 सक्रीय रुग्ण असू  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% झाले आहे.


संबंधित बातम्या :