LIVE UPDATES | पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, 506 फेऱ्यांऐवजी आता 700 लोकलच्या फेऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन Mumbai Power Cut | केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार, आपत्तींवरच्या उपायांबाबत महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन करणार सलमान, शाहरुख, अजय देवगनसह बॉलिवूडमधील बडे निर्माते रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ विरोधात दिल्ली हायकोर्टात IPL2020, RCBvsKKR | रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Oct 2020 09:59 PM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे किंवा इतर अन्य कारणामुळे ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून सुद्धा JEE Advanced 2020 परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांना 2021 मध्ये परीक्षा देता येणार. असे विद्यार्थी JEE Main 2021 परीक्षा न देता सरळ JEE Advanced 2021 परीक्षेस पात्र असणार, जॉईंट अॅडमिशन बोर्डकडून निर्णय घेण्यात आला आहे.
आरटीपीसीआर किट या बाबीसाठी हाफकिन खरेदी कक्षामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेमध्ये मे.जीसीसी बायोटेक इंडिया प्रा.ली यांना आयसीएमआर यांनी प्रमाणित केले.या कंपनीचा उत्पादन दर सर्वात कमी म्हणजे रुपये ५५ प्रति चाचणी असल्यामुळे यांना १२ लाख ६० हजार आरटीपीसीआर किट्स पुरवठा करणेबाबतचे आदेश देण्यात आले.एकूण संख्या पैकी ६ लाख २९ हजार चाचण्यांचा पुरवठा केल्यानंतर एनआयव्ही पुणे यांचेमार्फत या आरटीपीसीआर चाचण्यांची तपासणी करून घेण्यात आली.या तपासणीअंती राष्ट्रीय विषाणू संस्था (एन.आय.व्ही) पुणे यांनी चाचण्या योग्य असल्याबाबतचा अहवाल दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी दिल्यानंतरच सर्व प्रयोगशाळांना वरील किटच्या चाचण्यांचे वाटप करण्यात आले.

दरम्यानच्या काळात या चाचण्या योग्य नसल्याबाबत काही तक्रारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पाच सदस्यांमार्फत या चाचण्यांची तपासणी केली. आरटीपीसीआर बॅच नं.२०११५के१३१२ योग्य नसल्याचे मत समितीने ९ ऑक्टोबर २०२० रोजी दिल्यामुळे या किटच्या असमाधानकारक परिणामांमुळे एकूण ६ लाख ५० हजार चाचण्यांचा पुरवठा तात्काळ थांबविण्याबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे एकूण ६ लाख २९ हजार चाचण्या बदलून देण्याबाबत या कार्यालयाने ९ ऑक्टोबर २०२० रोजी मे.जीसीसी बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना कळविले असल्याचे हाफकीनचे जीव-औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केले.तरी,हाफकिन खरेदी कक्षामार्फत आरटीपीसीआर किट्सचा सुरळीत पुरवठा होईपर्यंत दैनंदिन चाचण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था (एन.आय.व्ही) यांच्यामार्फत आरटीपीसीआर पुरवठा चालू ठेवण्याकरिता विनंती करण्यात आली असून या विनंतीला एन.आय.व्ही यांच्यामार्फत मान्यता प्राप्त झाली आहे. यामुळे या कालावधीत रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नसून पूर्वीप्रमाणे चाचण्या सुरू राहतील असे मत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.टी.पी. लहाने यांनी व्यक्त केले आहे.
औरंगाबाद सार्वजनिक वाहन चालवताना वाहन चालकाने मास्क वापरणे बंधनकारक, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा निर्णय,
नियमांचे पालन न करणाऱ्या विना मास्क वाहन चालवणाऱ्याचा पहिल्यांदा 30 दिवस तर दुसऱ्या वेळी मास्क घातला नाही तर 90 दिवसांकरीत वाहन परवाना रद्द करणार, .तिसऱ्या गुन्ह्याकरीता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय
पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, 506 फेऱ्यांऐवजी आता धावणार 700 लोकलच्या फेऱ्या,
तसेच लॉकडाऊनपासून बंद असलेली एसी लोकल देखील आता धावणार,
एसी लोकलच्या 10 फेऱ्या पश्चिम रेल्वे चालवणार , हे बदल 15 ऑक्टोबरपासून लागू होणार
गडचिरोली राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, चंद्रपूरहून गडचिरोलीत दाखल होणारा अवैध दारूसाठा केला जप्‍त, सुमारे 15 लाख रुपयांचा देशीदारू मुद्देमाल केला जप्त, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील तीन आरोपी अटकेत, रिकाम्या ट्रकमध्ये चोरकप्पा तयार करून गडचिरोलीत आणला जात होता अवैध दारूसाठा, गडचिरोलीत दारूबंदी अपयशी होत असल्याची चर्चा होत असताना उत्पादन शुल्क विभाग झाला सक्रिय
भाजप आमदार आशिष शेलार यांना 8 ते 10 धमकीचे कॉल्स, जीवे मारण्याची दिली धमकी, आशिष शेलार यांची पोलिसात तक्रार, दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची शेलार यांची माहिती
मुंबईच्या रस्त्यांवर स्वतःला व्हीआयपी भासवत अनेक वाहन चालक आणि मालक मोटार कार च्या काचांना ब्लॅक फिल्म आणि आणि फॅन्सी नंबर प्लेट लावत असतात. मात्र आता वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कडक कारवाईला सुरुवात केली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर अशा वाहनांना रोखून पोलिसांनी त्यांच्या काचांवरील ब्लॅक फिल्म स्वतः काढून त्या चालकांना दंड ठोकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच फॅन्सी नंबर प्लेटवर देखील कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारे काचांवर ब्लॅक फिल्म लावल्याने नक्की गाडीत कोण आहेत? हे कळत नाहीं त्यामुळे घातपात होण्याची शक्यता देखील आहे.त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी कंबर कसली असून या विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याकडे, नवी मुंबईकडून मुंबईत आणि मुंबई मधून ठाणे, नवी मुंबईत जाणाऱ्या वाहनांवर सकाळ पासून कारवाई सुरु आहे.आता पर्यंत 45 गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
सांगली : महाराष्ट्रातील सर्व मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता आमदार गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी मधील बिरोबा मंदिरासमोर आंदोलन करत लाक्षणिक उपोषण केले. मंदिर बंद आणि उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार" अशा घोषणाबाजी देऊन यावेळी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर आता अनलॉक प्रक्रिया सुरु होऊन सर्व काही सुरु होत आहे. मात्र राज्यात मंदिरे प्रार्थनास्थळे उघडण्यावर अजून निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे आज भाजपच्या वतीने राज्य सरकारविरोधात महाराष्ट्रभर मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सांगलीत देखील गणपती मंदिर समोर आंदोलन पार पडले.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिल परब यांना कोरोनाची लक्षणं असल्याने त्यांना उपचारांसाठी लिलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. दरम्यान यानंतर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली मुंबईतल्या आमदारांची बैठक रद्द करण्यात आली आहे. वर्षा बंगल्यावर आज मुंबईतील आमदारांची बैठक पार पडणार होती. परंतु अनिल परब आणि काही आमदारांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांन आजची बैठक रद्द केली.
जालना : सदोष किट्स प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करा, तसेच या प्रकरणातील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. तसेच अर्जुन खोतकरांनीही मुख्यमंत्र्यांना चौकशीच्या मागणीचं पत्र लिहिलं आहे.
मुंबई : एकीकडे राज्यभरात मंदीरं खुली करण्यासाठी आंदोलनं होत असताना, न्यायदेवतेचं मंदीर असलेलं हायकोर्टही लवकरात लवकर पूर्णक्षमतेनं सुरु करावं अशी मागणी करत वकिलांनी कोर्टाबाहेर शांततेत आंदोलन केलं. मुंबई उच्च न्यायालयाचं नियमित कामकाज लवकरात लवकर सुरु व्हावं या मागणीसाठी आता इतरांच्या न्यायासाठी लढणाऱ्या वकिलांवरही आंदोलन करण्याची वेळ आली आहे. राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरु असताना न्यायालयांवर मर्यादा का? लॉकडाऊनच्या काळात जेष्ठ वकिलांचं निभावून गेलं, मात्र कनिष्ठ वकिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. जोपर्यंत कोर्ट पूर्ण क्षमतेनं कार्यरत होत नाही तोपर्यंत वकिलांचे हाल संपणारे नाहीत. तेव्हा अनलॉकच्या येत्या पर्वात प्रशासनानं याचा गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी हे वकील करत आहेत.
भिवंडी : राज्यातील बीअरबार उघडले पण मंदिरे मात्र अजूनही बंदच आहेत. मंदिरांची दारे लवकरात लवकर उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपच्या वतीने शहरातील वऱ्हाळ देवी माता मंदिराच्या पायथ्याशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी गाण्याच्या माध्यमातून उद्धव सरकार ही धुंद सरकार ,दार उघड़ उद्धवा, अश्या घोषणा देखील देण्यात आल्या.
विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि पोलिसात खडाजंगी , नामदेव पायरीसमोर आंदोलन करण्यास पोलिसांचा विरोध
पंढरपूर - विठ्ठल मंदिरावरील पारंपरिक हक्काबाबत बडवे समाजाची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, 2017 पासून प्रयत्न सुरु होते
राज्यात कोरोना संसर्गाची तपासणी करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआरच्या 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.दरम्यान या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येत असून GCC Biotech ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला आहे. तसंच सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची आजवर नोंद झाली असून अजूनही पाऊस सुरूच आहे. सतत झालेल्या पावसाने शेतात सर्वत्र पाणी साचून पिकांना मोड फुटल्याने हाती आलेले पीक वाया गेले आहे. उडीद, मूग या पिकांसह सोयाबीन, कापूस आणि हळद हि पिके देखील वाया गेली आहेत.
सांगली जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडतो आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने शेत शिवारे जलमय झाली आहेत. त्यातच पिकेही पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे हिरावला गेला आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका ऊस, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, खरीप पिके तसेच पालेभाज्यांना बसला असून फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
नागपूर : ड्युटीवर सतत गैरहजर राहणाऱ्या आणि वारंवार सीकलिव्ह घेऊन गैरहजर राहणाऱ्या 15 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. हे कर्मचारी सतत अनुपस्थित राहत असल्यामुळे त्यांच्या कामाचा भार दुसऱ्या कर्मचाऱ्यांवर यायचा. म्हणून या कर्मचाऱ्यांचा अनुपस्थित राहण्याच्या कारणांचा आढावा घेत आयुक्त अमितेशकुमार यांनी ही कारवाई केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, कापूस, हळद या पारंपारिक पिकांसोबत सिताफळाच्या फळबागांना देखील मोठा प्रमाणावर फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे सीताफळाच्या फुलांना बुरशी लागून फुल आणि कळ्या करपून गळून पडत आहेत त्यामुळे लागलेली फळाची देखील मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे त्यामुळे सिताफळाच्या उत्पन्नात जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के या वर्षी घट झालेली दिसून येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शासनाने यावर काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील कोविड विभागात काम करणारे 200 प्रशिक्षणार्थी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. मुंबई-पुण्याप्रमाणे वाढीव भत्ता मिळण्याची मागणी या डॉक्टरांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. हाताशी आलेलं पिक आडवं झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. सध्याची स्थिती पाहता कापून ठेवलेल्या पिंकाना मोड येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वत्र सारखंच चित्र पाहायाला मिळत आहे. सध्याची स्थिती पाहता परतीच्या पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून आता काय करायचं? असा उद्विग्न सवाल तो करत आहे. काही ठिकाणी तर सुकायला घातलेली पिकं वाहून गेली. दरम्यान, पुढील पाच दिवस देखील जोरदार पाऊस कोसळू शकतो असा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केल्यानं शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
तरुण मुलींसोबत डेटिंगचे स्वप्न पाहणाऱ्या पुण्यातील एका 68 वर्षीय आजोबांना सायबर चोरट्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. मुली पुरवण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी या आजोबांकडून तब्बल पावणे चार लाख रुपये लुबाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या आजोबांनी सायबर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे.
कन्नडमधील प्रसिद्ध गीतकार के.कल्याण आणि त्यांच्या पत्नीत बेबनाव निर्माण करून सहा कोटी रुपयांची मालमत्ता हडप केलेल्या मांत्रिकाला माळ मारुती पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी बेळगावातील माळ मारुती पोलीस स्थानकात पत्रकार परिषदेत दिली.
गीतकार के कल्याण यांच्या घरी कामाला असलेल्या महिलेला हाताशी धरून मांत्रिक शिवानंद वाली यांने कल्याण यांची पत्नी अश्विनी हिला तुम्हाला तुमच्या पतीपासून धोका आहे असे सांगितले. त्यानंतर अश्विनी आणि तिच्या आई वडिलांना वशीकरण करून चाळीस लाख रुपये रोख, 350 ग्रॅम सोने, सहा किलो चांदी आणि विविध ठिकाणच्या मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बंगलोर येथील कल्याण यांच्या घरात कामाला असलेल्या गंगा कुलकर्णी हिला हाताशी धरून मांत्रिक शिवानंद वाली याने कार्यभाग साधला होता.यासंबंधी कल्याण यांनी माळ मारुती पोलीसात तक्रार नोंदवली होती.पोलिसांनी त्याची दखल घेऊन तपास करून मांत्रिकाला गजाआड केले.चौकशीत त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली.आलेल्या पैशातून त्याने दहा मिनी बस देखील खरेदी केल्या होत्या.या बस देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सोलापुरात पुन्हा एकदा मुसळधार पावसला सुरूवात, काही भागात वीज गेली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट,

बिहार निवडणूक एकत्र लढण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती,

परवा संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक झाली होती, त्यानंतर ही बैठक झाली
वीज पुरवठा खंडित झाल्याने आज सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 20 ऑक्टोबरला घेणार,

आज इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेशन मधील ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळें अडचणी आल्याने परीक्षा देऊ शकले नाहीत अशा 5 केंद्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 20 ओक्टोबर रोजी घेतल्या जाणार असल्याचे सीईटी सेल कडून सांगण्यात आले आहे,

आज सकळी फर्स्ट सेशन परीक्षा सकाळी 10 वाजता सुरू झाली मात्र परिक्षेदरम्यान वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना सीईटी पेपर देता आले नाही त्यांना आता 20 ओक्टोबरला पेपर देता येणार आहे
वीज पुरवठा खंडित झाल्याने आज सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 20 ऑक्टोबरला घेणार,

आज इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेशन मधील ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळें अडचणी आल्याने परीक्षा देऊ शकले नाहीत अशा 5 केंद्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 20 ओक्टोबर रोजी घेतल्या जाणार असल्याचे सीईटी सेल कडून सांगण्यात आले आहे,

आज सकळी फर्स्ट सेशन परीक्षा सकाळी 10 वाजता सुरू झाली मात्र परिक्षेदरम्यान वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना सीईटी पेपर देता आले नाही त्यांना आता 20 ओक्टोबरला पेपर देता येणार आहे
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना महाविकास आघाडी सरकार हे अत्याचार थांबवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत आज परभणीत भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या महिलांच्या आंदोलनात भाजपच्या सर्व सेलचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यामधील बहुतांश भाग प्रभावित झाले आहे, अशी माहिती समोर येत आहे.
महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यामधील बहुतांश भाग प्रभावित झाले आहे, अशी माहिती समोर येत आहे.
महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यामधील बहुतांश भाग प्रभावित झाले आहे, अशी माहिती समोर येत आहे.
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात वीज गायब झाली असून. बेस्ट, अदानी, एमएसइबीच्या भागात वीज नाही. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली असून प्रवासी अडकले आहेत. तसंच सिग्नल यंत्रणाही बंद झाली आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांनाही वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसत आहे.
बेळगाव : ढगफुटी झाल्याप्रमाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला.पावसामुळे शहरातील बहुतेक भागात रस्त्यावरून पाणी वाहत होते.सखल भागात पाणी साठले होते.मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती.शहरातील नाल्याच्या पातळीत देखील वाढ झाली होती.गटारीतील कचरा पावसामुळे रस्त्यावर वाहत होता.बेळगाव जिल्ह्यात हुक्केरी,खानापूर,चिकोडी,बैलहोंगल तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली.बेळगावसह धारवाड,गदग,कोप्पळ आदी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.परतीच्या पावसामुळे कापणीला आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

परभणी : गेल्या दोन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले आहेत. जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून पुर्णा नदी पात्रात दरवाज्यांमधून 8400 क्युसेकने तर विद्युत प्रकल्पातून 2500 असा 11000 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर सेलु तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पातूनही दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. लोअर दुधना प्रकल्पाचे 10 दरवाजे रात्री उघडण्यात आले होते. ज्यातून 18110 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. आता सध्या हे यातील 2 दरवाज्यांमधून 2500 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
पुणे : राज्यशासनाने लोकल सेवेसाठी हिरवा कंदील दाखविल्यानंतर आजपासून पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरू झाली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच या लोकलमधून प्रवास करता येणार आहे. या लोकलमधून प्रवास करण्याआधी पोलिसांनी दिलेला क्यूआर कोड दाखवणे बंधनकारक असणार आहे. कारण ई पास दाखवल्यानंतरच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे.
वीज पडल्याने शेतात काम करणाऱ्या पाच महिला जखमी झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. कोंढाली पोलिस स्टेशनअंतर अंतर्गत येणाऱ्या शिवा(सावंगा) गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. जखमी महिलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
औरंगाबादमध्ये आयपीएल सट्टा लावणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. अबुधाबीमधील सामन्यावर सट्टा लावत होता. जुना मोंढा भागात जिन्सी पोलिसांनी ही कारवाई केली. गणेश व्यवहारे (वय 35 वर्ष) असं अटक केलेल्या सट्टेबाजाचं नाव आहे. त्याच्याकडून 24 हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. मुख्य सूत्रधार मनोज दगडा याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
औरंगाबादमध्ये आयपीएल सट्टा लावणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. अबुधाबीमधील सामन्यावर सट्टा लावत होता. जुना मोंढा भागात जिन्सी पोलिसांनी ही कारवाई केली. गणेश व्यवहारे (वय 35 वर्ष) असं अटक केलेल्या सट्टेबाजाचं नाव आहे. त्याच्याकडून 24 हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. मुख्य सूत्रधार मनोज दगडा याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये काल संध्याकाळी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे काळभैरी मंदिरात पाणी शिरलं, तर शेंद्री इथला तलाव ओव्हर फ्लो झाला.
कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये काल संध्याकाळी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे काळभैरी मंदिरात पाणी शिरलं, तर शेंद्री इथला तलाव ओव्हर फ्लो झाला.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा गावात 9, 10 आणि 11 ऑक्टोबर या तीन दिवसात तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिन्ही आत्महत्येची कारणे वेगवेगळी असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद वसमतच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. या तीन तरुणाच्या जाण्याने बोराळा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रभाकर जाधव, संतोष खराटे, राजू गंगातीरे अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत. 25 ते 30 वयोगटातील हे तीनही तरुण हे शेतकरी कुटुंबातील होते.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा गावात 9, 10 आणि 11 ऑक्टोबर या तीन दिवसात तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिन्ही आत्महत्येची कारणे वेगवेगळी असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद वसमतच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. या तीन तरुणाच्या जाण्याने बोराळा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रभाकर जाधव, संतोष खराटे, राजू गंगातीरे अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत. 25 ते 30 वयोगटातील हे तीनही तरुण हे शेतकरी कुटुंबातील होते.
मुंबईच्या एल्फिन्स्टन पुलावर काल मध्यरात्री एका पेपरने भरलेल्या टेम्पोला होंडा सिटी गाडीने धडक दिली. ओव्हर टेक करताना हा अपघात झाला असून यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. टेम्पोचालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला केईएम रुग्णालयात उपचारास नेण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रस्त्यावर उलटलेली दोन्ही वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.
लखनौ : हाथरस प्रकरणी आज अलाहाबाग हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने हाथरस प्रकरणाची स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली असून उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. हायकोर्टाने डीजीपी, एडीजी (कायदा व सुव्यवस्था), डीएम हाथरस, एसपी हाथरस यांना समन्स बजावले होते. दरम्यान, आज पार पडणाऱ्या सुनावणीसाठी पीडितेच्या कुटुंबातील काही सदस्य हाथरसहून अलाहाबादसाठी रवाना झाले आहेत. पीडित कुटुंबातील पाच सदस्य या सुनावणीसाठी कडक सुरक्षेत लखनौला रवाना झाले आहेत.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


कुणाल कामरा आणि संजय राऊत यांची 'उखाड दिया' मुलाखत


 


शिवसेना नेते संजय राऊत आणि स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांची लवकरच 'शट अप यार कुणाल' या पॉडकास्ट मध्ये मुलाखत होणार असल्याचं दोघांनीही ट्विटरवरून जाहीर केलं होतं. या पोस्टचं अनेकांनी स्वागत केलं तर काहींनी ट्रोलही केलं.


 


आज मुंबईत खारमधल्या एका खासगी स्टुडियोत या मुलाखतीचं चित्रीकरण करण्यात आलं. थोड्याच दिवसात याचं समाज माध्यमांवर प्रक्षेपण होणार आहे. संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक शैलीतून तर कुणाल कामरा हा त्याच्या उपरोधक कॉमेडीच्या माध्यमातून कायमच मोदी आणि भाजपवर निशाणा साधत असल्यामुळे कायम चर्चेत असतात.


 


आजच्या या मुलाखतीत कंगना ते अर्णब आणि सुशांत ते कन्हैय्या या सर्व विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या आहेत. इतकंच नाही तर मुलाखतीच्या केंद्रस्थानी बुलडोझर हे प्रॉप होते आणि या बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे यावरही या मुलाखतीतून खुलासा होणार आहे. त्यामुळे दोघांच्या या मुलाखतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.


 


सांगली - खानापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस,अग्रणी नदीला पूर


 


सांगली जिल्ह्यामध्ये रविवारी पाऊसाचा कहर झाला आहे. सांगली शहरासह दुष्काळी खानापूर,तासगाव आणि कडेगाव या तालुक्‍यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे.तर खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. तसेच इतर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी,नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. अग्रणी नदीवरील करंजे आणि बलवडी मधील पुलावरून दोघेजण वाहून गेले आहेत.


 


सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. रविवारी जिल्ह्यामध्ये सर्वदूर धुवादार असा पाऊस पडला आहे. दुपारपासून सांगली शहरासह जिल्ह्यातल्या तासगाव, कडेगाव आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. तर इतर तालुक्यातील जोरदार पाऊस पडला आहे. विशेष खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी असणार्‍या नदी-नाले आणि अग्रणी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच बरोबर या झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यावर आणि पुलावर पाणी आले. तर खानापूर तालुक्यात अग्रणी नदीला पूर आला असून झरे, बलवडी, बेनापूर पुलावर पाणी आले आहे तर अन्य ओढ्यांनासुद्धा पूर आला आहे. तसेच विटा - कराड रोड वरील नांदणी व येरळा नदीवरील डायव्हर्शन केलेला कचे पूल नदीला आलेल्या पुराने वाहून गेले आहे. त्यामुळे विटा कराड रस्त्याची वाहतूक शिवणी मार्गे चालू आहे. याशिवाय जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातील नदी, नाले आणि ओढ्यांना सुध्दा पूर आला आहे,त्यामुळे या ठिकाणी असणारे छोटे बंधारे आणि छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत.


 


टीआरपी घोटाळा प्रकरण, मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीच्या तीन अधिकाऱ्यांची चौकशी


 


टीआरपी घोटाळा प्रकरणी आज दिवसभर मुंबई क्राईम ब्रान्चने रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी, हर्ष भंडारी यांची मुंबईत तर दमणमध्ये डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग यांची पोलिसांनी चौकशी केली. या तिघांनाही उद्या चौकशीसाठी कागदपत्रांसह पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. CRPC 91 अंतर्गत नोटीस बजावली असून चॅनलला मिळालेल्या जाहिराती, त्यातून मिळालेले उत्पन्न आणि इतर महत्त्वाची कागदपत्र घेऊन चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.


 


टीआरपी घोटाळा प्रकरणी आज पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी यांची 9 तास, COO हर्ष भंडारी यांची 6 तास, तर मुंबईत आणि दमण पोलिसांनी डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग याची 6 तास कसून चौकशी केली आहे. या तिघांनाही टीव्ही जाहिराती संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर पोलिसांकडे जमा करण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न, नफा, तोटा यांसंदर्भातला सगळा डाटा रिपब्लिकला पोलिसकडे द्यावा लागणार आहे.


 


कालच्या चौकशीत टीव्हीवर दिसणाऱ्या कंटेंटशी आमचे देणंघेणं नसून त्यासाठी एडिटोरियल विभाग जबाबदार असतो, अशी माहिती विकास खानचंदानी यांनी दिली आहे. काल रिपब्लिक चॅनेलवर एक शो ऑन एअर करण्यात आला. ज्यामध्ये हंसा नावाच्या कंपनीचा अहवाल आहे. असं सांगून त्या शोमध्ये इंडिया टुडेवर आरोप करण्यात आले आहेत. मात्र हंसा कंपनीने तो अहवाल स्वतःचा नसल्याचं पोलिसांना स्पष्ट केलं आहे. या संदर्भात वेगळी चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. आज या शो संदर्भात उत्तर देण्यास विकास खानचंदानी यांनी असमर्थता दर्शवली आहे.


 


IPL 2020, MIvsDC : मुंबईकडून दिल्लीचा 5 विकेटने पराभव; डिकॉक-सूर्यकुमार यादव विजयाचे हिरो


 


मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सचा पाच विकेटने पराभव करत पॉईंट टेबलमध्ये नंबर वनवर पोहोचली आहे. दिल्लीने मुंबईला 163 धावाचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबईने 19.4 षटकात पूर्ण केलं. क्विंटन डिकॉक आणि सू्र्यकुमार यादवची खेळी निर्णायक ठरली. मात्र दिल्लीकडून शिखर धवनची नाबाद अर्थशतकी खेळी व्यर्थ गेली. पॉईंट टेबलमध्ये मुंबई आणि दिल्ली दोन्ही संघांचे 10-10 गुण आहेत. दोन्ही संघांनी 7 सामन्यांपैकी 5-5 सामने जिंकले आहेत. मात्र नेट रनरेट जास्त मुंबई नंबर वनवर पोहोचली आहे.


 


दिल्लीने दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा 5 धावा करत तंबूत परतला. त्यावेळी क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमारने डाव सावरला. डिकॉकने 36 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत त्याने 4 चौकर आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर सूर्यकुमार यादवने 32 धावात 53 धावांची खेळी केली. त्याने 6 चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर ईशान किशनने 28 धावा, कायरन पोलार्ड 11 धावा, कृणाल पांड्याने 12 धावांची खेळी केली. बर्थडे बॉय हार्दिक पांड्या मात्र आज शुन्यावर बाद झाला. दिल्लीकडून कागिसो रबाडाने 2, अक्षर पटेल, आर अश्विन, मार्क्स स्टॉयनिसने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.