मुंबई : राज्यात आज 771 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज गेल्या काही दिवसातील राज्यातील मनपा आणि जिल्ह्याची आयसीएमआर यादीनुसार अद्ययावत आकडेवारी ही जाहीर करण्यात आली. त्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजार 541 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 310 झाली असून, मुंबई महापालिका हद्दीतील मृतांचा एकूण आकडा 361 इतका झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आज 350 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत राज्यात 2465 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
आज 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज झालेल्या मृ्त्यूंपैकी मुंबई मधील 18, पुण्यातील 7, अकोला मनपातील 5, सोलापूर जिल्हातील 1, औरंगाबाद शहरात 1, ठाणे शहरात 1 आणि नांदेड शहरात 1 मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 583 झाली आहे.
आज झालेल्य मृत्यूंपैकी 22 पुरुष तर 13 महिला आहेत. आज झालेल्या 35 मृत्यूंपैकी 60 वर्ष किंवा त्यावरील 13 रुग्ण आहेत, तर 19 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षाखालील आहेत. मृत रुग्णापैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती मिळालेली आहे. उर्वरित 33 जणांपैकी 23 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 76 हजार 323 नमुन्यांपैकी 1 लाख 62 हजार 349 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले असून, 14 हजार 541 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यत राज्यातून 2 हजार 465 रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात 1 लाख 98 हजार 42 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून, 13,006 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत असे राजेस टोपे म्हणाले.
देशभरातील कोरोनाची सद्यस्थिती
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून आज 42 हजार 533 वर पोहोचली आहे. यापैकी 29 हजार 453 अॅक्टिव्ह केसेस आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 11000 पेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण 11707 रूग्ण बरे झाले आहेत आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 27.52 टक्के आहे.
संबंधित बातम्या
- राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
- महसूल घटल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम, विविध विभागात नोकर भरतीवर बंदी
- पुण्यात कोरोनामुळे पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; राज्यात आतापर्यंत चार जणांचा बळी
- सूरतमध्ये परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; एकदोन गाड्याही पेटवल्या
Lockdown 3 | घरी परतणाऱ्या मजुरांच्या रेल्वे तिकीटाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची मोठी घोषणा