सूरत : शहरातील पलसाना आणि पालनपूर जकात नाक्यावर घरी जाण्यासाठी नाव नोंदवण्यासाठी आलेल्या मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही सौम्य लाठीचार्ज करत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. गेल्या दीड महिन्यापासून घरातच बसावे लागत असल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी या मजुरांचा संयम सुटत चालल्याने आज ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.


लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांना घरी जाण्यासाठी केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे राज्याराज्यात आता घरी जाण्यासाठी परप्रांतीय मजूर घरी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. गुजरात राज्यातील सूरतमध्ये मोठ्या प्रमाणात कापड आणि हिऱ्यांचा व्यापार चालतो. त्यामुळे या ठिकाणी अनेक राज्यातून मजूर कामासाठी आलेले आहेत. यातील बहुतांश मजुर हे रोजंदारीवर काम करणारे आहे म्हणजे आज काम करायचं आणि आजचं पैसे मिळणार. गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. परिणामी या मजुरांनाही घरीचं बसावे लागत आहे. हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.


Corona Effect | महसूल घटल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम, विविध विभागात नोकर भरतीवर बंदी


मजुरांचा संयम सुटत चालला आहे
गेल्या दीड महिन्यापासून विनाकाम घरातचं बसून रहावे लागत असल्याने या मजुरांचे मनोधैर्य खचत चालले आहे. परिणामी या मजुरांचा संयम सुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. सूरतमधील पलसाना आणि पालनपूर जकात नाक्यावर घरी जाण्यासाठी नाव नोंदणी सुरू होती. एकाचवेळी नाव नोंदणी करण्याची प्रोसस सुरू असल्याने अचानक हजारो कामगार या ठिकाणी जमा झाले. या गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलीस आणि मजुरांमध्ये वाद झाला. यातूनचं मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर, एकदोन गाड्याही पेटवल्याचे पाहायला मिळाले. परिणामी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, पोलिसांनी हे गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे.


Lockdown 3 | महाराष्ट्रातील मजुरांना परत घेण्यास यूपी सरकारची आडकाठी : नवाब मलिक