नवी मुंबई : पनवेलमध्ये एका डॉक्टर महिलेचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. परदेश दौऱ्यावरुन परतलेल्या महिला डॉक्टरने होम क्वॉरन्टाईनमध्ये राहण्याऐवजी चक्क रुग्णालयातून जात 400 वर लहान मुलांवर उपचार केले. या प्रकारामुळे प्रशासन हादरुन गेले आहे.


पनवेलमधील डॉ. मोहिते साई बाल रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टरांची मुलगी विदेशातून 16 मार्च रोजी आली होती. तिच्या संपर्कात आलेल्या घरच्या मंडळींना पुढील 14 दिवस होम क्वॉरन्टाईनमध्ये राहणे गरजेचे आहे. मात्र संबंधित तरुणीचे वडील डॉक्टर असून त्यांनी रुग्णालयात जात 400 वर लहान मुलांवर उपचार केले असल्याचे समोर आले आहे.


पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी डॉक्टर मोहिते रूग्णालय सील केले आहे. सध्या उपचार घेत असलेल्या 31 मुलांवर इतर डॉक्टरांच्या साह्याने उपचार सुरू ठेवले आहे. ज्या 400 मुलांवर डॉक्टराने उपचार केले आहेत, त्यांचा शोध घेवून त्यांच्या तपासणी करण्याचे काम युद्ध पातळीवर पनवेल मनपा प्रशासनाने सुरू केले आहे.


Coronavirus | फेक न्यूज पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा : सर्वोच्च न्यायालय




संबंधित बातम्या :