मुंबई :  कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पुढाकार घेण्याबाबत राज्यातील विद्यार्थी आणि तरुणाईला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक पत्र आपल्या ट्विटर वरून शेअर केलंय ज्यात त्यांनी खेळण्या बागडण्याच्या वयात विद्यार्थ्यांना घरातच राहावं लागतेय यावर खंत व्यक्त केली आहे.  शिवाय त्यांनी मुला मुलींना कोरोनावर मात करण्यासाठी मदत देखील मागीतली आहे. ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेरून येणाऱ्या पालकांनी हात पाय स्वच्छ धुतलेत का? शिवाय पालक कोरोनाचे नियम पाळत आहेत का? याची पाहणी करण्याच आवाहन त्यांनी केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या संदर्भातील पत्र त्यांनी ट्वीट केले आहे.


आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये राजेश टोपे म्हणाले, "कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही तुमचीच काळजी घ्या पण त्याचबरोबर आई-वडिलांची, भाऊ- बहिणींची तसेच शेजाऱ्यांची काळजी घ्या. आई- वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेरून आल्यावर त्यांनी हात-पाय स्वच्छ धुतलेत की नाही ते पाहा. त्यांनी मास्क वापरलं की नाही ते देखील पाहा. त्यांना कोरोनाची काही लक्षण दिसलेच तर लगेच सरकारी दवाखान्यात त्यांना घेवून जा. आजचा विद्यार्थी हा उद्याचा आधारस्तंभ आहे. तरूणाचं शरीर सुदृढ, मन सकारात्मक आणि बुद्धी सतेज पाहिजे तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात. तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो."





कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागल्यानं प्रशासन यंत्रणा सतर्क झालं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कठोर पावले उचलण्यासा सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.


राज्यात काल 6218 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर नवीन 5869 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,05, 851 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53, 409 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे.


संबंधित बातम्या :




कोरोनाचे आकडे वाढताहेत! महत्वाच्या शहरात बेड्सची स्थिती काय? जाणून घ्या.


Mumbai Police | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल