Coronavirus : ओमायक्रॉन धोकादायक नसल्याचे तिसरी लाट सुरु झाल्यानंतरच समजले. अनेक रुग्ण स्वत:च बरे झाले मात्र स्थूलता किंवा कोमॉर्बिटी असलेल्या रुग्णांवर जास्त लक्ष दिलं, अशा रुग्णांना अधिक त्रास झाला. यातील बरेच पेशंट आयसीयूमध्ये होते, प्रामुख्याने वयस्कर असलेले. तिसऱ्या लाटेत अतिगंभीर स्थितीत असलेले रुग्ण हे वयस्कर रुग्ण आहेत, आम्ही दुसऱ्या लाटेत असं बघितलं नाही. मात्र तिसऱ्या लाटेतील सिरीअस रुग्ण हे मल्टिपल कोमॉर्बिडीटीवाले होते. म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, लिव्हर, किडनी किंवा वयस्कर नागरिक असल्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्या डॉक्टर बसंत नागवेकर यांनी सांगितले. चौथी लाट न येण्यासाठी मास्क घालणं आवश्यक, काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते, सोबतच लहान मुलांना मास्क घाला हे सांगणं देखील अतिशय अवघड आहे. त्यामुळे प्रामुख्याने रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्याने त्यांनी मास्क नाही घातलं तरी लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, असेही ते म्हणाले.
कोणत्याही वायरल इन्फेक्शनमुळे तुम्हाला ब्रोंकायटिस होत असतो. श्वसनलिकेच्यावरील आणि खालील भागात लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. ओमायक्रॉनमध्ये मोठ्या प्रमाणात खोकला दिसून येतोय. ब्रोंकायटिस झाला तर दोन-तीन महिने साधारण खोकला राहतो, अशात यावर उपचार सुरु करावेत. मात्र टीबीबाबत वेगळी लक्षणे असतात. ह्यात ताप राहणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, रात्रीच्यावेळी घाम येणे ही सर्व लक्षणे आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये यातील फक्त खोकला हे एकच लक्षण प्रामुख्याने दिसतं. मात्र जर खोकला दोन-तीन आठवडे जात नसेल तर एक्स-रे करुन घ्यावा. त्यामुळे टीबीची लक्षणे पूर्णपणे वेगळी असतात. खोकला हा कोणत्याही वायरल इन्फेक्शन राहत असतो. जर खोकला सतत असेल तर छातीचा एक्स-रे करुन घ्यावा. जर कफ नसेल तर इतर गोष्टी करणं काही गरजेचं नाही, असे वसंत नागवेकर म्हणाले. पोस्ट वायरल कोविड खोकला हा सध्या प्रामुख्याने ब्रोंकायटिसमुळेच येत असल्याचं दिसतंय. आयसीएमआरनं देखील म्हंटलंय जर दोन-तीन आठवडे खोकला असेल तर चाचणी करा. अशात एक्स-रे एक उपाय आहे. कोरोनानंतर चांगला व्यायाम, श्वसनाचे व्यायाम करा, चांगला पोषक आहार घ्या, असेही नागवेकर म्हणाले.
बीए 1, बीए 2 आणि बीए 3 असे ओमायक्रॉनमध्ये तीन प्रकार आहेत. तिसऱ्या लाटेत अनेकांना बीए 2 या व्हेरियंटचा संसर्ग झाला होता. बीए 2 हा व्हेरियंट सर्वाधिक मुंबई आणि महाराष्ट्रात आढळला. वयस्कर लोकांमध्ये याचे प्रमाण अधिक होतं. इतर व्हेरियंटच्या तुलनेत बीए 2 व्हेरियंट वेगाने संसर्ग होता. बीए 2 मध्ये एस जीन टार्गेट फेल्युअर नसलेले रुग्ण देखील होते, असे त्यांनी सांगितले. ओमायक्रॉनमध्ये 10 हजारात एक रुग्ण अतिगंभीर असल्याचा अंदाज आहे. आयसीयूत कमी रुग्णसंख्या मात्र लसीचे दोन डोज घेतलेल्या ओमानक्रॉन व्हेरीयंट रुग्णांची देखील संख्या होती. मुंबई आणि मुंबईतील रुग्णालयांनी चांगले काम केलं आहे. जगात सर्वाधिक चांगलं काम भारतात झालंय. बीए 2 च्या रुग्णांना डेल्टाप्रमाणाचे उपचार दिले. दोघांनाही रेमडिसीविर द्यावं लागतं, तर काही प्रमाणात टॉसी देखील वापरल्याचे वसंत नागवेकर म्हणाले.