CORONAVIRUS UPDATES | मुंबईच्या नागपाड्यातील मुंबईबाग आंदोलन तूर्तास स्थगित

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Mar 2020 11:40 PM
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानूसार नाशिकमध्ये आज रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आज पहाटेपासून बंदोबस्तावर असलेले पोलीस उद्या पहाटेपर्यंत रस्त्यावर पहारा देताय. दरम्यान रात्री 9 वाजता जनता कर्फ्यूची वेळ संपताच नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याच शहरात दिसून आलं. अनेकांना संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची माहिती नसल्याने पोलिसांकडून त्यांना समज देण्यात येऊन कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घराबाहेर पडू नका असे आवाहनही करण्यात आले.
ठाणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व सार्जनिक ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्टेशन्स आणि मार्केटस निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा प्रभाग स्तरावर तीन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यावरून मोठ्या प्रमाणात मूळ रहिवासी असलेले नागरिक अमरावतीला परत येत आहे. मात्र, अमरावतीच्या बस स्थानक रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रकारची तपासणी केली जात नसल्याचं वास्तव्य आज उघडकीस आलं. आमची तपासणी करावी अशी मागणी प्रवाशांची होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून देताच त्यांनी मुंबईवरून परत आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. 22 प्रवाशांची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आल्यानंतर त्यांना 30 मार्चपर्यंत होम कॉरंटाईन करण्यात आले. या प्रवाश्यांना घरातच राहण्याचे सांगण्यात आले, बाहेर निघाल्यास कारवाई करू अशी तंबी आरोग्य विभागाने दिले. मात्र अनेक प्रवासी तपासणी न करता गावात गेले आहेत. तपासणी झाल्याने प्रवाश्यानी समाधान व्यक्त केलं आहे.
मुंबईच्या नागपाड्यातील मुंबईबाग आंदोलन तूर्तास स्थगित. CAA, NRC आणि NPR विरोधात सुरू होतं आंदोलन. कलम 144 आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सुरू केलेल्या उपाययोजनांना पाठींबा देत असल्याचं आंदोलकांकडनं जाहीर
नवी मुंबई -

पनवेल आणि कळंबोली परिसरात कर्फ्यू चे उल्लंघन गेल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल.

संचारबंदी असतानाही याचे उल्लंघन करून बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरणार्या ५५ लोकांना घेतले पोलिसांनी ताब्यात ..

नवी मुंबई पोलीसांकडून जोरदार कारवाई .
'आपली बस'सह व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आजपासून निर्बंध
| ‘कोरोना’चा अधिक ताकदीने प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी (ता. २२) पुन्हा एक नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार आता सोमवार २३ तारखेपासून सर्व व्यवासायिक वाहतूक करणारी वाहने नागपूर शहर सीमेत पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.
मुंबई आणि पुणे येथील करोना तपासणी केंद्रांना मान्यता;
लवकरच बावीसशे तपासण्यांची क्षमता
- अमित देशमुख यांची माहिती
लोकांनी घाबरुन जाऊ नये, जीवनावश्यक गोष्टींचा साठा घरात करू नये. लहान मुलांसह घरातील वयोवृद्धांची काळजी घ्या : राजेश टोपे
गोवा आणि इतर राज्यातून ज्या बॉर्डर लागून आहे ज्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकते त्या बॉर्डर सील करण्याबाबत कारवाई सुरू आह : राजेश टोपे
महाराष्ट्रात जनता कर्फ्यू दोन टप्प्यात आहे. मीच माझा रक्षक हा संदेश सर्वांना पाळावा : आरोग्य मंत्री राजेश टोपे
लोकांनी घाबरुन जाऊ नये, जीवनावश्यक गोष्टींचा साठा घरात करू नये. लहान मुलांसह घरातील वयोवृद्धांची काळजी घ्या : राजेश टोपे
सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा; घाबरुन जावू नका : मुख्यमंत्री
नागरिकांनी घाबरुन जायचं कारण नाही; जीवनावश्यक गोष्टींचा साठा करू नका. जीवनावश्यक गोष्टींची दुकाने बंद होणार नाहीत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेच्या खासदारांनाही संसदेच्या अधिवेशनाला दिल्लीला न जाण्याच्या सूचना, मतदारसंघात राहून खबरदारी घेण्याचा उद्धव ठाकरे यांचा सल्ला
कोरोना व्हायरसचं संकट वैश्विक आहे. यावेळी सर्वांनी माणुसकीने वागायला हवं. त्यामुळे कामगारांना या काळात मदत करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई लोकल बंदच्या धर्तीवर बेस्ट आणि राज्य परिवहन मंडळाच्या जादा बसेस धावणार, मुंबईत रस्त्यावर धावणाऱ्या बसेसच्या संख्येत वाढ करण्याची शक्यता
देशभरातील रेल्वेसेवा मध्यरात्रीपासून बंद होणार, कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, 31 मार्चपर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा रेल्वेचा निर्णय, लोकल वाहतूकही बंद होण्याची शक्यता
पंजाब, राजस्थाननंतर महाराष्ट्रातही लॉकडाऊन होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घोषणा करण्याची शक्यता
राज्यात कोरोनाचा दुसरा बळी, मुंबईतील 56 वर्षीय रुग्णाचा मृत्यू, राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा 64 वरुन 74 वर

पार्श्वभूमी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाला जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा यासाठी भारतीय रेल्वेने उद्या दिवसभर सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत. यासोबत मुंबईच्या लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर देखील याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. लोकल गाड्या बंद केल्या नसल्या तरी त्यांची सेवा अत्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार वेळापत्रकापेक्षा कमी गाड्या चालवण्याचे ठरवले आहे.

मध्य रेल्वेवर दररोज 1774 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जातात. तेच रविवार वेळापत्रकात 1425 लोकलच्या फेऱ्या चालविल जातात. मात्र, रविवारी म्हणजेच 22 तारखेला केवळ अकराशे लोकलच्या फेऱ्या चालवल्या जातील. याचा अर्थ तब्बल 674 फेऱ्या या मध्य रेल्वेने रद्द केले आहेत. यामध्ये 337 अप मार्गावरील तर 337 डाऊन मार्गावरील यांचा समावेश आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.