कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली

महाराष्ट्रातून दरदिवशी सुमारे ८६ बसेस कर्नाटकात जातात आणि कर्नाटकातूनही तितक्याच बसेस महाराष्ट्रात येत असतात. सेवा बंद असल्याने दोन्ही राज्यातील प्रवाशांना बसला आहे.

The Karnataka has started bus services in Maharashtra

1/10
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून दोन्ही राज्यातील बससेवा ठप्पच होती.
2/10
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा सुरू झाली आहे.
3/10
कर्नाटकच्या बसेस कोल्हापूरमध्ये येत आहेत.
4/10
महाराष्ट्र शासनाची बस सेवा कर्नाटकातील निपाणीपर्यंत सुरू आहे.
5/10
कर्नाटकची पहिली बस कोल्हापूरमध्ये दाखल झाली.
6/10
कोल्हापुरातील प्रवाशांना घेऊन कर्नाटकची बस पुन्हा माघारी फिरली आहे.
7/10
कोल्हापुरातून थेट बेळगावपर्यंत ही बस सेवा सुरू झाली आहे.
8/10
एसटी महामंडळाच्या चालकास कन्नड भाषा येत नसल्यामुळे दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात मारहाण झाली होती.
9/10
त्यामुळे महाराष्ट्रातील आंदोलकांनी कर्नाटकातून येणाऱ्या बसेसना काळे फासले. या प्रकारामुळे राज्यात वातावरण तापलेले आहे.
10/10
महाराष्ट्रातून दरदिवशी सुमारे 86 बसेस कर्नाटकात जातात आणि कर्नाटकातूनही तितक्याच बसेस महाराष्ट्रात येत असतात.
Sponsored Links by Taboola