मुंबई : राज्यातील आठ खाजगी लॅबना कोरोना तपासणी केंद्राची मान्यता देण्यात आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील 27 खाजगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे आठ लॅब महाराष्ट्रातील आहेत. केंद्र शासनाने या खाजगी तपासणी केंद्रांना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली होती, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.


थायरोकेयर केअर टेक्नॉलॉजीज् लिमिटेड (नवी मुंबई), सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रो पोलीस हेल्थकेअर लिमिटेड (मुंबई), सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल (नवी मुंबई), एस आर एल लिमिटेड (मुंबई), ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड (पुणे), कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरी, मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड ठाणे या खासगी लॅबचा यात समावेश आहे. यामुळे कोरोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होतील. ही तपासणी केंद्रे पूर्ण क्षमतेने चालवल्यास या प्रत्येक तपासणी केंद्रातून दररोज दोन हजार संशयित रुग्णांचे नमुने तपासणी करणे शक्य होणार आहे, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.



संबंधित बातम्या :  


Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढाईत बळ देणारा व्हिडीओ; नागपुरमधील कोरोनाग्रस्ताचा अनुभव