बीड : चीनमधील वुहान शहरातून 18 जानेवारीला आलेला कोरोना विषाणूने जगभर धमाकुळ घालत आहे. दोन महिन्यात तेथील प्रशासनाने उचललेली कठोर पावलं, बंदिस्त केलेली शहरे यामुळे चीन पूर्वपदावर येत असल्याचे सध्या चीनमधील सीचिऊवान राज्यात चेंगडू येथे वास्तव्यास असलेले डॉ. सहदेव चिरके यांनी सांगितले. डॉ. सहदेव चिरके कोरोनाच्‍या औषधावर चीनमध्‍ये संशोधन करत आहेत. डॉ. चिरके बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बोरगावचे रहिवाशी आहेत.


डॉ. सहदेव चिरके म्‍हणाले की, चीनमध्ये स्‍प्रिंग उत्‍सव ( spring festival) साजरा करण्यासाठी चार दिवसाच्या सुट्ट्या लागण्यापूर्वीच शासनाने 18 जानेवारीला सावधानतेचा इशारा दिला. त्‍यामुळे या उत्सवावर विरजण पडले आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. हळुहळु कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने वुहान शहर पिंजऱ्यात बंदिस्त केल्‍याची स्‍थिती निर्माण झाली. कारण ना कुणाला येण्यासाठी परवानगी न जाण्यासाठी परवानगी अशी स्‍थिती निर्माण झाली.


भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 175, देशात एका दिवसात 20 रुग्णांची नोंद


शहरातील सर्वच नागरिकांना बाहेर जाण्यापासून रोखलं गेलं. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दोन दिवसात कुटुंबातील एकच व्यक्ती बाहेर जाऊ शकत होती. सोसायटीने तसे सर्वांना ओळखपत्र दिले होते. शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन सर्वांनीच केले. यावेळी 'remisdivir'हे औषध तात्पुरता उपाय म्हणून कोरोनासाठी पुढे आले.


Coronavirus : क्वारंटाईनचा शिक्का असूनही चौघा संशयितांचा रेल्वेतून प्रवास 


आमच्या कंपनीला ते बनवायचे असल्याने अशा परिस्थितीत मला बाहेर पडावे लागले. कंपनीत प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवेशापूर्वी सर्वांचे तापमान तपासणे, 75 टक्के इथेनॉलने सर्वांची फवारणी शिवाय कॅन्टीनमध्ये प्रत्येकामध्ये 6-7 फुटांचे अंतर, बोलण्यास बंदी हे निर्बंध होते, असं देखील डॉ. सहदेव चिरके यांनी सांगितले.


Coronavirus | चीनमध्ये कसा पसरला कोरोना? कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉ. संजीव चौबे 'माझा'वर



संबंधित बातम्या