LIVE UPDATES | लग्नातील भोजनातून 200 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा, लातूर जिल्ह्यातील वाढवणा येथील घटना

पुण्यात होणाऱ्या एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी, 200 जणांची मर्यादा; 30 जानेवारी रोजी परिषद किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकरी मोर्चाची मुंबईकडे कूच; हजारो शेतकरी 26 जानेवारीला राजभवनावर धडकणार 26 जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यास पोलिसांची परवानगी, 5 प्रमुख मार्गांवर आंदोलक शेतकऱ्यांची परेड दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jan 2021 11:33 PM
मद्यधुंद अवस्थेत वाहने उडवल्याची घटना साताऱ्यात घडली. सातारा शहरातील पोवई नाका ते समर्थ मंदिर परिसरापर्यंत ही घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत दुधाचा टँकर चालवत चालक निघाला असताना त्याने अनेक वाहनांना धडक दिली. यात सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिक युवकांनी टँकर अडवून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
बुलढाणा राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर कंटेनर व प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सीचा अपघात. पती पत्नीसह तीनजण जागेवरच ठार. 09 प्रवासी जखमी. मलकापुर नांदुरा दरम्यान अपघात.
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे शाहरुख फिरोज शहा या तरुणास गावातीलच काही व्याक्तीकडून लाठया काठ्यांच्या साहाय्याने जबर मारहाण करण्यात आली. यावरुन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी देखील झाली. या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे दोंडाईचा शहरामध्ये एकच गोंधळ उडाला. यासंदर्भात दोंडाईचा पोलिसांना माहिती मिळताच दोंडाईचा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यात पोलिसांतर्फे तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून या दरम्यान जखमी अवस्थेमध्ये असलेल्या तरुणास धुळे जिल्हा रुग्णालयमध्ये पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. दोंडाईचा शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता बघावयास मिळत आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील व्यापारी पेठ असलेल्या वाढवणा येथे एका लग्न समारोहातील भोजनातून विषबाधा झाली आहे. ..200 पेक्षा जास्त लोकांना झाली विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. वाढवणा रुग्णालय,उदगीर रुग्णालय , हाळी येथील रुग्णालयात तसेच या भागातील खासगी दवाखान्यात रुग्णांना दाखल केले आहे.
नवीन घराच्या बांधकामाला पाणी मारताना शॉक लागून युवकाचा मृत्यू. कराड तालुक्यातील हरपळवाडी येथील घटना. 29 वर्षीय सचिन काळभोरचा जागिच मृत्यू. घटनेने हरपळवाडी गावावर शोककळा.
शरद पवार यांच्या उपस्थितीत कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात 27 तारखेला महत्वाची बैठक होणार आहे. कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून भगव्या वरून तणावाचे वातावरण होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सीमाभाग समन्वय मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
भिवंडीत चाविंद्रा डंपिंग ग्राउंडला भीषण आग . भिवंडी शहरातील चाविंद्रा डंपिंग ग्राउंडला भीषण आग लगल्याने परिसरात धुरामुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे . मात्र या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
विविध मागण्यांसाठी ओबीसींच्या मोर्चाला जालन्यात सुरुवात. जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी आग्रही. समाजाच्या प्रगती आणि विकासासाठी समाजाची मागणी. मोर्चात पारंपरिक वेशभूषेत तरुण - तरुणींचा सहभाग. शेकडोंच्या संख्येनं ओबीसींचा समुदाय मोर्चात सहभागी. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणत ओबीसींच्या आरक्षणाला मात्र धक्का लागू नये अशी नेत्यांची मागणी.
बुलढाणा : मेहकर तालुक्यातील मादनी गाव शिवारात आज सकाळी गाव तलावाच्या काठावर प्रदीप मेटांगळे यांच्या शेतात असंख्य बगळे पक्षी मृत्युमुखी पडलले दिसून आले आहेत. तर काही पक्षी तड़फडून मृत्युमुखी पड़त आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू आल्याची भीती गावकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दख़ल घेत मृत्युमुखी पडलेल्या बगळ्यांचे नमूने घेऊन चाचणीसाठी पाठवावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रायगड : मुंबई-गोवा हायवेवर पेणनजीक वाहतूक कोंडी, सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; पेण ते तरणकोप दरम्यान वाहनांची मोठी रांग
उमरखेड - ढाणकी रोडवर गो. सी. गावंडे कॉलेजजवळ उमरखेड तहसिलचे नायब तहसिलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे यांचेवर रेती तस्करांकडून हल्ला झाला. वैभव पवार यांना पोटात चाकूचे वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असुन त्यांना तात्काळ नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तलाठी सुरोशे यांच्या छातीजवळ किरकोळ जखम झाली आहे. पोलीस उमरखेड शहरात आरोपीचा शोध घेत आहेत.
भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांची बैठक सुरू. भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट
जालन्यात रविवारी ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. अकरा वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा निघणार तितक्यातच यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली. पण अखेर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली. काही क्षणांनी मोर्चाला सुरुवात.
सांगली : धक्कादायक बातमी... 35 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मारेकऱ्यानं महिलेचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. ही हत्या गावातल्याच 22 वर्षीय तरुणानं केल्याचं समजतंय. या गुन्ह्यातील आरोपीला लवकरात लवकर अटक करुन तिला फाशीचा शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी स्थानिकांनी कँडल मार्च काढला होता.
पुणे : 30 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. या परिषदेचं आयोजन स्वारगेट येथील श्री गणेश क्रीडा कला मंच येथे करण्यात येणार आहे. कोरोनामुळे या परिषदेला केवळ 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जालना : जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून, लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, नॉन क्रिमीलियरची अट रद्द करावी यासह इतरही अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.


जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर, महादेव जानकर, समीर भुजबळ, विकास माहात्मे यांसह सर्वच पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.

पुण्यातील हडपसरमधील रामनगर भागातील कचरा डेपोतील कचऱ्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. साडे आठ वाजता आग लागली असून सध्या अग्निशमन दलाचे दहा बंब आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नांदेड : येथील शंकर नागरी आणि आयडीबीआय बँकेशी संबंधित असलेल्या व्यक्तीनेच बँकेचा डेटा हॅकर्सला कमिशनवर पोहचविल्याची पोलिसांची शंका, शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बॅंकेतील 14 कोटी 50 लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणी दिल्लीतून एकाला अटक.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या खंडूपाडा परिसरात पालिकेच्यावतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणचे जवळपास 40 ते 45 गाळे तोडण्यात आलेत. या कारवाई पूर्वी गाळे धारकांना नोटीस बजावण्यात आल्याचं पालिके कडून सांगण्यात आलं. मात्र पालिकेने कोणतीही नोटीस न बजावता थेट कारवाईला सुरुवात केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. डहाणूतील धानीवरी येथे इको कारचा अपघात. अपघातात आई आणि एका चिमुकल्याचा मृत्यू तर एकजण जखमी. जखमीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईकडून गुजरातकडे लग्नासाठी जाणाऱ्या इको कारचा अपघात.
पुलवामा मध्ये हल्ला 14 फेब्रुवारीला झाला आणि बालकोटमध्ये भारतीय सैन्याचा सर्जिकल स्ट्राईक 26 फेब्रुवारीला झाला, अर्णब गोस्वामीच्या चॅटमध्ये त्याला 23 तारखेलाच या हल्ल्याची माहिती कशी होती असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी केंद्र सरकारला विचारला आहे. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्वाचा असल्याचं सांगून केंद्र सरकारने यावर उत्तर दिलं पाहिजे अशी मागणीही गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने रिक्त असलेल्या 8500 पदांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. यासाठी नव्याने कोणतीही अर्ज प्रक्रिया करण्याची गरज लागणार नाही. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरती प्रक्रियेतही पात्र ठरतील. यासाठी आता 28 फेब्रुवारी 2021 मध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती आहे त्या निमित्ताने शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. दरवर्षी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अनेक शिवसैनिक दर्शनाला येतात पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आलं आहे, त्यामुळे यंदा शिवसैनिकांची मर्यादित संख्या या परिसरात आहे.
नागपूर : पायातील जोड्यांमध्ये तुरुंगात चरस घेऊन जाणारा जेल कर्मचारी ( सुरक्षा रक्षक ) मंगेश सोळंकीला निलंबित करण्यात आलं आहे. बुधवारी मंगेश त्याच्या पायातील जोड्यात चरस घेऊन जाताना तुरुंगाच्या गेटवर पकडला गेला होता. तो तुरुंगात कैद एका कुख्यात गुन्हेगारासाठी हे चरस घेऊन जात होता. त्याच्या विरोधात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. आता त्याला निलंबित करण्यात आलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सायंकाळी ६ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई येथे होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या बुलडाणा औरंगाबाद महामार्गाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे मार्गालगतच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तुर ,हरभरा , करडई अशा पिकांवर ही धूळ उडत असल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं आज संतप्त शेतकऱ्यांनी हा मार्ग सातगाव म्हासला गावजवळ अडवून धरला. बराच वेळ मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
भाईचंद हिराचंद रायसोनी म्हणजेच बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी फरार मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झंवरला अटक,पुणे आर्थिक गुन्हे शाखेची जळगाव मध्ये कारवाई
यंदाचे 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन मार्च महिन्यात नाशिकमध्ये पार पडणार असल्याने नाशिकच्या साहित्यिक वर्गात सध्या आनंदाचे वातावरण असून संमेलनाच्या तयारीला सुरुवात झालीय. आज तयारीचा पहिला टप्पा पार पडला असून दुपारी संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शहरातील सर्वपक्षीय स्थानिक नेतेमंडळी, साहित्यिक प्रेमी उपस्थित होते. फित कापत कार्यालयाचे उदघाटन करण्यात आल्यानंतर ग्रंथपूजा देखील ईथे करण्यात आली. संमेलनासाठी आवश्यक ती सर्व मदत महापालिकेकडून केली जाईल असे आश्वासन महापौरांकडून यावेळी देण्यात आले.
घराचे नूतनीकरण करत असताना छताचा काही भाग अंगावर कोसळल्याने अजय चांदेलकर यांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव शहरातील आरटीओ कार्यालय रस्त्यावर घडली आहे
ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात कंपनीला भीषण आग बायोसेन्स डायग्नॉस्टिक कंपनीला भीषण आग लागली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या बुलडाणा औरंगाबाद महामार्गाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे मार्गालगतच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तुर ,हरभरा , करडई अशा पिकांवर ही धूळ उडत असल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं आज संतप्त शेतकऱ्यांनी हा मार्ग सातगाव म्हासला गावजवळ अडवून धरला. बराच वेळ मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
एक तासापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू
बर्ड फ्ल्यूचा उगाचचं बाऊ करण्यात येत असून चीकन, अंडी खाल्ल्यानं कोरोनावर मात करण्यास शक्ती मिळते, असे वक्तव्य मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे.
अहमदनगर - एक तासांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू
अहमदनगर - एक तासांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू
अहमदनगर - एक तासांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू
नाशिक मनपात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनपा आयुक्तांशी फोनवर घेतली माहिती
नाशिक महापालिका आग प्रकरणाची चौकशी होणार, महापालिका आयुक्तांकडून चौकशी समितीची स्थापना, मुख्य अग्निशमन अधिकारी, विद्युत अभियंता आणि बांधकाम शहर अभियंता यांचा समितीमध्ये समावेश. तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
नाशिक महापालिका आग प्रकरणाची चौकशी होणार, महापालिका आयुक्तांकडून चौकशी समितीची स्थापना, मुख्य अग्निशमन अधिकारी, विद्युत अभियंता आणि बांधकाम शहर अभियंता यांचा समितीमध्ये समावेश. तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबईतील साकीनाका पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने मोठी कारवाही केली आहे. नशेच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या कोडीन फॉस्फेट हा नशा करणारा घटक असलेल्या सिरपच्या 12 हजार 500 बाटल्या जप्त केल्या
आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. गेल्या 17 जानेवारीला साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कुरिअर कंपनीत मुबारक केमिस्टच्या नावाने 12 हजार 500 सिरपच्या बाटल्या मागवण्यात आल्या होत्या. याची खात्री करण्यासाठी कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून मुबारक केमिस्टच्या मालकाला फोन केला, पण आपण असा काही माल मागितला नाही, असं त्याने सांगितलं याची माहिती अन्न व औषध प्रशासन आणि साकीनाका पोलिसांना दिली. 18 तारखेपासून पोलिसांनी ज्याने हा माल मागवला होता त्याचा शोध घेण्यास सुरुवात केला. सापळा रचून आरोपीला अटक केली. हा माल उत्तर प्रदेश इथून मागवण्यात आला होता आणि भिवंडी येथे नेला जाणार होता. या बाटल्यांवरील उत्पादन तारीख तसेच वापरण्याची अंतिम तारीख खोडण्यात आली आहे. हा माल नशेसाठी वापरात आणण्यात येणार होता अस पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे. साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबईतील साकीनाका पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने मोठी कारवाही केली आहे. नशेच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या कोडीन फॉस्फेट हा नशा करणारा घटक असलेल्या सिरपच्या 12 हजार 500 बाटल्या जप्त केल्या
आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. गेल्या 17 जानेवारीला साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कुरिअर कंपनीत मुबारक केमिस्टच्या नावाने 12 हजार 500 सिरपच्या बाटल्या मागवण्यात आल्या होत्या. याची खात्री करण्यासाठी कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून मुबारक केमिस्टच्या मालकाला फोन केला, पण आपण असा काही माल मागितला नाही, असं त्याने सांगितलं याची माहिती अन्न व औषध प्रशासन आणि साकीनाका पोलिसांना दिली. 18 तारखेपासून पोलिसांनी ज्याने हा माल मागवला होता त्याचा शोध घेण्यास सुरुवात केला. सापळा रचून आरोपीला अटक केली. हा माल उत्तर प्रदेश इथून मागवण्यात आला होता आणि भिवंडी येथे नेला जाणार होता. या बाटल्यांवरील उत्पादन तारीख तसेच वापरण्याची अंतिम तारीख खोडण्यात आली आहे. हा माल नशेसाठी वापरात आणण्यात येणार होता अस पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे. साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
सातारा : टोल नाक्यावरील राड्या प्रकरणी खासदार उदयनराजे यांच्यासह 11 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. वाई न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. टोल नाक्यावरील राड्याप्रकरणी भुइंजा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याची नोंद झाली होती. आता खासदार उदयनराजे यांच्यासह 11 जणांची वाई न्यायालयाने निर्दोष ठरवलं आहे.
नाशिक महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु, सुदैवाने कर्मचारी अडकलेले नाहीत
वीज पुरवठा खंडित कराल तर याद राखा. आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याचा मनसेने घेतला समाचार. वीजबिल मुद्यावरून मनसे आक्रमक. सरकारकडे पैसा नाही, तर जनतेकडे कुठून येणार, असा खडा सवाल. 29 जानेवारीला मनसेचा वीजबिल माफीसाठी भव्य मोर्चा. शॅडो कॅबिनेट मंत्री दिलीप धोत्रे यांचा सरकारला इशारा.
UPSC चा शेवटचा प्रयत्न दिलेल्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी नाही. केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात हे सांगण्यात आलं कोर्टाने प्रतिज्ञापत्र द्यायला सांगितले, सोमवारी सुनावणी.
कोरोनामुळे मागचं वर्ष विस्कळीत झाल्याने एक attempt वाढवण्याची याचिका कोर्टात होती.
वसई-विरार : बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अनेक ठिकाणांवर ईडीचे छापे, सकाळपासून ईडीची कारवाई सुरु, हितेंद्र ठाकूर हे महाविकास आघाडी सरकारचे सहयोगी आमदार
पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारी पासून सुरू होत असल्याने सर्वत्र शिक्षकांच्या कोरोनाची RTPCR तपासणीला झाली सुरुवात
महाविकासआघाडीचं सरकार पाच वर्षे टीकेल यात शंका नाही, शरद पवारांचा विश्वास
धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी करावी, हा निष्कर्ष योग्य होता. चौकशी आणि तपास यंत्रणांना त्यांचं काम करुद्यात- शरद पवार
कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. कायदा रद्द करा आणि चर्चेला बसा, शेतकऱ्यांची केंद्राकडे मागणी. यापूर्वीसुद्धा शेतकरी आंदोलनातील महत्त्वाच्या मंडळींशी चर्चा करुन त्यांच्याशी विचारविनिमय केल्याचं म्हणत दीड वर्षे कायदा स्थगित करण्याची मागणी शेतकऱ्यांना मान्य नाही, पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम, ही बाबही त्यांनी स्पष्ट केली.
पुणे, सोलापुर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील म्हाडाच्या घरांची लॉटरी आज ऑनलाईन पद्धतीने सकाळी दहा वाजता जाहीर केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याच उद्घाटन पुण्यातील नेहरू मेमोरियल हॉल मधे सकाळी नऊ वाजता होतंय. या लॉटरीमधे पश्चिम महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांमधील 5647 फ्लॅट्स आणि काही जमीनीच्या भुखंडांचीही विक्री केली जाणार आहे. जे या लॉटरीमधे नशीबवान ठरणार आहेत त्यांना ई मेल आणि मेसेजद्वारे त्याची माहिती दिली जाणार आहे. 
काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होत आहे. त्याआधीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंब बाहेरील व्यक्ती अध्यक्ष होऊ शकतो ही चर्चा सुरु झाली आहे. राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे नेतृत्व देण्याची चर्चा रंगू लागली आहे. यात सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा आहे. अशोक गेहलोत राज्य सोडण्यास अनुत्सुक असल्याने काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील एका गटाकडून सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. पण सुशील कुमार शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचं महिलेने म्हटलं आहे.
उदगीर आणि परिसरातील मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. काही केल्या चोर सापडत नव्हते. उदगीर पोलिसांनी मागील काही दिवसांपासून चोरांचा कसून शोध घेतला आणि अखेर त्यांना यश आलं. चेतन राठोड आणि सुदर्शन चव्हाण या दोन चोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 6 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

रायगड...

महाड एमआयडीसीमधील कंपनीत वायू गळती, सात कर्मचारी बाधीत...

इंन्डो अमाईन्स कंपनीमध्ये वायूची गळती, सायंकाळची घटना..

जखमींना महाड येथील रूग्णालयात दाखल ...

H2S गॅसच्या प्राॅडक्शन विभागात गळती झाल्याची प्राथमिक माहिती...
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आगा लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे.
अवैधरित्या रेल्वेचे तात्काळ टिकिट बनवून विकणाऱ्या सायबर कॅफे चालकाला रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने शेगावात छापा टाकून ताब्यात घेतल आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह संगणक व इतर साहित्य जप्त केलं आहे. गोपनीय माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बलाच्या भुसावळ शाखेने ही कारवाई केली आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, वॉटर टँक आणि पोलीस घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका एमपीएससी मागे घेणार आहे. न्यायालयातील याचिका मागे घेण्याचे निर्देश MPSC ने आपल्या वकिलांना दिले आहेत. सरकारला अंधारात ठेवून MPSC ने परस्पर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु आता एमपीएससीने वकिलांना ही याचिका मागे घेण्यास सांगितलं आहे.
'मिर्झापूर' या वेब सीरिजसमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. या वेब सीरिजवर विरोधात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या वेब सीरिजचे दिग्दर्शक आणि OTT प्लॅटफॉर्मला नोटिस पाठवली आहे.
'बर्ड फ्लू' संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात चार ठिकाणी मृत पक्षी आढळल्याच्या घटना निदर्शनास आल्यात. मृत पक्षांचे नमूने रोग अन्‍वेषण विभाग, पुणे यांचे मार्फत राष्‍ट्रीय उच्‍च सुरक्षा पशुरोग संस्‍था, भोपाळ येथे पाठविण्‍यात आले आहेत. या नमुन्‍यांचा अहवाल प्राप्‍त होईपर्यंत जिल्ह्यातील चार संबंधित क्षेत्रास 'सतर्क क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यात दोन पोल्ट्री फार्मचा आणि अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या शासकीय निवासाचा सुद्धा समावेश आहे.
पुणे : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एका व्हाट्सअॅप ग्रुपवरती पुण्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळा कदम हे संजय राऊत यांचे पंटर असल्याचा उल्लेख केल्यानं वादाला सुरुवात झाली आहे. या वॉट्सअॅप ग्रुपमध्ये पत्रकारांबरोबरच शिवसेनेचे नेतेही आहेत. विशेष म्हणजे आढळराव यांच्या या शेरेबाजीला शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनीही इमोजी टाकून प्रतिसाद दिल्याच दिसतंय. पुण्याची जबाबदारी असलेल्या शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याची तक्रार सेनेच्या स्थानिक नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याकडे केल्याची बातमी एका वेब पोर्टलने नाव न घेता केली होती. त्या बातमीची लिंक शिवसेना नेत्यांच्या वॉट्सअप गृपमधे शेअर करत पत्रकारांनी तो वरिष्ठ नेता कोण असा प्रश्न गृपमधे विचारला होता. त्याला उत्तर देताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तो नेता म्हणजे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळा कदम असल्याचं म्हटलं होतं. तसेच ते संजय राऊत यांचे पंटर असल्याची शेरेबाजी गृपमध्ये केली होती. काही वेळात याचं गांभीर्य लक्षात आल्यावर आढळराव पाटील यांच्याकडून ती पोस्ट डिलिट केली होती. मात्र तोपर्यंत त्या पोस्टचे स्क्रीन शॉट काढून व्हायरल करण्यात आले होते. या प्रकारानंतर खासदार संजय राऊत यांनी आढळरावांची खरडपट्टी काढल्याच समजतंय. आढळराव पाटील यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना एकूण 50 टक्के परीक्षा शुल्काचा परतावा द्यावा. तर प्रथम, द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क तातडीनं विद्यार्थ्यांना परीक्षा न झाल्याने परत करावे यासाठी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना यावर्षी 25 टक्के परीक्षा शुल्काचा परतावा देण्याबाबत परिपत्रक काढलं आहे. यावर्षी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना विद्यापीठाने नाहीतर सर्व महाविद्यालयानी परिक्षेसाठीची संपूर्ण तयारी केली असताना 25 टक्के नाहीतर 50 टक्के परतावा महाविद्यालयाना द्यावा अशी मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात आली आहे.
वर्धा : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीसाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच अट्टाहास केला. वर्ध्याच्या विश्रामगृहात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेण्यास पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. गृहमंत्री आत गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांनीही आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीमुळे पोलिसांनी पदाधिकऱ्यांना थांबवून ठेवलं. यावेळी आत जाण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी पोलिसांपुढे धरला आणि शब्दद्वंद्व रंगलं. अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर पदाधिकारी मंडपात गेले. गृहमंत्र्यांनी नंतर मंडपात पदाधिकऱ्यांची भेट घेतली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. सोनू सूदची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेनं सोनू सूदविरोधात जी कारवाई केली आहे, ती योग्यच आहे, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.
यवतमाळ : पुसद तालुक्यातील धुंदी येथे असलेल्या पोल्ट्री मधील एका मृत पक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्या शरीरात H5N1 विषाणू आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. जिल्ह्याचं पशुसंवर्धन विभाग जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार करणार आहेत.
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा काय असणार? आंदोलनावर तोडगा निघणार? की आंदोलन आणखी तीव्र होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळणार. बुधावारी झालेल्या शेतकरी आणि केंद्र सरकारच्या बैठकीत सरकारने कृषी कायद्यांना एक ते दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. सरकारने दिलेल्या या प्रस्तावासंदर्भात सिंघु बॉर्डरवरील पंजाबच्या शेतकरी संघटनांची अकरा वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारच्या प्रस्तावासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता पुन्हा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकरी संघटना सरकारला त्यांच्या प्रस्तावावरील निर्णय सांगणार आहेत.
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा काय असणार? आंदोलनावर तोडगा निघणार? की आंदोलन आणखी तीव्र होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळणार. बुधावारी झालेल्या शेतकरी आणि केंद्र सरकारच्या बैठकीत सरकारने कृषी कायद्यांना एक ते दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. सरकारने दिलेल्या या प्रस्तावासंदर्भात सिंघु बॉर्डरवरील पंजाबच्या शेतकरी संघटनांची अकरा वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारच्या प्रस्तावासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता पुन्हा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकरी संघटना सरकारला त्यांच्या प्रस्तावावरील निर्णय सांगणार आहेत.
रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान झालेल्या दोन अपघातात एक प्रवासी जखमी झाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर पिकअप व्हॅनने ट्रेलरला धडक दिली. यात एक प्रवासी जखमी झाला. सकाळी सहाच्या सुमारास भाताणनजीक हा अपघात झाला. जखमीला नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसऱ्या अपघातात ट्रकने आयशर टेम्पोल धडक दिली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर फुडमॉलनजीक हा अपघात झाला. सकाळी साडेसहा वाजता घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.
रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान झालेल्या दोन अपघातात एक प्रवासी जखमी झाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर पिकअप व्हॅनने ट्रेलरला धडक दिली. यात एक प्रवासी जखमी झाला. सकाळी सहाच्या सुमारास भाताणनजीक हा अपघात झाला. जखमीला नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसऱ्या अपघातात ट्रकने आयशर टेम्पोल धडक दिली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर फुडमॉलनजीक हा अपघात झाला. सकाळी साडेसहा वाजता घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.
गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे विषारी दारु प्यायल्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण अत्यवस्थ आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच म्हणजेच 20 जानेवारी रोजी ही घटना घडली. प्रकाश फकिरा गौरकार (वय 53 वर्ष) आणि रमेश नानाजी ढूमने (वय 52 वर्ष) अशी मृतांची नावं आहे. तर अत्यवस्थ असलेल्या आठ जणांना उपचारांसाठी आष्टीमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असली तरी विषारी दारुची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होते. परंतु ऐन मतदानाच्या दिवशी विषयुक्त दारु प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
थकीत वीजबिलाच्या कारवाईबाबत आमदार रोहित पवारांचा राज्य शासनाला सवाल,

वाढीव वीजबीलाची शाहनिशा करण्याची गरज आहे,

वाढीव आलेले वीज बील कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बील द्यावे,

यासाठी सरसकट धोरण करता येईल का याचा अभ्यास करावा राज्य सरकारने करावा असे मला वाटते,

कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल ,

ग्राहकांना आलेल्या बीलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा रिपोर्ट एमएसईबीने काढलाय का? ,

तो रिपोर्ट काढण्याबाबत आदेश काढलेत का? ,

ते काढले असतील तर त्याचा अहवाल काय आलाय हे पाहावे लागेल,

सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जा मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार ,

वीज पुरवठा खंडित करण्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
खापरखेडा मध्ये प्रशांत घोडेस्वार (वय 30) ची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री 9.45 च्या दरम्यान खापरखेडा येथील मुख्य मार्ग बाजारपेठेत मोहन किराणा स्टोर च्या दुकाना समोर घडली. प्रशांत हा कॅसिनो चालवत होता.. हत्येचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.

बेळगावमध्ये उद्या जाऊन भगवा ध्वज फडकवला जाणारच,

शिवसेनेचे नेते विजय देवणे यांचा निर्धार,

बेळगावमध्ये निघणार मोर्चा स्थगित केला असेल तरी शिवसैनिक बेळगावात घुसण्याचा प्रयत्न करणार
औरंगाबाद : मराठा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न..मराठा आरक्षणाबाबत निर्णय होत नसल्यानं केले विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न.दत्ता भोकरे असं तरुणाचं नाव .घाटी रुग्णालयात उपचार सुरू..
आज 20 जानेवारी 2021 मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात-

• कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकाकडून कर्ज घेण्यास १५०० कोटीची शासन हमी ,

• राज्यात शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय,

खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता
दहावी आणि बारावीची परीक्षा महत्वाची आहे, परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा पुढील कॅबिनेटला घेणार आहोत,परीक्षा घेऊ त्यावेळी कोविड राहणार नाही,
कोरोना हकलण्यात आम्हाला यश मिळेल, मंत्री बच्चू कडूंची माहिती

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी नोकरभरतीचा प्रश्न उपस्थित केला, कोरोनामुळे आणि SEBC आरक्षणाला स्थगिती असल्याने रखडलेली नोकरभरती पुन्हा सुरू करण्याबाबत अनेक मंत्र्यांनी केली मागणी. काही तांत्रिक बाबी दूर करून नोकरभरती सुरू करता येईल का याची चाचपणी करणार,
त्यानंतर रखडलेली नोकरभरती सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो
बहुचर्चित प्रतीक्षा म्हेत्रे हत्याकांड प्रकरणात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा,

अमरावतीच्या साईनगर येथे 23 नोव्हेंबर 2017 रोजी आरोपी राहुल बबन भड याने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यावर दुपारी 12.30 वाजता चाकूने वार करून केली होती निर्घृण हत्या,

या प्रकरणी सर्वात आधी माझाने घेतली होती दखल आणि सतत एबीपी माझाने आरोपीला शिक्षेसाठी पाठपुरावा केला होता,

आज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख उर्मिला जोशी (फाळके) यांनी आरोपीला आजन्म कारावासाची आणि 5 हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली...
निलेश राणे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती.
ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर राणे कुटुंबावर भाजपनं आणखी एक जबाबदारी दिली.
एकीकडे महावितरणने राज्यात वीज बिल वसुली सुरु केली असून बिल न भरणार्‍यांचे कनेक्शन तोडले जाणार आहे. तर दुसरीकडे या बाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता या प्रश्नाला बगल दिली आणि निघुण गेले. राऊत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठकीसाठी आले होते. बैठक संपल्यानंतर माध्यमांनी त्यांना वीज बिल वसुलीबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता ते दुसर्‍या मार्गाने निघुण गेले. वीज बिल वसुलीवर बोला असे अनेकदा विचारुनही काहीच न बोलता ते निघून गेले.
परळी येथील माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक दिपक देशमुखांनी बलात्कार आरोपांमुळे धनंजय मुंडेवर आलेले संकट लवकर दुर कर असे साकडे घालुन परळी ते तुळजापुर पायी दिंडी करत दर्शनाला येईल असा नवस केला होता आज परळी ते तुळजापुर रोखानं पायी रवाना झाले आहेत.
बुलढाण्यातील शेगावच्या संत गजानन महाराज मंदिर ते आनंद सागर स्कायवॉकचे गजानन महाराज मंदिर संस्थानाकडे हस्तांतरित करण्यास स्थानिक नगरपरिषदेने विरोध केला आहे. या स्कायवॉकचे हस्तांतर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दि 14 जानेवारी रोजी दिले होते. यावर शेगाव नगरपालिकेने आक्षेप नोंदवत नागराध्यक्षा सौ.बुच यांनी विभागीय आयुक्तांकडे आपला आक्षेप नोंदवला आहे. संत गजानन महाराज मंदिर ते आनंद सागर दरम्यानचा दीड किलोमीटर अंतराचा स्कायवॉक दोन वर्षापासून धुळखात पडलेला आहे.
भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा पुढील 24 तास बंद असणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी पाणी कपात करण्यात येणार असल्यानं स्टेम प्राधिकरणाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. यंदा पाऊस चांगला झाला असला तरी जलाशयातील पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरावे, यासाठी पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील सर्व मनपा आणि पाणी उचलणाऱ्या यंत्रणेला महिन्यातून दोनदा पाणी कपातीचे आदेश दिलेत. आणि याच पार्श्वभूमीवर भिवंडीत पुढील चोवीस तास पाणीपुरवठा बंद असणार आहे.
भंडारा : भंडारा जिल्ह्यात वाळू घाट बंद असताना सुद्धा होते वाळूची वाहतूक होत आहे. भंडारा तालुक्यातील दाभा, कोथुर्ना रोड येथील पोलीस चौकीवर पैसे घेउन वाळूच ट्रक सोडले जात असताना पोलिसांचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
गडचिरोली: जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. नक्षल्याचा रेड झोन असलेल्या दक्षिण गडचिरोली भागातील 6 तालुक्यातील 150 ग्रामपंचायतीसाठी 486 मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि नक्षल्याचा माहेरघर म्हणून ओळख असलेल्या कमलापूर गावात एबीपी माझा पोहचला असून ह्या मतदान केंद्रावर दुर्गम नक्षलग्रस्त 4 गावातून 10 ते 12 किलोमीटर पायवाट आणि ट्रॅक्टर प्रवास करत पोहचत आहेत. कमलापूर गावाचा इतिहास जर बघितलं तर अनेक घटना नक्षल्यानी या गावात घडवलं आहे. गावाजवळ असलेल्या वनविभागाच्या हत्ती कॅम्पची जाळपोळ असेल किंवा अनेक निष्पाप नागरिकांची हत्या असेल किवा या भागात सुरु असलेली विकास कामं बंद करून विरोध असेल या घटना कमलापूर गावासाठी नवीन नाही, तर कमलापूर ग्रामपंचायतीला एकेकाळी नक्षलवाद्यांनी आपलं टार्गेट करून IED उडवून टाकलं होतं. मात्र नक्षलवाद्यांच्या या दहशतीच्या पलिकडे आज लोकशाहीच्या या उत्सवात मतदारराजा मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर पोहचून आपला हक्क बवाजत आहे.
धुळे : तालुक्यातील फागणे बाळापुर शिवारात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास मेंढपाळांवर अज्ञातांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. या मेंढपाळांना अज्ञातांकडून मारझोड केली जात असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मेंढ्यांची चोरी केली जात आहे. यामुळे मेंढपालांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी मेंढपाळांकडून केली जात आहे. या घटनेत आत्तापर्यंत मेंढपाळांचे सात ते आठ लाख रुपयांच्या मेंढ्या अज्ञातांनी चोरून नेले आहेत. पोलीस प्रशासनाने यावर गांभिर्याने कारवाई करून हल्लेखोरांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मेंढपाळनी दिला आहे.
नागपूर : उपराजधानीतील सुभाषनगर आणि आजूबाजूच्या परिसरात धुडगूस घालणाऱ्या मन्या आणि दाऊदला जेरबंद करण्यात आलं आहे. तर याकूब अजूनही मोकाट आहे. लवकरच त्याला जेरबंद केले जाणार आहे. मनपाच्या कोंडवाडा पथकानं काल रात्री ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे मन्या, दाऊद आणि याकूब या वळूच्या दहशतीची बातमी एबीपी माझाने दाखविली होती. त्यानंतर काल रात्री वळूंना पकडण्याची मोहिम सुरु करण्यात आली.
बीड : कामकाजात वारंवार कुचराई करत असल्याचा जाब विचारणाऱ्या नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर, स्थापत्य अभियंत्याने चाकू हल्ला केलाय. ही खळबळजनक घटना बीडच्या वडवणीमध्ये रात्री घडलीय. प्रशांत पाटील असं मुख्याधिकाऱ्यांचं नाव आहे. तर सुमित मेटे असं हल्लेखोर अभियंत्याचं नाव आहे. अभियंता मेटे हे सतत गैरहजर राहून लोकांचे काम करण्यास विलंब करत होते. त्यामुळं मेटे यांच्या विरोधात अनेक तक्रारी येत होत्या. यामुळे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी अभियंता सुमित मेटे यांना जाब विचारला होता. हाच राग मनात धरून स्थापत्य अधिकारी मेटे यांनी, वडिलांसह मामाला घेऊन येत, मुख्याधिकारी पाटील यांच्यावर चाकूहल्ला करत मारहाण केलीय. दरम्यान या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
बीड : कामकाजात वारंवार कुचराई करत असल्याचा जाब विचारणाऱ्या नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर, स्थापत्य अभियंत्याने चाकू हल्ला केलाय. ही खळबळजनक घटना बीडच्या वडवणीमध्ये रात्री घडलीय. प्रशांत पाटील असं मुख्याधिकाऱ्यांचं नाव आहे. तर सुमित मेटे असं हल्लेखोर अभियंत्याचं नाव आहे. अभियंता मेटे हे सतत गैरहजर राहून लोकांचे काम करण्यास विलंब करत होते. त्यामुळं मेटे यांच्या विरोधात अनेक तक्रारी येत होत्या. यामुळे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी अभियंता सुमित मेटे यांना जाब विचारला होता. हाच राग मनात धरून स्थापत्य अधिकारी मेटे यांनी, वडिलांसह मामाला घेऊन येत, मुख्याधिकारी पाटील यांच्यावर चाकूहल्ला करत मारहाण केलीय. दरम्यान या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी फक्त 54.34% प्रतिसाद मिळाला आहे. सगळ्यात जास्त लसीकरण पालघरमध्ये झालं असून 400 पैकी 319 लोकांनी लस घेतली आहे. म्हणजेच पालघरमध्ये 80 टक्के लसीकरण झालं आहे. तर बीड फक्त 28 टक्के लसीकरण झालं आहे. एका दिवसाला 500 लसीकरण होणं अपेक्षित होतं, पण फक्त 142 जणांनी लस घेतली आहे. सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या मुंबईत फक्त 43 टक्के लसीकरण झालं असून 1400 पैकी फक्त 595 लोकांनी लस घेतली आहे. मुंबई उपनगरात 53 टक्के लसीकरण झालं असून म्हणजेच, 1900 पैकी 1002 जणांनी लस घेतली आहे.
व्हर्च्युअलऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती सर्व पक्षकारांनी केल्यानंतर, मराठा आरक्षणावरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. आता 5 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन की प्रत्यक्ष सुनावणी करायची याबाबत निर्णय घेणार आहे.
नांदेड शहरालगत वाहणाऱ्या गोदावरी नदी पत्रातील नाव घाट परिसरात तरंगताना पुरुष जातीचा अंदाजे 22 ते 24 वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळला आहे. सदर इसम हा पोलीसस्टेशन इतवारा परिसरातील नाव घाट नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अंगावर निळा शर्ट पॅन्ट, रंग गोरा, मजबूत बांधा असणाऱ्या आणि 22 ते 24 वयोमान असणाऱ्या सदर इसमास कोणी ओळखत असेल तर नांदेड पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. परंतु कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील लसीकरण मोहीम 17 आणि 18 जानेवारी या दोन दिवशी स्थगित केली होती. त्यानंतर १९ जानेवारीला पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु लसीकरणा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. राज्यात लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी फक्त 54.34 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. सगळ्यात जास्त लसीकरण पालघरमध्ये झालं. 400 पैकी 319 जणांनी लस घेतली, म्हणजेच 80 टक्के लसीकरण झालं. तर बीडमध्ये फक्त 28 टक्के लसीकरण झालं. एक दिवसाला 500 जणांना लस घेणं अपेक्षित होतं, परंतु फक्त 142 जणांनीच काल लस घेतली. सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या मुंबईत फक्त 43 टक्के लसीकरण झालं. 1400 पैकी फक्त 595 लोकांनी लस घेतली. तर मुंबई उपनगरात 53 टक्के लसीकरण झाले. इथे 1900 पैकी 1002 जणांनी लस घेतली.
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. परंतु कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील लसीकरण मोहीम 17 आणि 18 जानेवारी या दोन दिवशी स्थगित केली होती. त्यानंतर १९ जानेवारीला पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु लसीकरणा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. राज्यात लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी फक्त 54.34 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. सगळ्यात जास्त लसीकरण पालघरमध्ये झालं. 400 पैकी 319 जणांनी लस घेतली, म्हणजेच 80 टक्के लसीकरण झालं. तर बीडमध्ये फक्त 28 टक्के लसीकरण झालं. एक दिवसाला 500 जणांना लस घेणं अपेक्षित होतं, परंतु फक्त 142 जणांनीच काल लस घेतली. सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या मुंबईत फक्त 43 टक्के लसीकरण झालं. 1400 पैकी फक्त 595 लोकांनी लस घेतली. तर मुंबई उपनगरात 53 टक्के लसीकरण झाले. इथे 1900 पैकी 1002 जणांनी लस घेतली.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस अनधिकृत फ्लेक्सचे पेव वाढत असताना चक्क आता महापालिका कार्यालयांवरच फ्लेक्स झळकू लागले आहेत. घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर असलेल्या उपजलअभियंता कार्यालयाचे प्रवेशद्वार अशाच अनधिकृत फ्लेक्सने झाकोळून गेले आहे. इथला मार्ग फ्लेक्स ठेवण्याचे गोदाम झाला आहे. अशाप्रकारे मुंबईत हजारो फ्लेक्स झळकत असताना, मुंबई महापालिका मात्र यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी. रिक्षा- टॅक्सी भाडेवाढीबाबत लवकरच निर्णय़. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांना 10 हजारांचा दंड. परिवहन मंत्री अनिल परब यांचे संकेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या 16 सुरक्षा रक्षकांच्या नोकरीवर सध्या टांगती तलवार आहे. यापैकी 3 जणांना अचानकपणे कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. तर, उर्वरित जणांची नोकरी देखील केव्हाही जाऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणचे सारेजण स्थानिक प्रकल्पग्रस्त असून मागील 10 ते 12 वर्षापासून काम करत आहेत. त्यामुळे आम्ही आता जायचं कुठं? असा प्रश्न यांना पडला आहे. नेस्कोकडे यापूर्वी या ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवण्याचं काम होतं. पण, तेच काम आती केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे काम करणाऱ्या डीजीआर यांच्याकडे आले आहे. त्यामुळे आता 90 टक्के माजी सैनिक आणि 10 टक्के स्थानिक या नियमानुसार सुरक्षा रक्षक भरले जाणार आहेत. याबाबत एनपीसीएलशी बोलले असता त्यांनी याबाबत आमचा काही संबंध नाही. आम्ही काही करू शकत नाही असं उत्तर दिलंय. तर डीजीआरनं मात्र आम्हाला नियमाप्रमाणे सारं करावं लागेल असं उत्तर 'एबीपी माझा'शी बोलताना दिलं आहे. कोकणात प्रकल्प येताना स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल असं उत्तर दिलं जातं. पण, आता दहा वर्षानंतर जर अशा प्रकारे आमच्या पोटावर पाय येणार असेल तर असे प्रकल्प काय कामाचे? 10 वर्षापासून आम्हाला का ठेवलं गेलं? असा सवाल सध्या या ठिकाणचे कामगार करत आहेत. केंद्र, राज्य सरकार शिवाय स्थानिक आमदार, नेते. खासदार यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सध्या कामगार करत आहेत.
भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपूलावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार थेट उड्डाणपुलाच्या खाली फेकला गेल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हर्षल भोईर असं जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून तो राजीव गांधी उड्डाण पुलाहून ठाण्याच्या दिशेने जात होता. याच दरम्यान समोरुन येणाऱ्या भरधाव कारची जोरदार धडक बसल्याने हर्षल भोईर थेट पुलाच्या खाली फेकले गेला. यात त्याला गंभीर दुखापत झाली असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील पाचपाखडी विभागात असलेल्या श्री स्वामी नारायण सत्संग हॉलला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत काही सिलेंडरचे देखील स्फोट झाल्याने आग भडकली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र हे सत्संग भवन आगीत जळून खाक झाले. या ठिकाणी अग्निशमन दलाने दहापेक्षा जास्त गॅस सिलेंडर बाहेर काढले. सुदैवाने यातील फक्त एकच सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट झाला तेव्हा अग्निशमन दलही घटनास्थळी उपस्थित होतं. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा शिवारात एका शेतातील विहिरीत बिबट्याचे पिल्लू पाय घसरून पडले आहे. चारठाणा शिवारातील वडी येथील पोलीस पाटील संजय पवार यांच्या शेतात पाण्याच्या शोधात एक बिबट्याचे पिल्लू आले आणि पाय घसरून विहिरीत पडले. यानंतर त्याच्या आवाजाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिस पाटलांना ही बाब सांगितली. यानंतर पोलीस पाटलांनी बामणी पोलीस स्टेशनसह वनविभागाला याची माहिती दिली असून परभणी येथून वनविभागाचे अधिकारी नांदेड येथील वन विभागाची टीम आहे. या घटनास्थळाकडे रवाना झाली असून या स्थानिक गावकरी आणि प्राणी मित्रांच्या सहकार्याने बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आयर्न मॅन किताब पटकविल्याबद्दल आयुक्त कृष्ण प्रकाश यांना वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन मध्ये समावेश करण्यात आला आहे.
यावर्षी २६ जानेवारीला ग्रामसभा होणार नाही, ३१ मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिली जाणार, निवडणूक पार पडलेल्या १४२३४ ग्रामपंचायतीत नवीन सदस्यांची सत्ता स्थापन होईपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिली जाणार, राज्य सरकार उद्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेणार
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी विजयाच्या उत्स्फूर्तपणा पाहायला मिळाला. काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज येथे सत्तांतर होताच गावातील इस्त्राइल पठाण यांनी निवडून आलेल्या मिर्झा नासीर बेग यांचा चक्क दुधाने अभिषेक करत जल्लोष साजरा केल्याने पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला.
हिंगोलीत मांडूळ प्रजातीचे साप बाळगून त्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघा जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरून अटक केलीय. त्यांच्याकडून दोन मांडूळ प्रजातीचे सापही जप्त करण्यात आले आहेत.
मराठा आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्या होणार. 25 जानेवारी ही तारीख आधी निश्चित करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण उद्याच लिस्ट झाले आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होणार सुनावणी.
नागपुरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण “बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपुर” असे करण्यात आले आहे.याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली .

नागपुर जवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतमध्ये तरुण महिला सदस्यांची निवड, भरघोस मताधिक्याने 21 वर्षीय कुमारी सांची गर्जे यांचा दणदणीत विजय.

साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा नेमाडे यांना धमकीचे फोन, हिंदू कादंबरीतील वंजारी समाजातील महिलाविषयी लिखाणामुळे जीवे मारहाण धमकी, प्रतिभा नेमाडे यांची मुंबईतील वाकोला पोलिसात तक्रार
भाजपच्या संघटनात्मक आढावा बैठका आजपासून होत आहेत. त्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे भाजपच्या नरिमन येथील कार्यालयात दाखल झाले आहेत. आज दिवसभर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील स्थिती काय होती आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकारी या बैठकीत ऑनलाईन हजेरी लावतील. जिल्हा कार्यालय बांधणीसाठीही यावेळी चर्चा होईल.
सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थान भक्तांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात येणार असून 28 जानेवारी रोजी असलेली पौष पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आलीआहे.
व्हॉईस ओव्हर - दरवर्षी पौष पौर्णिमा यात्रेला विविध राज्यातून लाखो भाविक येतात.पण कोरोना सावट असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.28 जानेवारी रोजी होणारी महत्त्वाची पौर्णिमा यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर आदेश बजावला आहे.
अवैध दारु विक्रेत्यांनी गावातील दोन तरुणांना मारहाण केल्यानंतर गावातील महिलांनी दारु विक्रेत्यांची वाहने जाळून, त्यांच्या अड्ड्यातून अवैध दारु साठा जप्त केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येरला गावात रविवारी (17 जानेवारी) मध्यरात्री ही घटना घडली.
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आजचा 55वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनासंदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरु आहे. अशातच शेतकरी 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या रिंग रोडवर ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. याच संदर्भात दिल्ली पोलीस आज पुन्हा शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहेत. शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये आज सकाळी बैठक पार पडणार आहे.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


1. पुण्यात होणाऱ्या एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी, 200 जणांची मर्यादा; 30 जानेवारी रोजी परिषद


2. किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकरी मोर्चाची मुंबईकडे कूच; हजारो शेतकरी 26 जानेवारीला राजभवनावर धडकणार


3. 26 जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यास पोलिसांची परवानगी, 5 प्रमुख मार्गांवर आंदोलक शेतकऱ्यांची परेड


4. आज जालन्यात ओबीसींचा मोर्चा; जातीनिहाय जनगणना, आरक्षण इत्यादी प्रश्नांवर मागण्या, मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती


5.विधानसभा निवडणुकीआधी भाजप प्रवेशासाठी मंत्रिपदासह 100 कोटींची ऑफर; राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंद यांचा गौप्यस्फोट

6. पगार न मिळाल्यानं ड्रायव्हरनं पाच बसेस जाळल्या, बोरीवलीतील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद


7. प्रजासत्ताक दिनी घातपाताची शक्यता; आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे सहा लाँच पॅड सक्रिय, गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा


8. आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक, एअर अॅम्ब्युलन्समधून रांचीहून दिल्लीत हलवलं, एम्समध्ये पुढील उपचार


9. जम्मू-काश्मिरमध्ये 150 मीटर लांबीचं भुयार सापडलं, भारत-पाकिस्तान सीमेवरील पानसर भागातील प्रकार


10. कोरोना लसीची खुल्या बाजारात विक्री होणार नाही; केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांचे स्पष्टीकरण

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.