राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 96 हजार 369 नमुन्यांपैकी 89 हजार 561 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 6427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 398 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 8702 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 840 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 8 पुरूष तर 6 महिला आहेत. त्यातील दोन जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 9 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर तीन रुग्ण 40 वर्षांखालील आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 6427
मृत्यू - 283
मुंबई महानगरपालिका- 4205 (मृत्यू 167)
ठाणे- 34 (मृत्यू 2 )
ठाणे महानगरपालिका- 214 (मृत्यू 4)
नवी मुंबई मनपा- 97(मृत्यू 4)
कल्याण डोंबिवली- 124 (मृत्यू 3)
उल्हासनगर मनपा - 2
भिवंडी, निजामपूर - 8
मिरा-भाईंदर- 116 (मृत्यू 2)
पालघर- 21 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 109 (मृत्यू 3)
रायगड- 14
पनवेल- 36 (मृत्यू 1)
नाशिक - 4
नाशिक मनपा- 7
मालेगाव मनपा - 109 (मृत्यू 9)
अहमदनगर- 24 (मृत्यू 2)
अहमदनगर मनपा - 8
धुळे -4 (मृत्यू 1)
धुळे मनपा - 13 (मृत्यू 1)
जळगाव- 6 (मृत्यू 1)
जळगाव मनपा- 2 (मृत्यू 1)
नंदुरबार - 7 (मृत्यू 1)
पुणे- 41 (मृत्यू 1)
पुणे मनपा- 812 (मृत्यू 59)
पिंपरी-चिंचवड मनपा- 57 (मृत्यू 2)
सातारा- 20 (मृत्यू 2)
सोलापूर- 1
सोलापूर मनपा- 32 (मृत्यू 3)
कोल्हापूर- 6
कोल्हापूर मनपा- 3
सांगली- 25
सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1)
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 7 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा- 40 (मृत्यू 5)
जालना- 2
हिंगोली- 7
परभणी मनपा- 1
लातूर मनपा-8
उस्मानाबाद-3
बीड - 1
नांदेड मनपा - 1
अकोला - 11 (मृत्यू 1)
अकोला मनपा- 9
अमरावती मनपा- 7 (मृत्यू 1)
यवतमाळ- 17
बुलढाणा - 24 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर- 2
नागपूर मनपा - 98 (मृत्यू 1)
चंद्रपूर मनपा - 2
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 477 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 7491 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 27.26 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | देशातील कोरोना बाधितांचा आकडा 21 हजार 700; आतापर्यंत 686 जणांचा मृत्यू
कोरोनाबाधित रुग्णांपैकी 19 टक्के रुग्ण कोरोनामुक्त; 78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही : आरोग्य मंत्रालय
State Government | सामाजिक न्याय विभागाचा महत्वाचा निर्णय, पाच योजनांसाठी 1257 कोटी रुपये मंजूर