नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या 21 हजार 700वर पोहोचली आहे. आतापर्यंत 686 लोकांचा मृत्यू झाला असून 4325 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे. सध्या 5632 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 269 लोकांचा मृत्यू झाला आहे.


आंध्रप्रदेश 895, अंदमान निकोबार 18, अरुणाचल प्रदेश 1, आसाम 35, बिहार 148, चंदिगढ 27, छत्तीसगड 36, दिल्ली 2248, गोवा 7, गुजरात 2407, हरियाणा 262, हिमाचल प्रदेश 40, जम्मू काश्मिर 407, झारखंड 49, कर्नाटक 443, केरळ 438, लडाख 18, मध्यप्रदेश 1695, मणिपुर 2, उत्तराखंड 46, उत्तरप्रदेश 1509 आणि पश्चिम बंगालमध्ये 456 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.


78 जिल्ह्यात 14 दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही


देशातील 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तर गेल्या 28 दिवसात तब्बल 12 जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, मागील आठवड्यात हा आकडा 4 होता .


पाच लाखांहून अधिक टेस्ट करण्यात आल्या


देशात लॉकडाऊन जाहीर होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात देशात जवळपास पाच लाख कोरोनाच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या जास्तीत जास्त टेस्ट करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत केलेल्या पाच लाख टेस्टमध्ये जवळपास 21 हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. यादरम्यान कोरोना व्हायरसचा ट्रान्समिशन आणि डबलिंग रेट कमी करण्यात शासनाल यश आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.


रुग्णालयात दाखल होण्याची वेळ कुणावर येऊन नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र हे तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा सोशल डिस्टन्सिंगचं पालक लोक करतील. मात्र रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. आज देशात 736 रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात आहे. या रुग्णालयामध्ये एकूण 1 लाख 94 हजार बेड्सची व्यवस्था आहे.


संबंधित बातम्या :