मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. राज्यात कालपासून 55 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. एकट्या मुंबई 29 कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि सरकारची चिंता वाढली आहे.
कालपासून कुठे किती रुग्ण आढळले?
कालपासून मुंबईत 29, पुणे17, पिंपरी-चिंचवड 4, अहमदनगर 3, औरंगाबाद 2 असे एकूण 55 रुग्ण राज्यात आढळले आहेत. सद्यस्थितीला महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची सख्या 690 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 56 जण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाबाधित तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
- आज रात्री 9 वाजता, 9 मिनिटं लाईट्स ऑफ... कोरोनाच्या अंधकारात दिवे, मेणबत्ती, टॉर्चच्या उजेडात जळणार आसमंत
- Coronavirus | देशात कोरोना बाधितांचा आकडा 2787वर; आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू
- सांगलीतील इस्लामपूरमधील पहिल्या चार कोरोनाबधितांसह 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
- मुंबईतील अनेक परिसर कंटेनमेंट झोन, या झोनमध्ये कसं चालणार काम?
- Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं?
- अमेरिकेकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मागणी, भारत पुरवणार औषध