मुंबई : महाराष्ट्र सायबर सेल ने गेल्या 24 तासात अजून 7 गुन्हे नोंदवले आहेत. लॉक डाऊनची घोषणा झाल्या पासून एकूण तर आता पर्यंत एकूण 15 लोकांना खोटे मॅसेज व्हायरल करणे, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना अटक केली आहे. गेल्या 24 तासाच्या आतच अजून 7 गुन्ह्यांची नोंद सायबर सेल कडून करण्यात आली आहे.


लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर काय बरोबर नको ते मेसेज व्हायरल करणाऱ्यांनीची जणू फौजच तयार झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केले आणि त्या दिवसापासून ते 3 एप्रिल पर्यंत महाराष्ट्र सायबर सेलने सोशल मीडियावर कोरोनाव्हायरस संदर्भात खोटे मेसेज तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल करण्यान संदर्भात 78 गुन्हे दाखल केले आहेत. तर धक्कादायक बाब म्हणजे 24 तासाच्या आत 7 नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 15 लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या संधीचा फायदा साधत आर्थिक मदतीचे ही आवाहन करण्यासाठी खोट्या साईट्स बनवल्या आहेत.


कुठे आणि किती गुन्हे दाखल झाले?
मुंबई 18


पुणे ग्रामीण 6


सातारा 6


बीड 5


नाशिक ग्रामीण 5


नागपूर शहर 4


नाशिक शहर 4


ठाणे शहर 4


कोल्हापूर 4


गोंदिया 3


भंडारा 3


जळगाव 3


सोलापूर ग्रामीण 2


सिंधुदुर्ग 2


पुणे शहर 1


हे सर्व मेसेज स्थानिक लोकांकडूनच बनवण्यात येतात आणि व्हायरल केले जातात. महाराष्ट्र सायबर सेलचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हरीश बैजल यांनी लोकांना आवाहनन केले की, तुम्ही असे मेसेज वायरल करू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपचे जर तुम्ही एडमिन असाल तर सेटिंग मध्ये जाऊन फक्त ॲडमिनच मेसेज पाठवू शकेल ते सेटिंग तुम्ही कर जेणेकरून असे खोटे मेसेज वायरल होणार नाही. तसेच तरुणांना देखील आवाहन केले की, तुम्ही असे मेसेज पाठवू नका कारण जर तुमच्यावर गुन्हा नोंदवला गेला तर तुम्हाला भविष्यात सरकारी नोकरी मिळणार नाही.


संबंधित बातम्या : 





Himalaya Mountain Range | प्रदूषणात घट झाल्याने जालंधरमधून हिमालयाचं दर्शन