मुंबई : देशातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. मागील दोन दिवसात राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. परंतु असं असलं तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा रिकव्हर म्हणजेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या 27 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट आहे. ही टक्केवारी राज्य सरकारने 10 जून रोजी जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारावर काढली आहे.


रायगड, नाशिक, अहमदनगर, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे



50 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट असलेले 27 जिल्हे


1. रायगड
कोरोनामुक्त रुग्ण – 981
अॅक्टिव्ह रुग्ण – 534
टक्केवारी – 62%


2. नाशिक
कोरोनामुक्त रुग्ण – 1130
अॅक्टिव्ह रुग्ण – 497
टक्केवारी – 66%


3. अहमदनगर
कोरोनामुक्त रुग्ण – 139
अॅक्टिव्ह रुग्ण – 72
टक्केवारी – 63%


4. नंदूरबार
कोरोनामुक्त रुग्ण – 28
अॅक्टिव्ह रुग्ण – 12
टक्केवारी – 63%


5. पुणे
कोरोनामुक्त रुग्ण – 6079
अॅक्टिव्ह रुग्ण – 3888
टक्केवारी – 58.41%


6. सातारा
कोरोनामुक्त रुग्ण – 361
अॅक्टिव्ह रुग्ण – 293
टक्केवारी – 53%


7. कोल्हापूर
कोरोनामुक्त रुग्ण – 470
अॅक्टिव्ह रुग्ण – 193
टक्केवारी – 70%


8. सांगली
कोरोनामुक्त रुग्ण – 106
अॅक्टिव्ह रुग्ण – 78
टक्केवारी – 56%


9. रत्नागिरी
कोरोनामुक्त रुग्ण – 191
अॅक्टिव्ह रुग्ण – 176
टक्केवारी – 50%


10. औरंगाबाद
कोरोनामुक्त रुग्ण – 1283
अॅक्टिव्ह रुग्ण – 773
टक्केवारी – 59%


11. जालना
कोरोनामुक्त रुग्ण – 148
अॅक्टिव्ह रुग्ण – 72
टक्केवारी – 65%


12. हिंगोली
कोरोनामुक्त रुग्ण – 179
अॅक्टिव्ह रुग्ण – 35
टक्केवारी – 83%


13. परभणी
कोरोनामुक्त रुग्ण – 58
अॅक्टिव्ह रुग्ण – 19
टक्केवारी – 72%


14. लातूर
कोरोनामुक्त रुग्ण – 118
अॅक्टिव्ह रुग्ण – 25
टक्केवारी – 80%


15. उस्मानाबाद
कोरोनामुक्त रुग्ण – 83
अॅक्टिव्ह रुग्ण – 54
टक्केवारी – 59%


16. बीड
कोरोनामुक्त रुग्ण – 46
अॅक्टिव्ह रुग्ण – 15
टक्केवारी – 73%


17. नांदेड
कोरोनामुक्त रुग्ण – 113
अॅक्टिव्ह रुग्ण – 53
टक्केवारी – 64%


18. अकोला
कोरोनामुक्त रुग्ण – 497
अॅक्टिव्ह रुग्ण – 344
टक्केवारी – 56%


10. अमरावती 
कोरोनामुक्त रुग्ण – 210
अॅक्टिव्ह रुग्ण – 75
टक्केवारी – 68%


20. यवतमाळ
कोरोनामुक्त रुग्ण – 117
अॅक्टिव्ह रुग्ण – 39
टक्केवारी – 69%


21. बुलडाणा
कोरोनामुक्त रुग्ण – 56
अॅक्टिव्ह रुग्ण – 39
टक्केवारी – 57%


22. नागपूर
कोरोनामुक्त रुग्ण – 495
अॅक्टिव्ह रुग्ण – 324
टक्केवारी – 59.56%


23. वर्धा
कोरोनामुक्त रुग्ण – 7
अॅक्टिव्ह रुग्ण – 6
टक्केवारी – 50%


24. भंडारा
कोरोनामुक्त रुग्ण – 31
अॅक्टिव्ह रुग्ण – 11
टक्केवारी – 73.80%


25. गोंदिया
कोरोनामुक्त रुग्ण – 67
अॅक्टिव्ह रुग्ण – 0
टक्केवारी – 100%


26. चंद्रपूर
कोरोनामुक्त रुग्ण – 26
अॅक्टिव्ह रुग्ण – 19
टक्केवारी – 57.57%


27. गडचिरोली
कोरोनामुक्त रुग्ण – 37
अॅक्टिव्ह रुग्ण – 7
टक्केवारी – 82%


राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 97 हजार 648
राज्यात गुरुवारी (11 जून) 3607 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.