मुंबई: राज्यात आज कोरोनाच्या 150 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1018 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 12 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 6 जण मुंबईत, 3 पुण्यात तर प्रत्येकी 1 जण नागपूर, सातारा, भाईंदर येथील आहेत. राज्यात आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 20 हजार 877 नमुन्यांपैकी 19 हजार 290 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 1018 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34 हजार 695 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 4008 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 23 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, बुलढाणा 6, प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी- चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत; तर प्रत्येकी एक जण हिंगोली, जळगाव आणि वाशिममधील आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर महापालिका क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबवण्यात येत आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात 214 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. तर हिंगोलीत 14, सांगलीत 31, रत्नागिरी 39 आणि जळगावमध्ये 48 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. तर राज्यात या प्रकारे एकूण 3492 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 12 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 1018
मृत्यू - 64
मुंबई – 642 (मृत्यू 40)
पुणे – 130 (मृत्यू 8)
पिंपरी-चिंचवड – 17
पुणे ग्रामीण - 4
सांगली – 26
नागपूर – 19 (मृत्यू 1)
वसई विरार - 10 (मृत्यू 2)
पनवेल - 6
मीरा भाईंदर - 3 (मृत्यू 1)
कल्य़ाण-डोंबिवली – 25 (मृत्यू 1)
नवीमुंबई – 28 (मृत्यू 2)
ठाणे – 21 (मृत्यू 3)
ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण, रत्नागिरी, यवतमाळ- 3 (मृत्यू 1 पालघर)
बुलढाणा, अहमदनगर ग्रामीण - प्रत्येकी 7 (मृत्यू 1 बुलढाणा)
अहमदनगर – 18
सातारा – 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद – 12 (मृत्यू 1)
लातूर - 8
उस्मानाबाद - 4
कोल्हापूर – 2
उल्हासनगर, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती, गोंदिया - 1 (मृत्यू 2 जळगाव आणि अमरावती)
गोंदिया – 1
संबंधित बातम्या :