LIVE UPDATES | शार्जील उस्मानीविरुद्ध पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
02 Feb 2021 11:36 PM
पंढरपूर : तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न. खाऊ देण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन केला आत्याचाराचा प्रयत्न. पंढरपुर तालुक्यातील तपकिरी शेतफळ येथील घटना. सुखदेव मुरलीधर बोंगे वय ४९ याला पोलिसांनी घेतले ताब्यात. पोस्को॓’अंतर्गत पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शार्जील उस्मानीविरुद्ध पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये 153 अ कलमांतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रदीप गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर शार्जीलविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. शनिवारी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शार्जीलने भाषणादरम्यान हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील चिपी विमानतळासंदर्भात आज आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अथितीगृह मुंबई येथे पार पडली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे मुख्य सचिव, उद्योग विभागाचे सचिव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव, आयआरबीचे प्रमुख अधिकारी व विविध खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत DGCA समितीने चिपी विमानतळाची पाहणी केल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ज्या त्रुटी काढल्या आहेत. त्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यातल्या बहुतांशी त्रुटी दूर केल्या असल्याचे आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरीत त्रुटी देखील पूर्ण करण्याची ग्वाही आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व त्रुटी १० फेब्रुवारी पर्यंत दूर करण्याचे आदेश आयआरबीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे चिपी विमानतळासंदर्भात १० फेब्रुवारी रोजी पुन्हा आढावा बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
यवतमाळ : डॉक्टर मोबाईलवर व्यस्त असल्यामुळं पोलिओ लसीकरणादरम्यान 12 लहान मुलांना पोलिओ लस ऐवजी सॅनिटीझर पाजले गेले. तपासात ही बाब पुढे आली. जिल्हा आरोग्य अधिकारी हरी पवार यांनी दिली माहिती यापुढे लसीकरण दरम्यान मोबाईल हाताळू नये अशा सक्त ताकीद सूचना सर्वाना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविडनंतर लवकरच पुन्हा एकदा नाईटलाईफ सुरु होणार, मिशन बिगीन अंतर्गत हळूहळू सर्व बाबी सुरु केल्या, त्यामुळे नाईटलाईफ देखील लवकरच सुरु करु, रेस्टॉरंटही रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमी लेयरसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर याबाबतचा विचार सुरू असल्याचे त्यांनी या उत्तरात म्हटले आहे. सध्या ओबीसीसाठी क्रिमी लेयरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख आहे. 2013 मध्ये क्रिमी लेयरसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाखांवरुन 6 लाख करण्यात आली होती. तर 2017 मध्ये मोदी सरकारने ही मर्यादा सहा लाखांवरुन आठ लाख केली.
ऊसदर आंदोलनात दाखल गुन्ह्यातून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची बारामती सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. बारामतीमध्ये 2012 साली ऊसदर वाढीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी माळेगाव येथील कारखान्यावर गाड्यांचे टायर फोडणे, ट्रॅक्टरचे टायर फोडणे, वाहतूकदारांचे नुकसान करणे आदी गुन्हे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर दाखल करण्यात आले होते. एकूण 27 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील 26 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एक व्यक्ती मयत झालेली होती. त्यामुळे सर्वच आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2012 ला गुन्हा दाखल झाला होता. ही केस 2014 साली कोर्टात उभी राहिली होती. तब्बल 9 वर्षांनी या गुन्हयाचा निकाल लागला आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए. एस. गिऱ्हे यंच्या कोर्टाने ही हा निकाल दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु आहे. आगामी अर्थसंकल्प, भाजपमधल्या घडामोडी, मतदारसंघातल्या प्रश्नावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेले अनेक दिवस सुधीर मुंनगटीवार यांनी शिवसेनेवर सातत्याने टीका केली आहे. परंतु आजच्या अचानक भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आदिपुरुष या चित्रपटाच्या सेटवर आग. मुंबईतील मालाड येथे सेटवर आग लागली त्यावेळी 50 ते 60 जण घटनास्थळी उपस्थित होते. सर्व कलाकार सुरक्षित आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
पंजाबमधील जलालाबादमध्ये शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्या गाडीवर हल्ला, तीन कार्यकर्ते जखमी, हल्ल्यामागे काँग्रेस असल्याचा अकाली दलाचा आरोप
पंजाबमधील जलालाबादमध्ये शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्या गाडीवर हल्ला, तीन कार्यकर्ते जखमी, हल्ल्यामागे काँग्रेस असल्याचा अकाली दलाचा आरोप
आज सीए 2020 (चार्टर्ड अकाऊन्टं) परीक्षेचा निकाल जाहीर आला आहे. यामध्ये सीए नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईच्या कोमल जैनने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. सीए परीक्षेत कोमलने 75 टक्के गुण मिळवत देशात पहिल्या येण्याचा मान मिळवला आहे. कोमलने पोदार कॉलेजमध्ये बी कॉमचं शिक्षण पूर्ण केलं असून सीए परीक्षेची त्यादरम्यान ती तयारी करत होती. सीए परीक्षेच्या जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल 5.84 टक्के तर नव्या अभ्यासक्रमाचा निकाल 14.47 टक्के लागला आहे.
विदर्भातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे विवेकानंद जन्मोत्सव हा उत्सव बुलढाणा जिल्ह्यातिल हिवरा आश्रम येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. हिवरा आश्रम येथे देशभरातून लाखो भाविक सुखदास महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तीन दिवस हा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. दररोज विविध कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामध्ये व्याखाने, कीर्तन, भारुड, आध्यामिक असे असंख्य भरगच्च कार्यक्रम घेतल्या जातात. तसेच या जन्मोत्सवाचे आकर्षण महाप्रसादाचे असते. 50 एकर शेतात भाविकांच्या भव्य पंगती बसवल्या जातात. 10 लाख भाविक एकाच वेळेस पंगतीत महाप्रसादाचा लाभ घेतात. पंगतीला ट्रक्टरच्या साहाय्याने हा महाप्रसाद वितरित केला जातो. हा महाप्रसाद जन्मोत्सवाचा समारोप असतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. आता आश्रम समितिने ऑनलाइन फेसबुक द्वारे दर्शन लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
यवतमाळ जिल्हयाच्या उमरखेड येथे रेती माफीयांनी तहसीलदारावर चाकू हल्ला केला होता. त्यात त्या घटनेतील मुख्य आरोपी ला अजूनही अटक झाली नसल्याने राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचे सामूहिक रजा आंदोलन आज आहे. आज सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील तहसीलदार यवतमाळ जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीचे निवेदन दिले. 24 जानेवारी रोजी
उमरखेड येथे रेती तस्कराने नायब तहसीलदार आणि तलाठ्यांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले होते . या घटनेत उमरखेड तहसीलचे नायब तहसिलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे हे वाहनांची तपासणी करीत असताना अचानकपणे रेती तस्करांकडून नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर चाकू हल्ला झाला त्यात यांच्या पोटात चाकूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते.
राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल आता मातोश्री वर नसून तो सिल्वर ओक कडे गेला असून हे सरकार शरद पवार चालवत आहेत असा घणाघात रासप चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला .
माघ वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दोन दिवस बंद राहणार आहे. चार प्रमुख वाऱ्यांपैकी माघ वारीला विशेष महत्त्व आहे. 23 फेब्रुवारीला माघ महिन्यातील मोठी वारी भरणार आहे. 22-23 फेब्रुवारीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे.
यवतमाळमध्ये 12 बालकांना पोलिओ लस ऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी आता चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर समुदाय आरोग्य अधिकारी अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
भंडारा :- बर्ड फ्ल्यूच्या सावटातही तब्बल ४०० कोंबड्यांची चोरी
,
मोहाडी तालुक्यातील सिरसोली येथील संजीव मुरकुटे यांच्या पोल्ट्री फार्म येथील घटना
,
आंदळगाव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज गाझीपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार
यवतमाळ जिल्ह्यात रेतीमाफीया यांचेकडून वारंवार महसूल अधिकारी- कर्मचारी यांचेवर जीवघेणे हल्ले होत आहे.अवैध गौणखनिज वाहतूक व उत्खनन याला प्रतिबंध करत असताना अधिकारी व कर्मचा-यांना कोणतेही संरक्षण नाही, यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाव्दारे सुरक्षा रक्षक देणेबाबत मागणी केली होती, ती मागणी तत्त्वत: मंजुर करण्यात आली. परंतु अद्याप पावेतो सुरक्षा रक्षक पुरवण्यात आली नाही. या घटनेमुळे महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल खच्चीकरण होऊन त्यांच्यामध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसिलदार संघटना, मुख्यालय नाशिक यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सुरक्षारक्षक प्राप्त होत नाहीत तोपर्यंत अवैध गौणखनिज वाहतूक व उत्खनन याला प्रतिबंध करण्यासाठी आज बुलडाणा जिल्ह्यात कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.
लग्न होत नाही म्हणून गळफास घेऊन एकाची आत्महत्या , 44 वर्षीय योगेश मगरने केली आत्महत्या, साताऱ्यातील नागठाणे येथील घटना, टेलरिंग व्यवसायिक युवकाची दुकानातच आत्महत्या
नांदेड:जिल्ह्यातील भोकर येथे वन विभाग व मनरेगाच्या कामात बोगस मजूर दाखवून शासनास लाखोंचा चुना, बोगस मजुरांच्या यादीत मयत आणि शासकीय नोकरदारांचा समावेश.
मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकहुन मुंबईच्या दिशेने भरधाव जात असलेली कार दुभाजकावरून उडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसली धडकली. या भीषण अपघातामध्ये कार मधील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपलास फाट्याजवळ अपघात घडला असून कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावरून कार उडून विरुद्ध दिशेने गेली. यावेळी नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसला तिची धडक बसली. दरम्यान अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं माहिती देण्यात आली आहे.
आजच्या कोअर कमिटी मध्ये वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याची भूमिका ठरवण्यात आली.
येत्या ५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर वीज दरवाढी विरोधात भाजपा आंदोलन करणार ,
राज्यातील सर्व महावितरण कार्यालयाबाहेर भाजपा आंदोलन करणार.
सांगोला- कर्नाटकातील एक सोन्याच्या कंपनीतून तब्बल 12 किलो 57 ग्रॅम सोने पळवणाऱ्या आरोपीला सांगोला पोलिसांनी पकडले, जवळपास आत्तापर्यंत 11 किलो सोने ताब्यात घेतले. उरलेले सोने शोधायचा प्रयत्न सुरू, कर्नाटक पोलिसांना मदत करताना सांगोला पोलिसांची जोरदार कामगिरी, थोड्या वेळापूर्वी सांगोला तालुक्यातील मांजरी येथील नूतन ग्रामपंचायत सदस्याला घेतले ताब्यात, सोने पळवणारा आरोपी मांजरी गावचा
भिवंडीच्या दापोडे इथल्या हरिहर कंपाउंड मध्ये सकाळच्या सुमारास एक मजली इमारत कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 50 ते 55 कामगार होते त्यापैकी सर्व कामगार बाहेर पडले मात्र जवळपास 7 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. सात तासांच्या रेस्क्यू नंतर अखेर कामगारांना बाहेर काढण्यास यश आलं. मात्र यातील एक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सौरभ त्रिपाठी असं मयत कामगाराचं नाव आहे. तर इतर कामगार जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई : मुंबईत पाऊस, वारा किंवा कुठलीही वेळ असू द्या ट्रॅफिक पोलीस सतत रस्त्यावर उभे असतात. रस्त्यावर ट्रॅफिक हाताळताना त्यांना अनेक त्रास सहन करावा लागतो. कधी कधी वहानांची तपासणी करत असताना चालक किंवा मालकासोबत त्यांचा वाद होतो. अनेक वेळी तर ट्रॅफिक पोलिसांना काही उद्धट लोक शिविगाळ करतात, तर काही वेळा त्यांच्यावर हल्लाही केला जातो, असही प्रकार बरेच वेळा समोर आलेला आहे. पण आता वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या लोकांना चांगलाच महागात पडू शकतं. कारण मुंबई वाहतूक पोलीस विभागाला 1388 बॉडी कॅमेरे मिळाले आहेत. ज्याचा वापर पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. या कॅमेऱ्यामुळे पोलिसांवर होणारे हल्ले किंवा शिविगाळच्या घटना कमी करता येतील. जे कोणी ट्रैफिक पोलिसांसोबत दुर्व्यवहार करणार त्यांचं प्रत्येक कृत्य सदर कॅमेऱ्या कैद होणार आहे. त्यासोबतच पोलिसांकडून करण्यात आलेली प्रत्येक कारवाई योग्य आहे की नाही ते सुद्धा स्पष्ट होईल.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची 3 फेब्रुवारी रोजी 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होणार,
दरवर्षी गोकुळ दूध संघाच्या महासभेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील गट आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटात होत असते धुमश्चक्री,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कागल एमआयडीसी इथं पशुखाद्य कारखान्याच्या भव्य जागेत सोशल डिस्टंसिंगचे पालन करत भरवण्यात येणार आहे सर्वसाधारण सभा,
लोकलने प्रवास करण्याची मुभा आजपासून सर्वसामान्य प्रवाशांना देण्यात आली आहे. मात्र सात वाजल्यानंतर जीआरपी आणि आरपीएफ यांनी मोठी फौज लावून सर्व सामान्य प्रवाशांना स्थानकात जाण्यापासून रोखले. जे प्रवासी लोकलमध्ये प्रवास करण्यास जात होते त्यांच्या तिकीटांसोबत आयकार्ड देखील तपासण्यात येत होते. आज पहिलाच दिवस असल्याने, सर्वसामान्य प्रवाशांना समज देऊन घरी जाण्यास सांगण्यात आले.
नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंब्याच्या वळणावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली .या अपघातात एकाचा मृत्यू तर 15 ते 16 गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली . मुनीलाल रामअवतार शहा असे मयत इसमाचे नाव आहे .जखमी मधील बहुतांश प्रवाशी उल्हासनगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येतेय .हे प्रवासी अष्टविनायकदर्शन करून परतत होते याच दरम्यान माळशेज घाटातील आंबा वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला आहे. अपघातात गंभीर जखमींना तातडीने स्थानिक पोलीस व ग्रामस्थांच्या आळेफाटा येथिल सोनवणे ,माऊली आणी कोकणे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे .
मुंबई : आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईची लोकल रुळांवरून धावणार आहे. यापूर्वी गेली दहा महिने शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने लोकल सेवा उपलब्ध केली होती. मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्यामधून प्रवास करता येत नव्हता. आज एक फेब्रुवारीपासून ठराविक कालावधी मध्ये सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. आज पहाटे ठाण्यावरून पहिली लोकल निघाली या लोकलमध्ये सर्वसामान्यांनी प्रवासाचा आनंद घेतला.
जळगाव जिल्ह्यातील जवान सागर रामा धनगर शहीद, चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रक येथील जवान सागर रामा धनगर यांना 31 जानेवारी रोजी सेनापती (मणिपूर) येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आलं आहे. सागर धनगर हे नोव्हेंबर, 2017 मध्ये 5, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते.
हुसेन सागर एक्सप्रेसचा इंजिनपासून दुसऱ्या डब्याचे चाक रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. सीएसएमटी आणि भायखळा स्टेशनच्या दरम्यान जलद मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक पूर्णतः स्थगित. हुसेन सागर एक्सप्रेस सीएसएमटीहुन निघाल्यानंतर काही अंतरावरच झाला अपघात. मात्र, सुदैवाने अपघात कोणत्याही प्रवाशाला दुखापत नाही. या अपघातामुळे सीएसएमटीला जाणारी इंद्रायणी आणि तपोवन एक्सप्रेस रखडली. तर सीएसएमटीहुन निघणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रखडल्या.
चंद्रपूर : अज्ञात आरोपींनी केलेल्या गोळीबारात कोळसा व्यवसायिकाचा मृत्यू, राजुरा शहरातील गजबजलेल्या नाका नंबर तीन चौकातली घटना, राजू यादव असे 45 वर्षीय मृतकाचे नाव, मयूर हेअर स्टाईलमध्ये कटींग करायला आलेल्या राजू यादव यांचेवर दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी दुकानात जाऊन देशी कट्ट्याने गोळी चालवली, यावेळी तीन गोळ्या चालवण्यात आल्याची प्राथमिक माहिती, राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल, आरोपींचा शोध सुरू, गोळीबाराच्या घटनेने राजुरा आणि परिसरात खळबळ
सातारा- इनोवा कार आणि स्विफ्ट गाडीची एकमेकाला धडक, तिघांचा जागीच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी, पुणे बंगळुरु महामार्गावरील कराड हद्दीतील घटना, दोन्ही वाहने पुणे जिल्ह्यातील , घटनास्थळी कराड तालुका पोलिस दाखल, मृतांमध्ये तीन जण पैलवान असल्याची प्राथमिक माहिती
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहराजवळील वागजळ फाट्याजवळ भरधाव कारने लिंबाच्या झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोनजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही मृत हे चिखली येथील रहिवासी असल्याचे समजते. निशिकांत सदाशिव पाटील व 40 आणि साजिद अहमद खान असे मृतांची नावे आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहराजवळील वागजळ फाट्याजवळ भरधाव कारने लिंबाच्या झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही मृतक हे चिखली येथील रहिवासी असल्याचे समजते. निशिकांत सदाशिव पाटील आणि साजिद अहमद खान असे मृतकांची नावे आहेत.
सांगलीच्या तासगाव तालुक्यातील एका चुलत्याने अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीला दारु पाजून हा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंकुश गुजले याच्याविरोधात
तासगाव पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात करण्यात आलीय.
मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर बंदूक दाखवणाऱ्या आरोपींना जामीन मंजूर. खालापूर कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला.
विकास गजानन कांबळे आणि विजय प्रकाश सीताराम मिश्रा यांना जामीन मंजूर
कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका बँकेवर आरबीआय बँकेची कारवाई. इचलकरंजी मधील शिवम सहकारी बँकेचा परवाना केला रद्द. बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना डिआयसीजीसीकडून ठेवींवर विमा संरक्षण. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने ही कारवाई केली. अवसायानात प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवीनुसार ५ लाखापर्यंतची रक्कम डीआयजीसीकडून मिळणार
भारतीय क्रिकेट संघानं सुरूवातीच्या अडचणींनंतर शानदार पुनरागमन करत, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. भारताच्या खेळाडुंची मेहनत आणि सांघिक वृत्ती प्रेरित करणारी : पंतप्रधान
26 जानेवारीला तिरंग्याचा अपमान झाला, तिरंग्याचा अपमान झाल्यानं देश दु:खी, दिल्लीतील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये भाष्य
कोरोनाचा फटका यंदाच्या रणजी करंडकाला बसला आहे. भारतीय क्रिकेटच्या 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धा होणार नाहीत. तसं बीसीसीआयने सलग्न संघटनांना पत्राद्वारे कळवलं आहे. त्या बदल्यात विजय हजारे चषकाचं आयोजन करण्यात येणार आहे.
कोल्हापूर विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अस होणार नामकरण. नागरी उडाण खात्याकडून नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे सादर केल्याची माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार नामांतरावर शिक्कामोर्तब. देशातील 13 तर महाराष्ट्रातील तीन विमानतळाच्या नामांतराचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आलेत सादर. कोल्हापूरबरोबरच औरंगाबाद आणि शिर्डी विमानतळाच्या नावाचाही समावेश
विन्टेज कार रॅलीमध्ये ठाकरे परिवाराची उपस्थिती, वांद्रे कुर्ला संकुलपासून कार रॅलीला सुरुवात, रॅलीमध्ये 100 विन्टेज कार सहभागी होणार
नांदेड : वीज ग्राहकांना वाटप करण्याची बिले शेतात फेकू दिली, नांदेडच्या नायगावातील विज वितरण कंपनीचा धक्कादायक प्रकार, जानेवारी 2021 ची वीजबिलं वाटप न करताच दिली फेकून
पुण्यात भररस्त्यात वाहतूक पोलिसांवर लोखंडी सळईनं हल्ला केला आहे. यामध्ये वाहतूक पोलीस रविंद्र करवंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुण्यातील तळेगाव-चाकण चौकातील घटना आहे.
राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात होणार असून 5 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाची सुरुवात झाली. बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात हे लसीकरण झालं. सकाळी 8 वाजता या लसीकरणाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. राज्यभरात आज पोलिओ लसीकरण केलं जाणार आहे. कुणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली आहे. यावेळी अजित पवारांनी राज्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केलं.
किरीट सोमय्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांची पोलीस चौकशी करण्यात आली आहे. जुन्या खंडणीच्या प्रकरणासंदर्भात नील सोमय्या यांची पोलिसांकडून चौकशी केली गेली.
राज्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज जोडणी तोडणार, महावितरणाच्या मोहिमेमुळे पुन्हा सरकार आणि ग्राहकांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
पेटलेल्या ऊसाचा फड विझवताना शेतकऱ्याचा होरपळून जागीच मृत्यू ,
कोल्हापूरच्या पन्हाळा तालूक्यातील केखले इथली घटना,
माणिक शामराव शिंगटे असं होरपळून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव
नाशिकला होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोध चिन्ह आणि घोषवाक्यची निवड करण्यात आली असून बोधचिन्हाचे आज प्रकाशन करण्यात आले. "अनंत आमुची ध्येयासक्ती" याची घोषवाक्य म्हणून निवड करण्यात आलीय. प्रत्येक साहित्य संमेलनाची ओळख प्रथम दर्शनी बोध चिन्ह आणि घोषवाक्य होत असते म्हणूनच आकर्षक आणि समर्पक घोषवाक्य सुचविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्य भरातून याला चांगला प्रतिसाद मिळाला. 53 जणांनी बोधचिन्ह आणि घोषवाक्य पाठविले होते
दौंड तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना अजित पवारांनी पोलिओचा डोस दिला.. उद्यापासून राज्यभर पोलिओच्या लसीकरणाची सुरुवात होणार आहे.. मात्र त्या आधीच पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड शुगर कारखान्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना डोस पाजून शुभारंभ केला.. हा डोस अजित पवारांनी ऊसतोड मजुरांच्या तळावर जाऊन दिला.. कोरोनाचे सर्व नियम पाळून लसीकरण करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.. त्या सर्व नियमांचे पालन करून लसीकरण करण्यात आलं.
रायगड - गाडीतून रिव्हॉल्वर दाखवणारे तिघे गाडीसह पोलिसांच्या ताब्यात,
दोन रिव्हॉल्वरपैकी एक रिव्हॉल्वर बनावट तर दुसऱ्याची चौकशी सुरू,
तिघांपैकी कोणीही शिवसैनिक नसल्याचा मंत्री शंभुराजेंचा खुलासा ,
आरोप करणाऱ्या राजकीय लोकांनी चुकीच्या पद्धतीने आरोप केल्याच मत
सक्तीने वीज कनेक्शन तोडणार असाल तर आम्हालाही आता दोन हात करावे लागतील. कनेक्शन तोडण्याची किंमत जनतेच्या प्रतिक्रियेतून तुम्हाला कळतीलच. राजू शेट्टी यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा.
पेटलेल्या ऊसाचा फड विझवताना शेतकऱ्याचा होरपळून जागीच मृत्यू. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील केखले इथली घटना. माणिक शामराव शिंगटे, असं होरपळून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव.
चंद्रपूर : हेल्मेटसक्तीवरून जिल्हाधिकारी विरुद्ध कर्मचारी, 1 फेब्रुवारी पासून जिल्ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे हेल्मेटसक्ती, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशावर सरकारी कर्मचारी नाराज, केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना सक्ती करून काय साध्य होईल? विचारला सवाल, सक्तीच्या अंमलबाजावणी आदेशाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सायंकाळी शनी मंदिरात येऊन शनी अभिषेक केला व दर्शन घेतले त्यांच्या समवेत डॉक्टर तात्याराव लहाने होते . नेवासा येथे हरिनाम सप्ताह मध्ये भेट देण्यासाठी आले असताना त्यांनी दर्शन घेतले
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगावमध्ये सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साष्ट पिंपळगावात मागच्या अकरा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे.. मात्र सरकारनं याची दखल घेतली नाही म्हणून यातल्या चार जणांनी मागच्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केलं होतं.. त्यात चौघांचीही तब्येत खालवली होती. आज राज्यभरातील मराठा समन्वयकाची बैठक या ठिकाणी घेण्यात आली.. त्याला राज्यभरातून दोनशेपेक्षा जास्त जास्त समन्वयकांनी हजेरी लावली होती.. याच बैठकीत उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडवावं मात्र मराठा आरक्षणाचा लढा असाच सुरु राहावा.. यावर एकमत झालं.. यासाठी राज्यभर वेगवेगळी आंदोलन पुढील काळात करण्यात येणार असून त्यानंतर या चारही उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेत उपोषण सोडलं..
किल्ले रायगडावर होणाऱ्या प्री वेडिंग फोटोशूटला शिवसेनेचा विरोध, शिवसेना आमदार भरत गोगावले यांचा इशारा, पुरातत्व विभागाने कारवाई करण्याची मागणी
पुण्यात आज गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 31 डिसेंबरला ही परिषद घेण्यास परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांनी 30 जानेवारीला ही परिषद घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिषदेच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. साध्या वेशातील पोलिसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेली एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या एल्गार परिषदेसाठी मोठी खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवर शिवसेना पक्षाचा स्टिकर असलेल्या गाडीतून बंदूक दाखवत गाडी चालक रोडवरून दहशत माजवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओ बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. हे सांगताना त्यांनी शिवसेना दहशत माजवत नसल्याचे सांगून लवकरच अहवाल प्राप्त होईल असेही सांगितले.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या गुरुकुलम संस्थेला पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जप्तीची नोटीस, थकवलेला १ कोटी ८६ लाख रुपयांचा कर भरा अन्यथा संस्थेवर जप्तीची कारवाई करु, महापालिकेची नोटी
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात. केंद्राने राज्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून फ्रंटलाइन कामगारांच्या कोव्हीड लसीकरण करण्यास सांगितले आहे.
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या सेटिंगच्या राजकारणातून उदयास आलेल्या संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रथम स्वत:चे राजकारणाचे एकदा अवलोकन करावे मग शिवसेनेवर आरोप करावेत. कारण लातूरच्या राजकारणात संभाजी पाटील निलंगेकर आणि पालकमंत्री अमित देशमुख यांची सेटिंग आहे, असा दावा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्रीपाद कुलकर्णी यांनी केला आहे. माजी पालकमंत्री आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या फिक्सिंगमुळे लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत. अमित देशमुख यांनी संभाजी पाटील यांनाच थेट यावर विचारतो असे सांगितले होते त्यावर संभाजी पाटील यांनी थेट प्रश्न आला तर थेटच उत्तर देऊ, असे प्रतिआव्हान दिले होते. त्यातच आता शिवसेनेचे माजी जिल्ह्याप्रमुख आणि शिवसेनेचे दोन वेळा विधानसभेचे उमेदवार असलेल्या श्रीपाद कुलकर्णी यांनी संभाजी पाटील यांचा उदय विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय सेटिंगमधून झाला. त्यानंतर त्यांनी अमित देशमुख यांच्याशी सेटिंग केली आहे. जिल्ह्यात दोनच परिवाराची सत्ता असावी असे हे राजकारण आहे, असा दावा केला आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर भर्ती करण्याची मंत्र्यांची चढाओढ सुरु आहे. जालन्यात अख्खं गाव उपोषणाला बसलेले आहे. त्याची दखल घेतली जात नाही. पालकमंत्री राजेश टोपे यांनीही घेतली नाही. यांना सत्तेचा माज चढला आहे. हे सरकार मुर्दाड निर्लज्ज आहे. ज्या मंत्र्यांनी नोकरभरती घेतली त्या मंत्र्यांच्या गावात जाऊन शिवसंग्रामने एल्गार पुकारला आहे. येत्या 7 फेब्रुवारीला एल्गार मेळावा आयोजित केला आहे. त्यानंतर नांदेड , बारामती, मुंबईही एल्गार पुकारणार आहे.
दिल्लीमधील बॉम्बस्फोटानंतर मुंबईत ज्या ज्या ठिकाणी इस्रायली बांधव राहतात तिथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कुलाब्यातील नरिमन हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणत ज्यू नागरिक राहतात. याच ठिकाणी 26/11 चा दहशतवादी हल्ला देखील झाला होता. त्यानंतर या विभागात पोलीस सुरक्षा असतेच मात्र दिल्लीतील स्फोटानंतर सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. या ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर पोलिसांची विशेष तुकडी दाखल,
दिल्ली इथल्या इस्रायली दूतावासाच्या समोर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात
सांगली -
वारणानगर येथील राज्यभर गाजलेल्या नऊ कोटी रुपयाच्या चोरी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्लाची सांगलीतील गणेश नगर भागात हत्या,
मुल्ला जामिनावर बाहेर पडला होता, काही वेळापूर्वी त्याचा पाठलाग करून केली हत्या,
काही वर्षांपूर्वी सांगलीतील बेथलेमनगर भागात मुल्लाकडून 9 कोटी पोलिसांनी केले होते जप्त
अमरावती - परतवाडा महामार्गावर भीषण अपघातात दोन तरुणांचा जळून मृत्यू...
आसेगाव जवळील गायत्री मंगल कार्यालयाजवळ झाला अपघात...
तळणी पूर्णा येथील दोन युवक आसेगाववरून फवारणीसाठी पेट्रोल घेऊन आपल्या गावी जात असतांना बोलेरो गाडीने अचानक धडक दिल्याने मोठी आग...
आज सायंकाळी 6.30 वाजताची घटना...
: राज्यात आज 539 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 539 (74 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वाधिक लसीकरण बीड जिल्ह्यात (131 टक्के) झाले असून त्या पाठोपाठ सातारा, धुळे, वर्धा, पालघर या जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 2 लाख 61 हजार 319 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.
रायगड : सेल्फी काढताना खाडीच्या पाण्यात पडलेल्या तरुणीला वाचविण्यात यश. पाण्याच्या प्रवाहात वाहत आलेल्या 23 वर्षीय प्राची रावजी हिला वाचविण्यात यश. अलिबाग तालुक्यातील साळाव येथील घटना. पाण्याच्या प्रवाहात वाहत असलेल्या तरुणीला मच्छीमारांच्या मदतीने वाचविण्यात यश. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रायगड-
सेल्फी काढताना खाडीच्या पाण्यात पडलेल्या तरुणीला वाचविण्यात यश, पाण्याच्या प्रवाहात वाहत आलेल्या 23 वर्षीय प्राची रावजी हिला वाचविण्यात यश,
अलिबाग तालुक्यातील साळाव येथील घटना, गुरुवार सायंकाळची घटना,
पाण्याच्या प्रवाहात वाहत असलेल्या तरुणीला मच्छीमारांच्या मदतीने वाचविण्यात यश,
स्थानिक पोलीसांच्या मदतीने तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले,
कुर्डूवाडी शहरातील, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक-डॉक्टर संतोष अडगळे यांना लाचलुचपत प्रतिबंध सोलापूर विभागाने नऊ हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. महिलेच्या सिझर प्रसुतीसाठी डॉक्टर अडगळे यांनी दहा हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती नऊ हजार रूपये आज सकाळी साडेअकरा वाजता दवाखान्यात स्विकारत असताना ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध सोलापूर विभागाने केली. सदरील आरोपीस एसीबी पोलिस निरिक्षक कविता मुसळे, उपनिरिक्षक-जगदीश भोपळे यांच्यासह पथकाने अटक करून कारवाई केली आहे.
लातूर शहरातील गंज गोलाई भागातील शिवाजी रोडवर गोयल यांचे रंगाचे दुकान आहे. या दुकानाला संध्याकाळच्या सुमारास आग लागली. काही वेळातच ही आग इमारतीतील चारही मजल्यावर पसरली. या ठिकाणी रंगाचे साहित्य होते यामुळे आगीने रुद्र रूप घेतले आहे. अग्निशमन दलाच्या जिल्ह्यातील सर्व गाड्या याठिकाणी आल्या आहेत. उस्मानाबाद आणि सोलापूर येथून ही अग्निशमन दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या आहेत. हा भागा खूप चिंचोळा असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या येथे चारी बाजूने काम करू शकत नाहीत. मनपा,पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या अनेक कर्मचारी या ठिकाणी हजर झाले आहेत. आग लवकर आटोक्यात येईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही
यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला, जखमी तरुणीला काकाने 500 मीटर अंतरावरून शेतातून खांद्यावर उचलून आणलं, तरुणी घाटंजीच्या रुग्णालयात दाखल.
जखमी तरुणीच्या पोटात चाकू , आरोपी पोलिसांच्या ताब्यात घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील घटना
बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत...यामध्ये रणजित बनसोडे, सीता भैय्यासाहेब मोरे ,गणेश तांदळे आणि प्रभाकर पोकळे यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे...
"कर्नाटकमधील आमचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे, त्याचा आम्ही निषेध करतो", चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य,
मोदी-शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार, कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाही,
मराठी भाषिक 842 गावं हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रात आलेच पाहिजे,
मात्र वस्तुस्थिती ही आहे की हा प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात,
मराठा आरक्षणावरुन समाजाची दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे,
चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारवर निशाणा तर कर्नाटकातील भाजप नेत्यांवर देखील टीकास्त्र
नागपूर
वंजारी नगर उड्डाणपुलावर कार ने स्टंटबाजी करणाऱ्या चार ही वाहन चालकांना आता परिवहन विभागाकडून (RTO) त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याची नोटीस...
एबीपी माझाच्या बातमी नंतर पोलिसांनी तर या स्टंटबाज वाहन चालकांवर कारवाई केलीच होती.. आता परिवहन विभागाने ही प्रकरणात लक्ष घालत ठोस कारवाई सुरू केली आहे...
तुम्ही रॅश ड्राइविंग केल्यामुळे तुमचे वाहन परवाने का रद्द केले जाऊ नये अशी नोटीस...
त्यामुळे 26 जानेवारीला स्टंटबाजी करत इतर सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घालणारे स्टंटबाज आता स्वतः गोत्यात आले आहेत...
नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 26 मार्चपासून हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित करण्यात येत असून लोकहितवादी मंडळ, नाशिक यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रण दिले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटल्यानुसार, आजच्या घ़डीला देशातील खाद्यान्न उपलब्धता विक्रमी स्थानावर आहे. 2008-09 मध्ये जिथं देशात 234 मिनियन टन खाद्यान्नाचं उत्पादन घेण्यात आलं होतं, तिथेच 2019-20 मध्ये हे प्रमाण वाढून 296 मिलियन टनवर पोहोचलं आहे.
यंदाचं अधिवेशन फार महत्त्वाचं. केंद्र सरकारच्या निर्णयांचं राष्ट्रपतींकडून स्वागत. कोरोनाकाळात गरिब उपाशी राहिले नाहीत ही बाब अधोरेखित करत देशाच्या आत्मनिर्भरतेचं राष्ट्रपतींकडून कौतुक
रिलायन्स समूह आणि फ्यूचर रिटेल ग्रुपमध्ये झालेल्या कराराला आक्षेप घेत अॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने अॅमेझॉनविरोधात FEMA आणि FDI च्या कायद्यासंदर्भात टिप्पणी केली होती. त्याचा आधार घेत आणि वाणिज्य मंत्रालयाच्या निर्देशानंतर आता ईडीने अॅमेझॉनविरोधात FEMA आणि FDI कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
दशकातील पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात होत आहे. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी देशापुढं आली आहे, असं पंतप्रधान मोदी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी देशाला संबोधताना म्हणाले.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते उद्या दिल्ली दरबारी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदल आणि शेतकरी आंदोलनाबाबत चर्चेची शक्यता
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2020-21 सालचा देशाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करतील. त्यामाध्यमातून देशाची अर्थव्यवस्था नेमकी कशी आहे याची माहिती मिळणार आहे.
50 वर्षीय आरोपी पोक्सोतून दोषमुक्त, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. लहान मुलीचा हात पकडणं, पँटची चेन उघडणं म्हणजे लैंगिक शोषण नाही- मुंबई हायकोर्ट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील खेड तालुक्याच्या चिंबळी इथल्या खाजगी पेट्रोल पंपांचं उद्घाटन झालं. यावेळी अजित पवार म्हणाले की, "दिवसेंदिवस डिझेल-पेट्रोलचे दर वाढत आहेत. आता दर शंभरी पार गेले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. काल नितीन गडकरी यांनी 15 वर्षात वाहन स्क्रॅप होणार अस जाहीर केलं, म्हणजे आता हे नियमही लक्षात ठेवा. माझेही पंप आहेत. ते मी चालवायला दिले. कारण तिथं जर भेसळ झाली तर लोक म्हणायचे अजित पवार पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करतो. सीसीटीव्ही लावून पंपांवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे भेसळीचे प्रमाण कमी झालं आहे. पण काही ठिकाणी चिप बसवून पेट्रोल-डिझेल कमी दिलं जातं. अशा प्रकारची लूट ज्या पंपांवर होते ते लोकांच्या लक्षात आलं तर त्या पंपाकडे कोणी फिरकत नाही. इथं असं काही घडणार नाही, असा विश्वास आहे."
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील खेड तालुक्याच्या चिंबळी इथल्या खाजगी पेट्रोल पंपांचं उद्घाटन झालं. यावेळी अजित पवार म्हणाले की, "दिवसेंदिवस डिझेल-पेट्रोलचे दर वाढत आहेत. आता दर शंभरी पार गेले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. काल नितीन गडकरी यांनी 15 वर्षात वाहन स्क्रॅप होणार अस जाहीर केलं, म्हणजे आता हे नियमही लक्षात ठेवा. माझेही पंप आहेत. ते मी चालवायला दिले. कारण तिथं जर भेसळ झाली तर लोक म्हणायचे अजित पवार पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करतो. सीसीटीव्ही लावून पंपांवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे भेसळीचे प्रमाण कमी झालं आहे. पण काही ठिकाणी चिप बसवून पेट्रोल-डिझेल कमी दिलं जातं. अशा प्रकारची लूट ज्या पंपांवर होते ते लोकांच्या लक्षात आलं तर त्या पंपाकडे कोणी फिरकत नाही. इथं असं काही घडणार नाही, असा विश्वास आहे."
केंद्रीय कृषीराज्यमंत्री चौधरी आणि फडणवीस आज अण्णा हजारेंची भेट घेणार. अण्णांच्या मनधरणीसाठी भाजप नेते राळेगणसिद्धीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अण्णांच्या आमरण उपोषणापूर्वी ते रोखण्यासाठी भाजप प्रयत्नशील
आरएलडी, आम आदमी पक्षाचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा. आंदोलनाला राजकीय वळण. दर दिवशी नव्या घडामोडी.
दिवसेंदिवस डिझेल-पेट्रोलचे दर वाढतायेत. आता शंभरी पार दर गेले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. काल नितीन गडकरी यांनी 15 वर्षात वाहन स्क्रॅप होणार अस जाहीर केलं, म्हणजे आता हे नियम ही लक्षात ठेवा. माझे ही पंप आहेत. ते मी चालवायला दिले. कारण तिथं जर भेसळ झाली तर लोक म्हणायचे अजित पवार पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करतो. सीसीटीव्ही लाऊन पंपांवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे भेसळीचे प्रमाण कमी झालंय. पण काही ठिकाणी चिप बसवून पेट्रोल-डिझेल कमी दिलं जातं. अशा प्रकारची लूट ज्या पंपांवर होते ते लोकांच्या लक्षात आलं तर त्या पंपाकडे कोणी फिरकत नाही. इथं असं काही घडणार नाही, असा विश्वास आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार खेड तालुक्याच्या चिंबळी येथील खाजगी पेट्रोल पंप उद्घाटन प्रसंगी म्हणाले.
औरंगाबादमध्ये भंगाराच्या व्यवसायातून गोळीबार, बुढीलाईन भागातील मध्यरात्रीची घटना, अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार असं गोळी लागलेल्या तरुणाचं नाव, तर गोळीबार करणारा आरोपी फरार
गाझीपूर सीमेवर रात्रभर नाट्यमय घडामोडी घडल्या. रस्ता मोकळा करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारं प्रशासन अचानक नरमलं. शेतकरी पुन्हा आंदोलनस्थळाकडे जात आहेत.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल. परंतु शिवसेनेसह 16 पक्षांनी राष्ट्रपतींच्या भाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "शिवसेनेसह 16 राजकीय पक्षांनी 29 जानेवारी रोजी संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या भाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी कायद्यांच्याविरोधात हा निर्णय घेतला आहे. जय जवान, जय किसान."
जालन्यातील साष्ट-पिंपळगाव इथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन सुरु आहे. परंतु आंदोलक बाबासाहेब वैद्य यांची प्रकृती खालावली असून बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुगणलायत हलवण्यात आलं आहे. पहाटे त्रास सुरु झाल्याने गावकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. गेल्या तीन दिवसापासून जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव इथे चार आंदोलकांचे आमरण उपोषण सुरु आहे.
येवला तालुक्यातील कातरणी गावाची ग्रामपंचायत निवडणूक रद्द, सदस्य पदासाठी लिलाव करुन बिनविरोध निवडणूक केल्याच निष्पन्न, राज्य निवडणूक आयोगाला पुरावे प्राप्त झाल्याने कारवाई, 11 जागांसाठी लिलाव झल्याच्या तक्रारीनुसार कारवाई, 15 जानेवारी राज्यात सर्वत्र मतदान झाले होते मात्र कातरणीचा निकाल जाहीर करण्यास आयोगाने दिला होता नकार, चौकशीअंती निवडणूक रद्द करण्याचा निर्णय, दोषींवर कारवाई करुन नव्याने होणार निवडणूक, उमराणे, खोंडामळीनंतर कातरणीची निवडणूक रद्द
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा आरोप करत किरीट सोमय्या केंद्रीय निवडणूक आयोगात,
आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे सोमय्यांनी अठरा कागदपत्र साडेतीनशे पानांची सुपूर्द केले,
लवकरच ह्या बाबतीत निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागू शकतो असा किरीट सोमय्या यांचा दावा,
प्रकरण सिद्ध झाले तर केवळ आमदारकीच जाणार नाही तर अफरातफरीचा सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल सोमय्या यांचा एबीपी माझा वर स्फोटक आरोप,
भाई ठाकूर यांच्या प्रकरणाचा संबंध संजय राऊत यांच्याशीही,
संजय राऊत आणखी एका माध्यमातून पीएमसी घोटाळ्याशी जोडल्याचा सोमय्यांचा आरोप,
अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे दिला जाणारा ‘कोविड वुमेन वारिअर्स द रिअल हीरो’ हा पुरस्कार जाहीर...
कोंबडी आणि चिकनचे दर निश्चित करण्याचे पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न सुरू,
बर्ड फ्ल्यूची भीती दाखवून शेतकऱ्यांकडून कमी दरात पक्षी घेण्याचे प्रकार,
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि गोंधळाचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न,
शेतकऱ्यांना भीती घालून व्यापारी वृत्ती नफा मिळवत असल्याचे समोर,
पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांची माहिती
कोंबडी आणि चिकनचे दर निश्चित करण्याचे पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न सुरू
,
बर्ड फ्ल्यूची भीती दाखवून शेतकऱ्यांकडून कमी दरात पक्षी घेण्याचे प्रकार
,
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि गोंधळाचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न
,
शेतकऱ्यांना भीती घालून व्यापारी वृत्ती नफा मिळवत असल्याचे समोर
,
पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांची माहिती
चतुर्थी श्रेणी कर्मचारी यांनी उद्या संप पुकारला,
वेतन आयोग तसंच कंत्राटीकरण विरोधात संप पुकारला असून शासकीय कार्यालय काम बंद राहणार,
शासकीय कर्मचारी संप धर्तीवर शासनाने शासकीय आदेश काढत संपात कर्मचारी सहभाग घेवू नये असे सामान्य प्रशासन विभागानं म्हटले,
जे कर्मचारी संपात सहभाग घेतील त्यावर कारवाई संकेत ही दिले,
उद्या मंत्रालय तसंच इतर शासकीय विभाग प्रमुख यांनी संप पुकारलेलं कर्मचारी हजर राहतात का नाही याची माहिती दुपारी 12 वाजेपर्यंत प्रशासनास कळवावी असे आदेश दिले.
राज्यात आज 538 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 187 (73 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वाधिक लसीकरण धुळे जिल्ह्यात (111 टक्के) झाले असून त्या पाठोपाठ बीड, पालघर, नांदेड, सिंधुदूर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 2 लाख 19 हजार 696 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील कातरणी (ता. येवला) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत राबविण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
नाशिक महापालिका मधील सत्ताधारी भाजपाला उच्च न्यायालयाचा दणका,
स्थायी समितीचा भाजपाचा 9 सदस्यांचा ठराव केला रद्द,
भाजपची सदस्य संख्या एक ने होणार कमी शिवसेनेची सदस्य संख्या एका अंकाने वाढणार,
सदस्य निवड प्रक्रिया पुन्हा राबिबण्याचे आदेश ,
भाजप विरोधात शिवसेनेन उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका
,
तौलनिक संख्येनुसार शिबसनेवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती
,
भाजप 9 , शिवसेना 4, काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसे प्रत्येकी 1 असे होते संख्याबळ
,आता भाजप 8 शिवसेना 5 होणार
,येणाऱ्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत मनसेची भूमिका ठरणार निर्णायक
, मनपाची आर्थिक तिजोरीच्या चावीसाठी होणार शिवसेना भाजपात होणार रस्सीखेच
कांदिवली चारकोपच्या मेट्रो कार शेडमध्ये अखेर मेट्रो ट्रेनचा पहिला कोच पोहोचला,
23 तारखेला बेंगलोरहुन निघालेले तीन कंटेनर अखेर मुंबईत पोहोचले,
मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 मार्गावर वर धावणाऱ्या तीन मेट्रो ट्रेन कंटेनरच्या साहाय्याने कांदिवली चारकोप मेट्रो कारशेडमध्ये आणण्यात आली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पुण्यात सुरवात झालीय. स्टेजवर मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणि कार्यवाह अशोक पायगुडे आहेत तर समोर साहित्य परिषदेचे सभासद उपस्थित आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारीमंडळ तीन वर्षांसाठी निवडणुकीद्वारे निवडण्यात येते. सध्याच्या कार्यकारी मंडळाची तीन वर्षांची मुदत यावर्षी संपत असल्याने येत्या मार्च महिन्यात साहित्य परिषदेची निवडणूक होणं अपेक्षित होते. मात्र कोरोनाच कारण देत या कार्यकारी मंडळाने निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला. एवढच नाही तर पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी ठराव केलाय. कार्यकारी मंडळाच्या या वादग्रस्त ठरावाला साहित्य परिषदेच्या अनेक सदस्यांनी तीव्र विरोध केलाय. हा ठराव मंजुरीसाठी मसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधे आहे.
केवळ राज्य प्रमुख या नात्याने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत वक्तव्य केलं असून त्याला कोणताही आधार नसल्याच मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. हा वाद अनेक वर्षाचा असल्याचं सांगत त्यानी महाजन समितीच्या अहवालाचे स्मरण करुन दिलं. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर होते, तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले
उद्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांचा बहिष्कार,संयुक्त निवेदन जारी करत विरोधी पक्षांनी जाहीर केली भूमिका..काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीसह एकूण 16 पक्षांचा एकत्रितपणे बहिष्कार
काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीसह एकूण 16 पक्ष एकत्रितपणे उद्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणार आहे. या संदर्भात संयुक्त निवेदन जारी करत विरोधी पक्षांनी भूमिका जाहीर केली आहे.
आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे असं मी वेळोवेळी बोललो आहे. मराठा समाजाबाबत भेदभाव करणं लोकप्रतिनिधींना शोभत नाही. सगळ्या मतदार संघात मराठा समाज आहे ना? मग त्यांना न्याय दिला तर आमच्यावर अन्याय का? आम्हाला कुणाच्या ताटातील काही नको. मराठा समाजातील मुलांना जास्त मार्क मिळाले असतील आणि त्यापेक्षा कमी मार्क मिळलेल्या मुलांना संधी मिळत असतील तर हा अन्याय नाही का? निवडणुका आणि सत्ता दर पाच वर्षाला येत असतात. तुमच्या हक्कासाठी जे पाठीशी राहतात त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. सुप्रीम कोर्टात वकील वेळेवर हजर राहत नाहीत, हे जाणीवपूर्वक करतात असं वाटतं. राजकारण्यांनो लोकांचा उद्रेक झाला तर तो थांबणार नाही. आज पुढची पिढी आपल्याकडे आशेनं बघतेय, याचा विचार केला पाहिजे. कुठेतरी राजकारण थांबवून समाजासाठी जनाची नाही तर मनाची लाज राखली पाहिजे. उद्या तुमच्या घरातील मुलं देखील तुम्हाला विचारतील की मराठा समाजासाठी हे का नाही केलं, असं उदयनराजे म्हणाले
आठ तासांनंतर देखील अग्नीतांडव सुरुच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यास शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. भिवंडीच्या सरवली एमआयडीसीतील कपिल रेयॉन कंपनीला लागलेल्या भीषण आगीचं तांडव मागील आठ तासांपासून सुरुच आहे. या आगीत कोट्यवधी रुपयांच्या कपडा जळून खाक झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यास शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान याचाच आढावा घेतला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी 120 टक्के पर्जन्यमान झाले आहे. मात्र एवढा पाऊस पडूनसुद्धा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 1420 गावापैकी 687 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई घोषित करीत या गावांसाठी 958 उपाययोजना मंजूर केल्या आहेत. त्यासाठी 16 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने तो निधीसुद्धा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मागील वर्षातील पाण्याच्या उपाययोजना या पूर्णपणे कार्यान्वित न केल्याने या वर्षी पुन्हा त्यावर खर्च होणार असल्याचं स्पष्ट आहे.
बुलढाणा : शेगाव येथे शेतकरी क्रांति संघटने कडून पेट्रोल , डिझेल भाववाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला , रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना थांबवून वाहनधारकाना दोन थेम्ब पेट्रोल व दोन थेम्ब डिझेल मोफत देण्यात आल. शेतकरयांची सर्व काम हे यांत्रिक पद्धतीने केल्या जात असल्याने त्यासाठी पेट्रोल डिझेल ची आवश्यकता असते आणि सरकारने त्यावर भरघोस कर लावल्याने आता ईंधन शेतकरयांच्या अवाक्या बाहेर गेले आहे त्यामुळे शेती करने अवघड झालय म्हणून केंद्र सरकारचा असा मोफत पेट्रोल डिझेल वाटप करून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं वक्तव्य केल्यानंतर त्याबद्दल कर्नाटकात प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. महाजन अहवाल अंतिम आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असला तरी त्याचा निकाल आमच्या बाजूने लागणार याची खात्री आहे.आम्ही पूर्वीपासून मुंबई कर्नाटकात आहे. त्यामुळे मुंबईवर आमचा हक्क आहे. मुंबई कर्नाटकात यायला पाहिजे. मुंबईचा कर्नाटकात समावेश होत नाही, तोपर्यंत मुंबई केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केल्यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची चिन्हं दिसत आहेत.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष सोडण्यावर शिक्का मोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.
गोपळाराव पाटील कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंदगडमधील मोठा गट असलेल्या गोपाळ पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून पक्ष प्रवेशावेळी दिलेला शब्द पाळला जात नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. पक्षाकडून सन्मानही मिळत नसल्याने पाटील यांच्यासह गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील भिराड भीरडी गावातील एकाच कुटुंबातील चार जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.बुधवारी रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. सातप्पा सुतार (६०),महादेवी सुतार (५०),संतोष सुतार (२६) आणि दत्तात्रय सुतार (२८) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. वडिलांनी घेतलेले कर्ज फेडता आले नसल्याने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रात्री आत्महत्या केलेली घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.मृतदेह पाहिलेल्या लोकांनी सकाळी पोलिसांना याची माहिती दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासला सुरुवात केली.
गच्चीवर वाळत घातलेल्या कपड्यांचा गळफास लागून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, रत्नागिरी शहरातील माळनाका येथील घटना, टेरेसवर खेळताना बुधवारी रात्रीची घटना, कनिका चुनेकर असं मृत मुलीचं नाव
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवीची आज यात्रा आहे. दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात देवीची यात्रा पार पडत असते, यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. असं असलं तरी मांढरदेवी गडावरील देवीच्या मंदिराला खूप सुंदर पध्दतीनं सजवण्यात आलं आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवीची आज यात्रा आहे. दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात देवीची यात्रा पार पडत असते, यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. असं असलं तरी मांढरदेवी गडावरील देवीच्या मंदिराला खूप सुंदर पध्दतीनं सजवण्यात आलं आहे.
भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरु झाले असून सरवली एमआयडीसी परीसरातील कपिल रेयॉन इंडिया प्रा लि या डाईंग कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनीच्या दोन मजली इमारतीमध्ये सगळीकडे आग पसरली आहे. या कंपनीत कच्च्या कपड्याचा आणि पक्क्या कपड्याचा मोठ्या प्रमाणावर साठा तसेच धागा होता. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कल्याण, ठाणे आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांची मदत मागण्यात आली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. रात्री उशिराच्या सुमारास या कंपनीत आग लागली. त्यावेळी या कंपनीत असलेले 30 ते 40 कामगार वेळेत बाहेर पडल्याने त्यांचा जीव बचावला. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे अडचण निर्माण होत आहे. तसेच दोन्ही मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कंपनी जळून खाक झाली आहे. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान या ठिकाणी झाले आहे.
शेतकरी आंदोलनात फूट; राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेची आंदोलनातून माघार, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर गंभीर टीका करत शेतकरी नेते व्ही. एम. सिंग यांची घोषणा
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पट्ट्यातील वाठोडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वग्रीपाडा गावात गेल्या चार दिवसांपूर्वी घरगुती पाळल्या जाणाऱ्या अनेक कोंबड्या मृत झाल्याने त्यांचे नमुने तपासणीनंतर त्यांना बर्डफ्लूची लागण झाल्याच जिल्हाधिकारी यांनी काल जाहीर केले होते. तर या भागातील 1 किमीचा परिसर प्रतिबंधित घोषित केला होता. आज सकाळपासून आमदार दिलीप बोरसे तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या पाड्यावरील घरातील सर्व ठिकाणच्या कोंबड्या जमा करत त्यांचे पंचनामे केले आहेत. नंतर जवळपास 300 पेक्षा जास्त कोंबड्यांचे किलींग करण्यात आले आहे. त्यानंतर योग्य ती काळजी घेत त्या मृत कोंबड्या खड्ड्यात पुरण्यायाचे काम संध्याकाळी पूर्ण झाले.
दिल्लीमध्ये नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातल्या सिंचन प्रकल्पांना संदर्भात महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र शेखावत, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पोहोचले आहे. थोड्याच वेळात जयंत पाटील, प्रकाश जावडेकर देखील याठिकाणी येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आसोली-वडखोल गावात 500 एकर क्षेत्रावर आग लागून आंबा, काजूच्या कलमांच नुकसान झाल आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आंबा, काजूच्या बागेत लागलेली आग ग्रामस्थांनी आटोक्यात आणली असून सध्या आंबा, काजूच्या बागेत वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याने ग्रामस्थानी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.
रेल्वे आणि समाजकल्याण विभागाचे पाणी कनेक्शन कोल्हापूर महापालिकेने तोडले, कोट्यवधी रुपयांचे पाणी बिल थकवल्याप्रकरणी कारवाई
,
थकीत पाणी बिल प्रश्नी शासकीय कार्यालयावर सुद्धा पालिकेची कारवाई सुरू
भिवंडी : दिल्लीlच्या सीमेवर तब्बल दोन महिन्यांपासून अंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंदोलनावर गोळीबार करण्यात आल्यानं त्यांचे तीव्र पडसाद देशभरातून उमटत असून भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कल्याण नाका येथील स्व.राजीव गांधी चौक या ठिकाणी मोदी सरकार विरोधात काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. या अंदोलनात पदाधिकारी सहभागी झाले होते.
कपडे न काढता शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची चौकशी आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी क्राईम ब्रॅन्चची एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 22 एफआयआर दाखल केले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने हे प्रकरण आता गंभीर बनलं आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
दिल्ली शेतकरी ट्रॅक्टर परेड हिंसाचाराची चौकशी दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच टीम करणार. चौकशीसाठी एसआयटी स्थापन करणार.
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, दिल्लीतील वकील अॅडव्होकेट विशाल तिवारी यांच्यावतीने कोर्टात याचिका, तीन निवृत्त न्यायमूर्तींच्या आयोगामार्फत चौकशी करण्याची मागणी
राजकीय सुडापोटी अराजकता पसरवू नका. माथी भ़डकवण्याचं काम पवार साहेबांकडून अपेक्षित नाही. शेतकरी ट्रॅक्टर परेड हिंसाचारप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी डागली तोफ. पोलिसांनी दोषींना पकडून कारवाई करून माथेफिरुंना भडकवणाऱ्यांवरही कारवाई करावी.
रोज वचवच करणारे संजय राऊत आज देशातील पोलीसांच्या बाजूने का बोलले नाहीत. जवान आणि पोलिसांच्या बाजुनं शरद पवार यांची सोशल मीडिया पोस्ट का आली नाही, आशिष शेलार यांचा सवाल. दिल्ली हिंसाचार प्रकरणी भाजप आक्रमक. महाविकासआघाडीवर निशाणा.
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुर आहे. त्यावेळी मेंटेनन्स करणाऱ्या मशीनमध्ये बिघाड झाल्याने ट्रक खाली टाकण्यात येणारे स्लीपर्स अंगावर पडून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात घडल्यानंतर बदलापूर ते मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पहाटे दोन ते पाच वाजेच्या दरम्यान हे काम सुरु होते. रात्री तीन वाजता हा प्रकार घडला. ट्रॅकवर अडकून पडलेले मशीन हटवण्यासाठी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने प्रयत्न केले. मात्र सकाळी सात वाजेपर्यंत मशीन हटविण्यात अपयश आले होते. आता क्रेनच्या साहाय्याने मशीन हलवण्याचे काम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरु केले आहे. दरम्यान हा अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला याबाबत रेल्वेचे अधिकारी चौकशी करीत आहेत.
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत असणारे धवलसिंह यांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या सोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे काम केले होते, पण राष्ट्रवादीत दुर्लक्षित राहिल्यानं उद्या मुंबईत काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस पक्षात ते प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. ही माहिती स्वतः डॉ. धवलसिंह पाटील यांनी दिली आहे.
आशिया बुक ऑफ रेकार्ड करण्यासाठी सृष्टी जगताप या 15 वर्षीय मुलीने तब्बल 24 तास लावणी नृत्य सादर करण्याचा प्रयोग केला आहे. 26 जानेवारीला साडेचार वाजता हा कार्यक्रम सुरु झाला. लातूर येथील दयानंद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लातूरकर यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. सृष्टीला पाठींबा देण्यासाठी स्त्रिया आणि मुली या कार्यक्रमाला हजर आहेत. रात्री ही मोठ्या प्रमाणात रसिक हजर होते. मराठमोळ्या लावणी या नृत्य प्रकारस जगमान्यता मिळावी हा उददेश समोर ठेवून हा धाडसी निर्णय सृष्टीने घेतला आहे.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे प्रवेशद्वार बंद, या स्टेशनमध्ये केवळ बाहेर जाण्याची परवानगी, इतर स्थानकं खुली, सर्व मार्गांवरील सेवा सुरळीत, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची माहिती
देखभालीच्या कामादरम्यान टीआरटी ट्रॅक मशीनमध्ये बिघाड झाल्याने अंबरनाथ-बदलापूर डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद, दुरुस्तीचं काम सुरु, सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कर्जत ते बदलापूरदरम्यान सेवा सुरु, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (मुंबई) शिवाजी सुतार यांची माहिती
सोलापूर : हिसंक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. वाळूज ता. मोहोळ येथील खरात वस्तीवर मंगळवारी पाच वाजण्याच्या सुमारास घटना घडली. मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अनिकेत अमोल खरात असे हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मुलाचा मृत्यू नेमक्या कोणत्या वनप्राण्यांच्या हल्ल्यात अद्यापही स्पष्ट नाही. वाळूज परिसरातील शेतकरी व नागरिकांत या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
केंद्राच्या शेतकरी कायद्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ 'नौटंकी' आणि 'तमाशा' असल्याची बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलीये. ते अकोला येथे बोलत होतेय. केंद्राच्या सध्याच्या शेतकरी कायद्याची मुळं काँग्रेसनं 2006 मध्ये आणलेल्या 'करार शेती कायद्या'त असल्याचं असल्याचे मत आंबेडकरांनी व्यक्त केलीय. त्यामुळे आजच्या परिस्थितीला भाजप-संघापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच अधिक जबाबदार असल्याचा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावलाय. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी ही संघ-भाजपची 'बी टीम' तर नाही ना असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलाय.
विजय वडेट्टीवार यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल..
दिलीप पाटील,सचिन तोडकर यांच्यासह 20 जणांवर गुन्हे दाखल..
सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करता पुतळा जाळण्यासाठी एकत्र आल्याने गुन्हा दाखल..
पुतळा जाळण्याच्या प्रयत्नात पोलीस आणि आंदोलकांच्यात झाली होती प्रचंड झटापट
आमदार राजेंद्र पाटणी यांची खासदार भावना गवळी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार, आज डीपीडीसी बैठकीच्या आधीच दोघांमध्ये खूप भांडण झालं होतं. भावना गवळी यांनी धमक्या दिल्याचा पाटणी यांचा आरोप, भांडणादरम्यान अंगरक्षाकांना मधे पडावं लागलं
राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदकं जाहीर झाले असून सर्वाधिक पदकं गडचिरोली जिल्ह्याला मिळाली आहेत .महाराष्ट्राला एकूण 13 शौर्य पदकं मिळाली आहेत. 2018 मध्ये माओवादविरोधी कारवाईत कसनासुर बोरीयाच्या चकमकीत 38 माओवादी ठार झाले होते. त्या कारवाईचे नेतृत्व करणारे तत्कालीन माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी (सध्या अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक) तसेच प्राणहीता पोलीस उपमुख्यालयाचे तत्कालीन अतिरिक्त अधीक्षक राजा ( सध्या बीड येथे पोलीस अधीक्षक) या दोन वरिष्ठ पोलीस अधिका-यासह C-60 कमांडो पथकाच्या जवानांना ही शौर्य पदकं जाहीर झाले आहे. याशिवाय एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस हवालदार तसेच पाच पोलीस नाईक आणि 3 पोलीस अमलदार यांचा यात समावेश आहे.
अत्यंत कडेकोट सुरक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले असून ते बाळासाहेब ठाकरे प्राणिसंग्रहालयाच्या उद्घाटनाला जात आहेत. बाळासाहेबांच्या नावाला बराच विरोध इथे होत असल्यामुळे, कडेकोट सुरक्षा. मीडियाला मुख्य कार्यक्रमापासूनच नाही तर विमानतळावर ही दूर करण्यात आले आहे.
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील सुस्तावलेल्या आरोग्य यंत्रणेला वठणीवर आणण्यासाठी धडक कारवाई केलीये. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विनापरवानगी गैरहजर असलेल्या 65 आरोग्य अधिकारी-कर्मचार्यांच्या निलंबनाचे आदेश पालकमंत्री कडू यांनी दिलेय. या कर्मचाऱ्यांमध्ये 10 वैद्यकीय अधिकारी आणि 55 आरोग्य सेवकांचा समावेश आहेय. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या पाहणीत गैरहजरीचे हे प्रकार उघड झाले होतेय. या सर्वांचे 15 दिवसांचे निलंबन आणि एक वेतनवाढ थांबविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेत. काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या उडालेल्या बोजवाऱ्यावर सर्वच लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली होतीय. यानंतर पालकमंत्री बच्चू कडूंनी ही ठोस कारवाई केलीये. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या या धडक कारवाईने जिल्ह्यातील सर्वच खात्यांतील दांडीबहाद्दरांचे धाबे दणाणलेत.
अकोला : शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशनमध्ये राज्यातील दुसरं तर विदर्भातील पहिलं बालस्नेही पोलीस केंद्राचं आज उद्घाटन झालंय. या केंद्रामध्ये लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांशी संबंधीत चौकशी, समुपदेशन केलं जाणारेय. या केंद्रात लहान मुलांची पोलिसांप्रतीची भिती कमी करण्यासाठी भिंती खास पद्धतीने रंगवल्या गेल्या आहेत. येथील पोलीस आणि कर्मचारी पुर्णवेळ साध्या वेशात असतील. तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी पोलीसांना हे केंद्र चालवायला मदत करणार आहेत.
राजू शेट्टी, सावकार मादनाईक यांच्यासह स्वाभिमानीच्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा
माजी खासदार राजू शेट्टी, सावकार मादनाईक यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना ट्रॅक्टर रॅली काढल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कृषी कायद्याला विरोधासाठी काल स्वाभिमानी संघटनेने सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा काढला होता
गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली पुणे दौंड पॅसेंजर सेवा आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांकरिता सुरु झाली. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पॅसेंजरला झेंडा दाखवण्यात आला. दौंडकरांनी दौंड पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी या आधी रेल रोकोचा इशारा ही देण्यात आला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासन नरमले आणि आज दौंड पुणे शटल सेवा सुरु करण्यात आली. दौंड-पुणे डेली पॅसेंजर रोज सकाळी 7.05 मिनीटांनी दौंड रेल्वे स्थानकावरून असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. दौंड पुणे लोहमार्गावर 45 वर्षांपासून सुरु असलेली पॅसेंजर सेवा कोरोनामुळे 10 महिने बंद होती.
राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले अनेक जण परत येण्यास इच्छुक, एकटे शिवेंद्रराजेच नाही तर अनेकांची घरवापसीची इच्छा- नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या अनेक जणांची परत येण्याची इच्छा आहे मात्र सर्व जणांना परत घेणार नाही. यातील काही आमदार काही माजी आमदार यांना राष्ट्रवादीत येत्या काही दिवसांमध्ये घेतलं जाणार आहे. एकटे शिवेंद्रराजेच नाही तर अनेकांची घरवापसी करण्याची इच्छा आहे, अशी दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी परभणीमध्ये पत्रकार परिषदेत दिली.
बनावट कागदपत्र तयार करुन विधवा महिलेची 1 कोटी 64 लाखांची फसवणूक
बनावट कागदपत्र तयार करुन एका विधवा महिलेची 1 कोटी 64 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी खामगाव येथील प्रदीप राठी या ठकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. खामगाव येथील 45 वर्षीय एका महिलेचे खामगाव नजिक असलेले 14 प्लॉट प्रदीप राठीने खोटे दस्तावेज तयार करुन त्यातील अनेक प्लाट परस्पर विकले. या महिलेच्या तक्रारीवरुन खामगाव शहर पोलिसांनी प्रदीप प्रेमसुखदास राठी या ठकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार असून खामगाव शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुंबईच्या आझाद मैदानात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र मुंबईत आज पहाटेपासून हवेत कमालीचा गारवा आहे. पारा साधारणतः विशीच्या आसपास आहे. त्यामुळे आझाद मैदानाच्या पटांगणात गुलाबी थंडी पडलेली आहे. या थंडीत ऊब मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी मैदानात ठिकठिकाणी शेकोट्या केल्या आहेत. ध्वजारोहणानंतर आझाद मैदानातील मोर्चेकरी शेतकरी आपापल्या गावी परतणार आहेत.
शिर्डीतील साई मंदिराचे सर्व दरवाजे उघडावे यासाठी ग्रामस्थ आक्रमक. अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप. मागण्या पूर्ण न झाल्यास शनिवारी ग्रामस्थांनी एकत्र येत गावबंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
शिर्डीतील साई मंदिराचे सर्व दरवाजे उघडावे यासाठी ग्रामस्थ आक्रमक. अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप. मागण्या पूर्ण न झाल्यास शनिवारी ग्रामस्थांनी एकत्र येत गावबंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
प्रजासत्ताक दिनाला संपूर्ण देश तिरंगी आनंदात न्हाऊन निघत असताना विठुरायाही या तिरंगी रंगात रंगला असून मंदिराला आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. देवाचे पुणे येथील भाविक सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांनी ही फुलांची सजावट करत सेवा दिली आहे. तिरंग्याची सजावट करताना झेंडू, शेवंती आणि कामिनी या फुलांचा वापर करण्यात आला आहे. यासोबत देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या अंगावरही तिरंगी उपरणे घालण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून केलेली ही मनमोहक सजावट 26 जानेवारीला विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे.
गलवान खोऱ्यात शहीद झालेले कर्नल बी. संतोष बाबू यांना महावीर चक्र जाहीर. तर शहीद नायब सुभेदार नुदुराम सोरेन, हवालदार के. पलानी, नायक दीपक सिंह, सैनिक गुरतेज सिंग यांच्यासह गलवान खोऱ्यातील शौर्याबद्दल हवालदार तेजेंदरसिंग यांना वीर चक्र घोषित.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रभोदन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर.
राज्यात आज ४७७ केंद्रांवर ३५ हजार ८१६ ( ७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त १४४ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ वर्धा, भंडारा, उस्मानाबाद, सातारा याजिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. आज पासून लसीकरण सत्राला सुरवात झाली. उद्या मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र होईल. ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.
कंगना रनौतला 15 फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाचा दिलासा
,देशद्रोह प्रकरणात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश
मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सोलापूर : 176 कोटीच्या पंतप्रधान आवास योजनेला स्थगिती, उद्या 26 जानेवारीला होणारी 892 घरांची लॉटरी देखील रद्द
सोलापूर : 176 कोटीच्या पंतप्रधान आवास योजनेला स्थगिती, उद्या 26 जानेवारीला होणारी 892 घरांची लॉटरी देखील रद्द
गेल्या 55 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनावरुन इगो पॉईंट केला आहे, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांवर दया करुन लवकरात लवकर प्रश्न सोडवावा असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. तसंच ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याच्या नेत्यांच्या मागणीवर मुश्रीफ म्हणाले की, लवकरच महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग खानयाळेत तिलारीचा डावा कालवा फुटला असून दोडामार्ग तिलारी राज्य मार्गावर पाणीच पाणी झालं आहे. दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर आवाडे येथे पाण्याचा मोठा प्रवाह आला आहे. त्यामुळे वाहतूक बंद असून अनेक वाहने दोन्ही बाजूला अडकली आहेत. तर लगतची घरेही पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
दिल्ली येथे जे शेतकरी आंदोलन सुरु आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी येथे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, उद्या देशभरामध्ये विविध ठिकाणी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केलेले आहे, त्यात राळेगणसिद्धी परिवार पण सहभागी होणार आहे.
कल्याण पूर्वेतील कोलशेवाडी परिसरात पोटे मैदानालगत असलेल्या एका चार चाकीसह तीन दुचक्यांना काल मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने या चार ही गाड्या जळून झाक झाल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशन दलाने घटना स्थळी धाव घेतली मात्र गाड्याचे मात्र नुकसान झाले.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर या परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर असून त्यांनीच ही आग लावली असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरु असून तपासाअंती आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.
पिलीव घाटात एसटी बसवर दगडफेक प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले यातील दोघे अल्पवयीन मुलं. हे सर्व माण तालुक्यातील असून आज न्यायालयात उभे करणार.
बुलढाणा : आदिवासी भागात कोरोना लसीकरणासाठी लाभार्थ्यांना जमिनीवर बसवलं. लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्यांची दुरावस्था. संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार. कोरोना लसीकरण नियमांची ऐशीतैसी, अत्यावश्यक रुग्नवाहिकेचीही दुरावस्था.
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर चर्चेत. 'सावरकरांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा ठराव साहित्य संमेलनात सर्वानुमते मांडण्यात यावा'. सावरकर प्रेमींची साहित्य संमलेनाच्या आयोजकांकडे मागणी. लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आणि अध्यक्षांना सावरकरप्रेमींनी आजच्या पत्रकार परिषदेनंतर दिले निवेदन. संमेलनाच्या प्रवेशद्वारास सावरकरांचे नाव देण्यात यावे तसेच व्यासपीठावर सावरकरांची भव्य प्रतिमा असावी तिचे पूजन केले जावे अशीही मागणी.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादी नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ. लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेत केली त्यांच्या नावाची घोषणा. २६ ते २८ मार्चदरम्यान नाशिकमध्ये पार पडणार संमेलन
भारत आणि चीनमध्ये पुन्हा झटापट. उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला सीमेवर संघर्ष. अद्यापही या घटनेवर लष्कराकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळं अधिकृत माहितीचीच प्रतीक्षा. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याची सूत्रांची माहिती. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरुन चिंताजनक बातमी
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची सवय; मी येणार, मी येणार म्हणण्याची सवय ट्रम्प यांना लागली, बांधकाममंत्री अशोक चव्हाणांचं वक्तव्य.
आमच्या तिन्ही पक्षांकडून सरकारचं काम चांगल सुरू आहे. मात्र, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार अशा नको त्या सवयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही लागल्याचं सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आपल्याकडचे पुन्हा येणार हे वाक्य आता ट्रम्पन यांनीही वापरले, म्हणून ते ही गेले, असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं.
नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या इंडियन सफारीचं उद्घाटन 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. 145 हेक्टर वरील ही इंडियन सफारी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे. नागपूरच्या वेशीवर गोरेवाडा परिसरात तब्बल 1 हजार 941 हेक्टर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारलं जात आहे. साधारण पाच टप्प्यांच्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 145 हेक्टरवरील इंडियन सफारीचा उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.
रायगड : मुंबई पुणे हायवेवर खंडाळा घाटात मोटारसायकलचा अपघात झाला असून या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. अमृतांजन ब्रिजजवळ खंडाळा हद्दीत हा अपघात झाला. आज पहाटेची घटना आहे. जखमीला पवना हॉस्पिटल येथे उपचासाठी दाखल करण्यात आलं आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीच्या मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत 10 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज या घटनेला 16 दिवसांचा कालावधी लोटला असला तरी, अद्यापही गुन्हे दाखल झाले नाहीत. यासंदर्भात भंडाऱ्यात भाजपने 15 जानेवारीपासून आंदोलनाला देखील सुरवात केली आहे. मात्र सरकारने या आंदोलकांची दखल न घेतल्याने आज हे आंदोलन मोर्चात परिवर्तीत होणार असून या मोर्चाचे नेतृत्व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस करणार असून सकाळी 11 वाजता हा मोर्चा भांडाराच्या शास्त्री चौकातून निघणार असून जिल्हाधीकारी कार्यलयावर धडकत निवेदन देणार आहे. या मोर्च्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री परिणय फुके, जिल्यातील आमदार, खासदार हे सहभाग घेणार आहेत.
आपल्या कायद्याच्या अभ्यासानं अनेक गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेणारे उज्वल निकम चक्क क्रिकेट मैदानावर आमदार रोहित पवार यांना गोलंदाजी करताना पाहायला मिळाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. निमित्त होते मराठा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचं. या निमित्ताने घेण्यात आलेल्या सद्भावना सामन्यात उज्वल निकम यांनी रोहित पवार यांना गोलंदाजी केली, गोलंदाजीत निकम यांनी रोहित पवार यांना गुगली टाकत आपल्यातील खेळाडू अजूनही जागृत असल्याच दाखवून दिलं आहे. रोहित पवार यांनीही एक जोरदार फटका मारीत आपल्यातील खेळाडूची प्रतिभा दाखवून दिली. उज्वल निकम यांनी आपल्याला फलंदाजी जास्त आवड असल्याचे सांगून फलंदाजी ही केली. यावेळी अनिल पाटील यांनी त्यांना गोलंदाजी केली. क्रिकेटच्या मैदानावर उज्वल निकम यांच्यासह रोहित पवार आणि अनिल पाटील हे खेळताना दिसून आल्याने उपस्थित प्रेक्षकांना मात्र चांगलेच मनोरंजन झाल्याचं पहायला मिळालं आहे.
डोंबिवलीकरांसाठी यंदाचा प्रजासत्ताक दिन दरवर्षीपेक्षा काहीसा खास असणार आहे. त्याला कारणही तसे खासच असून ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज डोंबिवलीत डौलाने फडकणार आहे. हा 150 फुटी झेंडा उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून आतापासूनच डोंबिवलीकरांची याठिकाणी मोठी गर्दी होत आहे. 26 जानेवारीचे औचित्य साधून डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौकात हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले जाणार आहे. 150 फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाचा खांब उभारणीचे काम पूर्ण झाले असून त्यावर 30 बाय 20 फुट आकाराचा कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. तर या राष्ट्रध्वजाच्या शेजारीच राष्ट्रपुरुषांची अत्यंत सुंदर अशी शिल्पही साकारण्यात आली आहेत. प्रत्येक डोंबिवलीकरांच्या मनातील जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना आणखीन बळकट होण्याच्या उद्देशाने आपण ही राष्ट्रध्वजाची संकल्पना मांडल्याचेही राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान राष्ट्रध्वज उभारणीच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही प्रभागांमधील रस्त्यांवर आणि इमारतींवर अत्यंत मनमोहक आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंग्याच्या रंगाच्या या विद्युत रोषणाईने संकल्पतिर्थासह संपूर्ण परिसर झगमगून गेला आहे.
पार्श्वभूमी
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Budget 2021: आज सादर होणार अर्थसंकल्प, कोरोना काळात कशा पूर्ण होणार जनतेच्या अपेक्षा?
Union Budget 2021 अर्थात केंद्रीय अर्थसंकल्पाचीच चर्चा 2021 हे वर्ष सुरु झाल्यापासून पाहायला मिळत आहे. 29 जानेवारीपासून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. ज्यानंतर 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बहुप्रतिक्षित असा यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या संकटातूनही तरुन जात भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि त्याचवेळी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2021 म्हणजेच यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन भागांमध्ये पार पडणार आहे. ज्यापैकी पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी यादरम्यान पार पडणार आहे. तर, दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात पार पडणार आहे. याचदरम्यान, निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थमंत्री म्हणून, देशाचा आर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करतील.
देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर या काळात नजर असेल ती म्हणजे Personal Data Protection Bill बाबतची. याचसाठीचा अहवाल सादर करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली होती. अर्थसंकल्प सादर होतेवेळी आणखी एका मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये रंगताना दिसणार आहे. हा मुद्दा म्हणजे दिल्लीच्या सीमेवर सुरु असणारं शेतकरी आंदोलन. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पेटलेलं हे आंदोलन आणि धुमसणारा असंतोष हे मुद्दे अधओरेखित करत विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणार हे चित्र स्पष्ट दिसत आहे.
Budget 2021: मोफत कोरोना लसीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी
कोरोनाची लस मोफत मिळावी अशी मागणी राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान उद्याच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान मोफत लसीसाठीची तयारी केंद्रात सुरू असून या संदर्भात उद्या बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
लसीकरणाचा कार्यक्रम हा केंद्र सरकारचाच असतो. देशस्तरावर केंद्र सरकारने राबवायचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभर मोफत लसीकरण करावं हे अपेक्षितच आहे आणि ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. उद्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे, यामध्ये मोफत लसीकरणाची तरतूद जरुर करावी. ज्या ज्या लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे, त्यांचं लसीकरण करण्याची तरतून केंद्र सरकारने करावी, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.