बुलडाणा : कोविड-19 आजारी रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर-100mg हे इंजेक्शन वापरले जात आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. मात्र, खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. खाजगी कोविड रुग्णालय संचालकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मोठ्या प्रमाणावर  धावपळ करावी लागत आहे. तर बुलडाण्यातील शासकीय रुग्णालयात देखील रेमडेसिवीर आता संपले असल्याचं चित्र आहे.


खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-19 रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या राज्यभरात तक्रारी होत्या. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एका खासगी औषधी केंद्रात (मेडिकल स्टोअर) हे इंजेक्शन निश्‍चित दराने व काही ठराविक संख्येत उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. रुग्णांना ते निश्‍चित दरात उपलब्ध होईल या दृष्टीने दक्षता घेण्याबाबतच्या सूचना शासनाच्यावतीने दिल्या आहेत.


Corona Vaccination | राज्यात काल दिवसभरात विक्रमी 4,62,735 जणांचं लसीकरण


अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचे दर 1100 ते 1400 रुपये एवढे केले. परंतु कंपन्यांकडून पुरेसा साठा होत नसल्याच्या तक्रारी कोविड रुग्णालयाकडून केल्या जात आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी खासगी रुग्णालयाची धावपळ सुरूच आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी नागरिकांच्या सोयीसाठी इंजेक्शनचे दर कमी तर केले परंतु इंजेक्शन मिळत नसल्या कारणाने हेच इंजेक्शन काळ्या बाजारात विकलं जात आहे. याकडे सुद्धा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


मुंबईतील चार ठिकाणं कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत
 
सध्या संपूर्ण महाराष्ट्रमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना जागा मिळत नसल्याच्या तक्रारी मिळत आहेत. यात आता ज्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावे लागत आहे त्या रुग्णांची संख्या वाढल्याने इंजेक्शनचा तुटवडा होत आहे. यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी नागरिकांच्या सोयीसाठी इंजेक्शनचे दर 1100 ते 1400 रुपये करून मोठा दिलासा दिला आहे. परंतु आता हे इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रार वाढल्या आहेत.


Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, लॉकडाऊन होणार की नाही? निर्णय होण्याची शक्यता


या बाबतीत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी संपर्क करून जाणून घेतलं असता, सध्या बुलडाणा जिल्ह्यात 300 हून अधिक रेमडेसिवीर इंजेक्शन उरले असून पुढील तीन ते चार दिवसात नागपूर किंवा औरंगाबाद डेपोतून आम्ही मागवायचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितल. तर जिल्ह्यात ऑक्सीजनही काही दिवस पुरेल इतकच असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.