पंढरपूर : वाढत्या कोरोना संसर्गामळे विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय बारगळला असून हे वादग्रस्त ठरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने माघार घेतली आहे. देशातील कोणत्याही मंदिरात अशी चाचणी घेतली जात नसल्याने प्रशासनाने आता या भूमिकेपासून यु टर्न घेतला आहे. यातच मग विठ्ठल मंदिरात कोरोना चाचणी सुरू केली तर सर्वच धर्मियांच्या प्रार्थना स्थळात अशी चाचणी का नको? अशी भूमिका पुढे आल्याने प्रशासनाने हा निर्णय रद्द केला आहे.
 
विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांची रॅपिड टेस्ट करूनच मंदिरात सोडण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला होता. यासाठी नगरपालिका व आरोग्य विभागाकडून चाचण्या केल्या जाणार होत्या. यासाठी दर्शन मंडपातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी करून भाविकांना मंदिरात सोडण्यात येणार होते. उद्यापासून या तपासण्या सुरू करण्याची प्रशासनाची तयारी असतानाच याबाबत वाद सुरू झाल्याने हा निर्णय तातडीने रद्द करण्यात आला आहे.


पंढरपुरात दुकाने चालू ठेवण्यासाठी कोरोना चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक, कोरोना चाचणीसाठी व्यापाऱ्यांची झुंबड


कोरोनामुळे विठुरायाचे उत्पन्नात दसपट घट, तब्बल 27 कोटी रुपयांचा फटका


कोरोनाच्या संकटामुळे अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत येत असताना याचा थेट फटका मंदिरांनाही बसला आहे. या वर्षात विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नात दसपट घट होत 27 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. देशात कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर 17 मार्चपासून विठ्ठल मंदिर बंद करण्यात आले होते. यानंतर ते थेट दिवाळी पाडव्याला म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी उघडले. मात्र, अतिशय मोजक्या भाविकांना ऑनलाईन दर्शन व्यवस्थेनुसार दर्शन देण्यास सुरुवात झाली. काही दिवसापूर्वी ऑनलाईन सोबत थेट आलेल्या भाविकांनाही कोरोनाचे नियम पाळत दर्शनाला सोडण्याची व्यवस्था सुरु झाली आणि कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आल्याने भाविकांची संख्या कमालीची रोडावली आहे. गेल्या वर्षी विठ्ठल मंदिराचे उत्पन्न 31 कोटी 20 लाख रुपये इतके होते. यंदा मात्र ते केवळ 4 कोटी 60 लाख इतकेच झाल्याने जवळपास 27 कोटी रुपयांची घट झाली आहे.