मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 नुसार राज्यातील एमपीएससीच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आल्या आहेत.


राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 राज्यात 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली लागू करण्यात आलेली आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.






कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून कोणत्याही कारणास्तव होणाऱ्या गर्दीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे 31 मार्च 2020 पर्यंत आपल्या स्तरावरून घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. अशा सूचना आपणास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने देण्यात येत आहेत. तरी त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे प्रधान सचिव यांनी दिल्या आहेत.


पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर पोहोचली आहे. तर देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 झाली आहे, तर राज्यात हा आकडा 33 वर पोहोचला आहे


राज्यात कोरोना बाधितांची संख्या 33 वर




  • पुणे - 16

  • मुंबई - 5

  • ठाणे - 1

  • कल्याण- 1

  • नवी मुंबई -  1

  • पनवेल - 1

  • नागपूर - 4

  • अहमदनगर - 1 

  • यवतमाळ -2

  • औरंगाबाद - 1


देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर




  • महाराष्ट्र -33

  • केरळ - 22

  • पंजाब - 1

  • दिल्ली - 7

  • जम्मू कश्मीर - 2

  • लडाख - 3

  • राजस्थान - 4

  • उत्तरप्रदेश - 11

  • कर्नाटक - 6

  • तामिळनाडू - 1

  • तेलंगाना - 3

  • हरयाणा - 14

  • आंध्रप्रदेश - 1


संबंधित बातम्या :