Washim News वाशिम : प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. याच कारणामुळे त्यांची पुण्याहून (Pune) थेट वाशिमला बदली करण्यात आली होती. याच मुद्याला घेऊन आता वाशिम शहरातील स्थानिक नागरिकांसह  संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चांगलीच आक्रमक झाली आहे.


पुणे पाठोपाठ वाशिममध्ये पूजा खेडकरांच्या बदलीला विरोध


प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पुणे पाठोपाठ आता वाशिममध्ये देखील विरोध होत आहे. वाशिम म्हणजे काय कचऱ्याची पेटी आहे का? या आशयाचे पत्र राज्याचे मुख्यसचिव यांना लिहत स्थानिक वकील संदीप ताटके यांनी पूजा खेडकर यांची वाशिम मधून बदली करावी, अशी मागणी केली आहे. तर राज्य सरकारने आमची मागणी ऐकली नाही तर आंदोलनासोबतच या विरोधात रितसर याचिका दाखल करण्याची तयारीही ॲड. संदीप ताटके यांनी दाखवली आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्याला घेऊन या प्रकरणी आता संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.


संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा  


वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या निवडीवरून आणि प्रशिक्षण काळावर आता संभाजी ब्रिगेडने उडी घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना बडतर्फ करा, अशा मागणीचं पत्र संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आले आहे. या निवेदनात मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशाराही देण्यात आलाय. सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटे दृष्टीदोष आणि नॉन क्रिमिलियर चे दाखले जोडून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केलाय. अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना वाशिम येथून बडतर्फ करा, अशी मागणी करत वाशिम जिल्हाधिकारी एस. बुवणेश्वरी यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर आंदोलन उभारू असं संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आलंय.


अकोल्यातील बदलीच्या कार्यकाळात मोठा बदल  


प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे, वाशिमनंतर आता पूजा खेडकरांची बदली अकोल्यात करण्यात आली होती. मात्र, 11 जुलैला  काढण्यात आलेल्या आदेशात आता बदल करण्यात आला आहे. अकोला येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून त्या उद्या, सोमवार 15 जुलै  पासून 19 जुलै पर्यंत आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता रुजू होणार होत्या. तर त्यानंतर 22 जुलै पासून त्या विविध शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचेही या आदेशात सांगण्यात आले होते.


मात्र आता त्यात बदल करण्यात आले आहे. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने काढण्यात आलेल्या सुधारित आदेशपत्रात या बाबत बदल करून काही नवीन बदल केले आहे. तर याबाबत वाशिम जिल्हाधिकारी एस बुवनेश्वरी हे स्वत: या संदर्भात माहिती देणार आहेत. त्यामुळे सध्यातरी पूजा खेडकरांची बदली अकोल्यात करण्यात आली नसल्याची माहिती आहे.


इतर महत्वाच्या बातम्या